Skip to main content

Posts

Showing posts from June, 2020

वज्रासन कसे करावे | Vajrasana benefits in marathi

वज्रासन  आता आपण गुडघ्यावर बसून करण्यात येणाऱ्या आसन प्रकाराबद्दल माहिती जाणून घेऊयात. 'वज्रासन' या आसन प्रकारात पायाची बैठक वज्राप्रमाणे पक्की व मजबूत असते म्हणूनच या आसनाला वज्रासन असे म्हणतात. हे आसन करण्यासाठी अत्यंत साधे आहे त्यामुळे आपण या आसनामध्ये बराच वेळ बसू शकतो. या आसनाचा उपयोग ध्यान धारणे साठी सुद्धा केला जाऊ शकतो. या आसनाच्या नियमित सरावामुळे रसग्रंथी, टॉन्सिल्स, अस्तिमज्जा वैगेरे ठिकाणी श्वेतकणांची संख्या वाढते आणि ते कार्यक्षम व सुदृढ बनतात. आता आपण वज्रासन कसे करावे? व त्याचे आपल्या आरोग्याला होणारे महत्वाचे फायदे या बद्दल मराठी मध्ये जाणून घेणार आहोत.(vajrasana steps and benefits information in Marathi)  pic credit:- https://commons.wikimedia.org/wiki/File:Sulagna_Sen_in_Vajrasana_-_Kolkata_2017-06-21_2397.JPG कृती: दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवून अश्याप्रकारे बसा  कि दोन्ही पायांचे तळवे नितंबाखाली येतील व पाय मांड्याखाली येतील.  घोट्यांपासून गुडघ्यापर्यंतचा भाग हा जमिनीला टेकलेला असावा. संपूर्ण शरीराचा भार गुडघ्यांवर व पायांच्या घोट्यावर...

विपरीत मत्स्यासन- नेहमी नेहमी होणाऱ्या सर्दीवर उपाय

जर आपल्याला नेहमी सर्दी होत असेल तर तुम्ही 'विपरीत मत्स्यासन' करायला हवे, या आसनाच्या नियमित सरावाने हा त्रास नक्कीच दूर होतो. त्याचबरोबर बद्धकोष्टता, गॅसविकार, अग्निमांद्य, अजीर्ण, सर्दी, वातविकार, क्षय, दमा, मुरडा व संग्रहणीसारखे रोग या आसनाच्या नित्य सरावाने नष्ट होतात.     हे आसन 'मत्स्यासनच्या' उलट स्तिथीत आहे. हे आसन पालथे झोपून मत्स्यासनाप्रमाणेच केले जाते. म्हणून या आसनाला  'विपरीत मत्स्यासन' असे म्हणतात.  कृती:  प्रथम डाव्या कुशीवर झोपा व दोन्ही पाय पद्मासनाच्या स्तिथीत आणा.   आता छाती व पोट जमिनीला स्पर्श करेल अश्या प्रकारे पालथे झोपा.  त्यानंतर हनुवटी जमिनीवर टेकवा. दोन्ही हातानी त्या त्या भागाचा पायाचा अंगठा पकडा. धीम्या गतीने श्वास घ्या. आठ ते दहा सेकंदा पर्यंत या स्तिथीत रहा. सुरुवातीला हे आसन फक्त आठ ते दहा सेकंदच करावे नंतर हळूहळू सरावानंतर हे आसन  आपण दहा मिनिटापर्यंत करू शकतो.  फायदे:  या आसनाच्या नियमित सरावामुळे फुफ्फुसे सुदृढ व मजबूत बनतात.   या आसनामुळे पाठीच्या कण्याला...

