वज्रासन आता आपण गुडघ्यावर बसून करण्यात येणाऱ्या आसन प्रकाराबद्दल माहिती जाणून घेऊयात. 'वज्रासन' या आसन प्रकारात पायाची बैठक वज्राप्रमाणे पक्की व मजबूत असते म्हणूनच या आसनाला वज्रासन असे म्हणतात. हे आसन करण्यासाठी अत्यंत साधे आहे त्यामुळे आपण या आसनामध्ये बराच वेळ बसू शकतो. या आसनाचा उपयोग ध्यान धारणे साठी सुद