मकरासन |Makarasana | फुफ्फुसांना ऑक्सिजनचा पुरवठा वाढतो

     मकर हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ मगर असा होतो. हे आसन करत असताना शरीराचा आकार मगरी सारखा दिसतो म्हणून याला 'मकरासन' ( Makarasana - crocodile pose ) असे म्हणतात. शवासनाप्रमाणेच या आसनाच्या सरावामुळे शरीराला संपूर्ण आराम मिळतो. आळस घालविण्यासाठी हे एक सर्वोत्तम आसन असून या आसनाच्या नित्य सरावामुळे शरीरात एक नवचैतन्य निर्माण होते. लैंगिक समस्या असलेल्याना हे आसन भरपूर फायदेशीर आहे.  अलिकडच्या काळात कोव्हीडमुळे श्वसनाचा त्रास असलेल्या रुग्णांना पोटावर झोपवलेले दिसत आहे, या पद्धतीला वैद्यकीय भाषेत प्रोनिंग( Proning ) असे म्हणतात. हि प्रोनिंग पद्धत योगासनात सांगितलेल्या मकरासनाप्रमाणेच आहे. आपल्या फुफ्फुसांचा जड भाग हा पाठीमागे आहे. पाठीवर झोपल्यामुळे शरीराचा सर्व भार त्यावर पडतो व फुफ्फुसांमध्ये पुरेश्या प्रमाणात हवा भरल्या जात नाही. मकरासन करताना आपण पोटावर झोपतो तेंव्हा फुफ्फुसाच्या मागच्या भागापर्यंत हवा भरल्या जाते व फुफ्फुसांना भरपूर मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होतो.  या आसनाची खाली दिलेली कृती नीट वाचुनच या आसनाचा सराव करावा.  pic credi...

भुजंगासन मराठी माहिती | Bhujangasana

भुजंगासन 'भुजंग' म्हणजे साप. या आसनामध्ये शरीराचा आकार नागाच्या उभारलेल्या फण्यासारखा दिसतो म्हणून या आसनास 'भुजंगासन' असे म्हणतात. येथे आपण भुजंगासन त्याची कृती व आपल्या शरीराला त्याचे होणारे फायदे या बद्दल संपूर्ण माहिती आपल्या मायबोली मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. (Bhujangasana information in Marathi)    pic credit:  https://pixahive.com/photo/purn-bhujangasana/ कृती: भुजंगासन हे पोट जमिनीला टेकवून करण्याच्या आसनपद्धती पैकी एक आसन आहे, त्यामुळे  प्रथम जमीनीवर पालथे झोपा.  हनुवटी छातीला टेकवा आणि कपाळ जमिनीला टेकवा.  सर्व शरीर हलके करा. हाताचे पंजे छातीजवळ आना नंतर हातांच्या पंज्यावर शरीराचा भार देऊन बेंबीपासूनचा भाग हळू हळू वर उचला.  कमरेखालचा भाग बिलकुल हलू देऊ नका.  आकृतीत दाखवल्या प्रमाणे कृती करा. पायाची बोटे ताणून जमिनीवर टेकवा .  असे केल्याने पाठ आणि खांद्याच्या मधील भागातील स्नायू व्यवस्तीत ताणले जातात. पोटातील सर्व स्नायूंवर सुद्धा व्यवस्तीत ताण  पडतो. या आसनस्थितीत श्वास रोखून धरा. आठ ते दहा सेकंद हे असं क...

पूर्ण शलभासन - मधुमेह नियंत्रीत करता येतो | Purna Shalbhasana

पूर्ण शलभासन आजकालच्या धावपळीच्या जीवनात आपले आपल्या आरोग्याकडे लक्ष देणे होत नाही. आणि त्यातच चुकीच्या खानपान पद्धतीमुळे आपले शरीर विविध आजारांचे शिकार बनते. 'मधुमेह' हा असा आजार आहे कि तो एकदा झाला कि आपल्या प्रत्येक गोष्टीवर बंधन आणतो. आणि तो आजार एकदा जडला कि त्याला नियंत्रणात आणणे खूप अवघड जाते. म्हणून तो आजार होऊच नये आणि झाला असेल तर त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठीचा एक उत्तम उपाय म्हणजे पूर्ण शलभासन(Purna-Shalbhasana). तसेच मासिक पाळी च्या वेळी स्त्रियांना होणारा त्रास सुद्धा या आसनाच्या सरावा नंतर कमी होतो.  अर्ध शालभासनात आपण एक पाय वर उचलतो आणि या आसनामध्ये आपले दोन्ही पाय वर उचलेले असतात म्हणून याला पूर्ण शलभासन असे म्हणतात. या आसनाची संपूर्ण कृती व त्यापासून आपल्याला होणारे फायदे या बद्दल संपूर्ण माहिती मराठी मध्ये आपण येथे बघणार आहोत. (Purna Shalbhasana information in marathi) pic credit:-  Shalbhasana कृती १: प्रथम जमिनीवर पालथे म्हणजेच पोटावर झोपा. दोन्ही हात आपल्या शरीराला समांतर ठेवा.  हाताची बोटे वळवून घ्या. आता श्वास आ...

हलासनाचे फायदे | Benefits of Halasana

हे आसन करताना शरीराचा आकार हल म्हणजेच नांगराप्रमाणे दिसतो म्हणून या आसनाला ' हलासन' असे म्हणतात. येथे आपण हलासनाचे फायदे (Benefits of Halasana) आणि क्रिया(Halasana Steps) बघणार आहोत. हालासनामुळे शरीरात नवचैतन्य निर्माण होते, तसेच लैंगिक शक्ती सुद्धा वाढते. या सारखे भरपूर फायदे व त्यांची मराठी मध्ये माहिती (Halasana information in Marathi) आपण पुढे बघणार आहोत.                                             pic credit:  https://pixahive.com/photo/plow-pose-halasana/ कृती(Halasana Steps):  सुरुवातीला जमिनीवर पाठीवर झोपा. आपले दोन्ही हात शरीराला सामन्तर ठेवा व हाताचे तळवे जामिनाला लागून ठेवा.  दोन्ही पाय एकमेकांना लागून सरळ रेषेत ताठ ठेवा. आता श्वास घेत घेत हळू हळू दोन्ही पाय सोबत वर उचला. श्वास घेण्याची आणि पाय वर उचलण्याची क्रिया सोबतच झाली पाहिजे. हि क्रिया करत असताना गुढघ्यात पाय वाकणार नाहीत याची पूर्ण काळजी घ्या.  हि क्रिया करताना हात आणि ...

सर्वांगासन चे फायदे | Sarvangasana yoga benefits

सर्वांगासन नावाप्रमाणेच या आसनाचा संपूर्ण शरीराला फायदा होतो म्हणून या आसनाला ' सर्वांगासन'(Sarvangasana)  असे म्हणतात. विपरीतकरणी मुद्रेप्रमाणेच  सर्वांगासनाची क्रिया आहे. हे आसन करताना शरीराचा संपूर्ण भार खांद्यावर पडतो. या आसनाच्या नियमित सरावामुळे आपल्या डोक्याला भरपूर रक्त पुरवठा मिळतो त्याचा आपल्या केसांना भरपूर फायदा मिळतो. केस गळणे ,  अकाली केस पांढरे होणे   यावर हा एक सर्वोत्तम उपाय आहे. येथे आपण सर्वांगासनाची कृती आणि त्याचे फायदे ( Sarvangasana yoga benefits and information in marathi ) मराठी मध्ये जाणून घेणार आहोत.  pic credit:  https://pixahive.com/photo/shoulder-stand-sarvangasana/ कृती:  सुरुवातीला जमिनीवर पाठीवर झोपावे. आता श्वास पूर्ण आत घ्या आणि रोखून धारा. हळू हळू पाय वर करा. दोन्ही हातांनी कमरेला आधार द्या, हि कृती करतांना दोन्ही हाताचे कोपरे जमिनीवर टेकले पाहिजे. पाठीचा कणा आणि पाय दोन्ही सरळ एका रेषेत ठेवा. खांदे आणि मान जमिनीवर टेकलेली असू द्या. आता हळूहळू श्वासोश्वास चालू ठेवा. दृष्टी पाया...

विपरीतकरणी मुद्रा | Viprita Karni Mudra

या आसनामध्ये खाली डोके वर पाय अशी उलटी शरीर अवस्था केली जाते म्हणून या आसनाला ' विपरीतकरणी  मुद्रा ' (Viprita Karni Mudra)  असे म्हणतात.   कृती: आधी जमिनीवर पाठीवर झोपा. नाकावाटे श्वास आत घेऊन तो रोखून धरा. आता दोन्ही पाय हळूहळू वर उचला. दोन्ही हातानी नितंबाना आधार द्या. हातांचे कोपरे जमिनीवर टेकवा आणि स्थिर व्हा. आता श्वासोश्वास घेत राहा. आपल्या पायांच्या अंगठ्यावर दृष्टी स्तिर करा आणि काही वेळ याच याच स्तिथीत स्थिर राहा.  सुरुवातीला हि आसनमुद्रा एकच मिनिट करा नंतर हळू हळू सरावानंतर हि मुद्रा दहा मिनिटापर्यंत करता येते.  टीप : ज्यांना उच्च रक्तदाबाचा (High BP) त्रास आहे त्यांनी हे आसन करू नये. रक्तदाब असलेल्या रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच योजगासनांचा अभ्यास करावा.  विपरीतकरणी मुद्राचे फायदे (Benefits of Viprita Karni Mudra): या आसनाच्या सरावाने जठराग्नी प्रदीप्त होतो.  कमी रक्तदाबाच्या रुग्णांसाठी हे आसन फायदेशीर आहे.  दृष्टी तेज बनते.  पायावरील सूज कमी होते.  या आसनाच्या सरावाने कंठ मधुर व सुरेल बनतो.  या आसनाच्या सर...

सुप्तभद्रासनाचे फायदे | suptabhadrasana benefits

सुप्तभद्रासन  आज आपण सुप्तभद्रासनाचे फायदे( supta bhadrasana benefits ) आणि त्याची कृती या बद्दल मराठी मध्ये जाणून घेऊयात. सुप्तभद्रासनालाच 'सुप्तगोरक्षासन ' असे म्हणतात, तर इंग्रजी मध्ये याचे नाव Reclining Bound Angle Pose असे आहे. सुप्तभादर्शनाच्या दोन कृती आहेत, खाली दिलेली आसनांची कृती पूर्ण नीट लक्ष देऊन वाचा आणि मगच हे आसन कृतीत आणा.  कृती:   प्रकार  १:  pic credit:  https://pixahive.com/photo/supta-baddha-konasana-recliner-bound-angle-pose/ सुरुवातीला जमिनीवर सरळ पाठीवर झोपा.  आता उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवून त्या पायाची टाच जननेंनद्रिय व गुद्द्वाराच्या मध्ये असणाऱ्या भागात आना हीच कृती डाव्या पायाने करा.  दोन्ही पायांच्या टाचा एकमेकाना चिटकायला हव्यात.  आपला जानेंद्रियाचाव व गुद्द्वाराच्या भागा आणि जोडलेल्या पायांच्या टाचा यात थोडे अंतर असायला हवे.  आता आपले दोन्ही हात आपल्या मांड्यावर किंवा जमिनीवर आकृतीत दाखवल्याप्रमाणे सरळ ठेवा.  सुरुवातीला हे आसन तीस सेकंद करावे, नतंर काही दिवसांच्या सरावानंतर आपण ...

मत्स्यासन | Fish Pose Yoga | (Matsyasana information in Marathi)

मत्स्यासन         आपण जेव्हा हि आसन मुद्रा धारण करतो तेंव्हा, आपल्या शरीराचा आकार पाण्यातील मास्याप्रमाने दिसायला लागतो म्हणून या आसनाला ' मत्स्यासन'(Fish Pose Yoga)  असे म्हणतात. या आसनाच्या सरावामुळे फुफुसे, कान, स्वरयंत्र, पाठीचा कणा अश्या बऱ्याच अवयवांची कार्यक्षमता वाढते. सर्वांगासनाच्या सरावानंतर मत्स्यासन केल्याने सर्वांगासनाचा आपल्याला अधिक फायदा मिळतो तसेच सर्वांगासन केल्यानंर आपल्या मानेच्या स्नायूंमध्ये आलेली ताठरता या आसनामुळे कमी होते. मत्स्यासन केल्यानंतर शवासन करावे. चला तर मत्स्यासनाची कृती आणि फायद्या बद्दल संपूर्ण माहिती आपण  मराठी मध्ये जाऊन घेऊयात. ( matsyasana information in marathi ) Photo by Elly Fairytale from Pexels-fish pose कृती:(Matsyasana Steps) आधी पद्मासनात बसा नंतर दोन्ही हातांचा आधार घेऊन जमिनीवर झोपा.   त्यानंतर आकृतित दखवल्याप्रमाणे पाठीची  कमान बनवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे शरीराचा भार डोक्यावर आणि मांडीवर पडेल. आता डाव्या हाताने डाव्या पायाचा पंजा पकडा आणि उजव्या हाताने उजव्या पायाचा पंजा पक...

पोटाची चरबी कमी करण्यासाठी करा उत्तानपादासन!

आपण पोटाची चरबी कमी करण्यासाठी भरपूर व्यायाम करतो परंतु आपल्याला पाहिजे तेवढा परिणाम दिसत नाही परंतु जर मी इथे असे म्हटले कि कमी कष्ट करून सुद्धा तुम्ही तुमच्या पोटावरील चरबी कमी करू शकता तर आश्चर्य वाटू देऊ नका. कारण नियमित काही योगासने करून आपण हे सहज करू शकतो. शरीरातील चरबी करण्या बरोबर या आसनाचे इतरही भरपूर फायदे आपल्या शरीराला होतात, त्याबद्दल आपण खाली सविस्तर जाणून घेऊयात.       हे आसन एकपाद उत्तानासनाप्रमाणेच आहे फक्त या आसनामध्ये दोन्ही पाय वर उचलायचे आहेत. शरीरातील स्थूलपणा कमी करण्यासाठी हि दोन आसने फार उपयोगी आहेत.  कृती: (Uttanpadasana Steps) पाठीवर सरळ झोपा. दोन्ही हात आपल्या शरीराला समांतर ठेवा. दोन्ही पायांच्या टाचा जोडून पाय सरळ ठेवा.  हळूहळू श्वास घेत राहा.  आता पाय हळूहळू वर आकाशाकडे  उचला. काही सेकंद ह्याच स्तिथीत राहा, या स्तिथीत श्वास रोखून धारा. दोन्ही पाय हळूहळू खाली आना. आता रोखलेला श्वास हळू हळू सोडा. थोडा वेळ आराम करा आणि पुन्हा हीच क्रिया परत करा. सुरुवातीला हे आसन दिवसातून चार वेळा कर...

मासिक पाळी संबंधीच्या तक्रारींवर उपाय - एकपाद उत्तानासन

एकपाद उत्तानासन हे जामिनाला पाठ टेकून करण्याच्या आसन प्रकारातील एक आसन आहे. या आसनाच्या नियमित सरावामुळे फुफुसांना व पोटाच्या स्नायूंना भरपूर व्यायाम मिळतो, तसेच हे आसन स्त्रियांच्या  मासिक पाळी   संबंधीच्या तक्रारीवर एक उत्तम उपाय आहे.   कृती: प्रथम जमिनीवर झोपा. दोन्ही पाय एकमेकांना चिटकून ठेवा. दोन्ही हात आपल्या शरीराला सरळ समांतर ठेवा.  एक पाय सैल ठेवा व दुसऱ्या पायाच्या चवड्याला पुढील बाजूने ताण पडेल असा वर न्या.  आता श्वास रोखून ठेवा, सहा ते आठ सेकंदापर्यंत ह्याच स्थितीत राहा.  आता पाय हळूहळू खाली आणा.  रोखलेला श्वास धीम्या गतीने सोडून द्या. आठ ते दहा सेकंद आराम करून हीच कृती दुसऱ्या पायाने करा.  सुरुवातीला हि क्रिया काही दिवस दोन्ही पायांनी चार वेळा व सरावानंतर हि कृती सहा वेळा करावी. हे आसन करण्यास सोपे असल्याने प्रत्येकाने हे आसन नियमित करावे.  फायदे: या आसनामुळे पोटातील स्नायूंना भरपूर व्यायाम मिळतो.   पोटावरील चरबी कमी करण्यासाठी हे आसन अत्यंत उपयुक्त आहे, या आसनाच्या नियमित सरावामुळे स्रियांच्या ...

शवासन - कृती व फायदे | shavasana steps and benefits

शवासन  आज आपण जाणून घेउयात ' शवासन' कसे करावे?  हे आसन सर्व आसनांच्या सुरुवातीला, मध्ये, आणि शेवटी करायलाच हवे. हे आसन सर्व स्नायू, नाड्या इत्यादींना पुष्कळ विश्रांती मिळवून देते. अत्यंत साधे वाटणारे हे आसन मात्र साध्य होण्यास फार कठीण आहे. सध्याच्या धावपळीच्या जीवनात शरीराला अत्यंत थोड्याच वेळात भरपूर आराम मिळवून देण्यासाठी या आसनाचा उपयोग केला जाऊ शकतो. या आसनाची कृती  आणि  फायदे या बद्दल संपूर्ण माहिती आपल्या मराठी मध्ये जाणून घेउयात. ( Shavasana Information in Marathi )  Photo by  Elly Fairytale  from  Pexels कृती:(Shavasana steps and benefits) पाठीवर सरळ झोपा.  हात शरीरापासून दूर ठेवा. हाताचा पंजा वरच्या बाजूला असावा आणि बोटे अर्धवट उघडी असावी. पाय सरळ पसरलेला अवस्थेत ठेवा. दोन्ही पायांच्या टाचा एकमेकांना स्पर्श करतील व चवडे बाहेरच्या बाजूस झुकतील अशी पायांची स्थिती असू द्या. डोळे मिटा श्वास अगदी हळूहळू घेत रहा. आता अशी कल्पना करा कि आपले संपूर्ण शरीर हलके होतेय आपल्या शरीरात कुठलाच त्राण नाही, आपल्याला कुठलीच वे...

सिंहासनाची - कृती व फायदे | Sinhasana

सिंहासन  चौऱ्याऐंशी आसनांपैकी हे एक आसन असून सिंहासनालाच ( sinhasana ) 'भैरावासन' असेही म्हणतात.  हे आसन करताना आपली जीभ बाहेर ताणल्या जाते त्यामुळे आपल्या घश्यातील सर्व यंत्रणेचा व्यायाम होतो. आपल्या घश्यातील रक्ताभिसरण सुरळीत होते त्यामुळे आपल्या लाळ ग्रंथींचे कार्य सुधारते. खाली आपण सिंहासनाची कृती व फायदे या बद्दल सर्व माहिती मराठी मध्ये जाणून घेऊयात.  Image Source:  https://pixahive.com/photo/simha-vajrasana-lion-pose-2/ कृती: वरील आकृतीत दाखवल्या प्रमाणे दोन्ही पाय पाठीमागे नेऊन टाचांवर बसावे.  टाचा नितंबाच्या दोन्ही बाजूला टेकवा.  दोन्ही गुडघ्यात थोडे अंतर ठेवावे.. आता उजव्या हाताचा पंजा उजव्या गुडघ्यावर व डाव्या हाताचा पंज्या डाव्या गुडघ्यावर ठेवा.  नंतर दोन्ही नाकपुड्यांतून व तोंडातून श्वास बाहेर सोडत असतानाच जीभ जास्तीत जास्त बाहेर काढावी.  जीभ बाहेर काढत असतानाच आतील संपूर्ण श्वास बाहेर सोडावा.  आता संपूर्ण श्वास बाहेर सोडून झाल्यावर परत श्वास घेऊ नका काही वेळासाठी श्वास बाहेरच रोखून धरा.  आता ताठ बसून राहा चेहऱ्यावर...

Popular posts from this blog

भुजंगासन मराठी माहिती | Bhujangasana

भुजंगासन 'भुजंग' म्हणजे साप. या आसनामध्ये शरीराचा आकार नागाच्या उभारलेल्या फण्यासारखा दिसतो म्हणून या आसनास 'भुजंगासन' असे म्हणतात. येथे आपण भुजंगासन त्याची कृती व आपल्या शरीराला त्याचे होणारे फायदे या बद्दल संपूर्ण माहिती आपल्या मायबोली मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. (Bhujangasana information in Marathi)    pic credit:  https://pixahive.com/photo/purn-bhujangasana/ कृती: भुजंगासन हे पोट जमिनीला टेकवून करण्याच्या आसनपद्धती पैकी एक आसन आहे, त्यामुळे  प्रथम जमीनीवर पालथे झोपा.  हनुवटी छातीला टेकवा आणि कपाळ जमिनीला टेकवा.  सर्व शरीर हलके करा. हाताचे पंजे छातीजवळ आना नंतर हातांच्या पंज्यावर शरीराचा भार देऊन बेंबीपासूनचा भाग हळू हळू वर उचला.  कमरेखालचा भाग बिलकुल हलू देऊ नका.  आकृतीत दाखवल्या प्रमाणे कृती करा. पायाची बोटे ताणून जमिनीवर टेकवा .  असे केल्याने पाठ आणि खांद्याच्या मधील भागातील स्नायू व्यवस्तीत ताणले जातात. पोटातील सर्व स्नायूंवर सुद्धा व्यवस्तीत ताण  पडतो. या आसनस्थितीत श्वास रोखून धरा. आठ ते दहा सेकंद हे असं क...

धनुरासन मराठी माहिती | Dhanurasana information in marathi

हे आसन पोटावर झोपून करण्याच्या आसन प्रकारातील एक आसन आहे. या आसनाच्या सरावाने शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते. हे आसन करताना मस्तकापासून ते गुडघ्या पर्यंत च्या भागाला बाण नसलेल्या धानुष्यासारखा आकार मिळतो म्हणून या आसनाला धनुरासन (Dhanurasana) असे नाव पडले आहे. हे आसन करताना आपल्या शरीराचा संपूर्ण भार हा नाभीवर पडतो त्यामुळे पोटासंबंधीच्या अनेक तक्रारी या आसनाच्या नित्य सरावाने दूर होतात.    भुजंगासन व शलभासन या दोन आसनांचे एकत्रीकरण करून हे आसन बनलेले आहे. येथे आपण धनुरासनाची कृती व फायदे मराठी मध्ये जाणून घेऊयात. (Dhanurasana information in marathi) image credit:  https://pixahive.com/photo/dhanurasana-bow-pose-3/ कृती: पोटावर पालथे झोपा.  दोन्ही हात आपल्या शरीराला लागून समांतर ठेवा.  कपाळ जमिनीवर टेकवून ठेवा.  आपल्या शरीराचे सर्व स्नायू सैल सोडा.  आता दोन्ही पाय गुडघ्यापासून मागे दुमडा.  चित्रात दाखविल्याप्रने दोन्ही हातांनी घोट्याजवळ दोन्ही  पाय धरा.  आता छाती आणि डोके वर उचला हे करताना हात आणि पाय ताठ ठेवा.  आता पाय वर...

पद्मासनाची कृती आणि फायदे | Padmasana information in Marathi

पद्मासन( Padmasana  ) कोरोना पासून वाचायचं असेल तर आपल्याला आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं खूप आवश्यक आहे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पोषक अन्ना बरोबर योगाभ्यास ( Yoga ) करणेही खूप गरजेचे आहे. त्यामूळे मी अशी काही निवडक योगसाने घेऊन येत आहे की जे तुमच्या हृदयाची अणि फुफुसाची कार्यक्षमता वाढवून तुमची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यास मदत करतील. खाली पद्मासनाच्या कृती आणि फायद्या बद्दल मराठी मध्ये माहिती दिली आहे. ( Padmasana steps and benefits information in Marathi) Photo by  Elina Fairytale  from  Pexels आज आपन 'पद्मासनाबद्दल' थोडं जाणून घेऊया.  पद्म म्हणजे कमळ,  जेव्हा आपण हे आसन करतो, तेव्हा आपल्या शरीराला कमळा सारखा आकार प्राप्त होत असल्याने या आसनाला 'पद्मासन' असे म्हणतात, तर इंग्रजी मध्ये या आसनाला ' Lotus Pose' असे म्हणतात.ध्यान करण्यासाठी प्रामुख्याने पद्मासनाचाच उपयोग केला जातो.  चला तर आता आपण बघुयात 'पद्मासन कसे करावे'? कृती :(Padmasana Steps)  जमिनीवर पाय लांब पसरवून  बसावे.  नंतर उजवा पाय डाव्या...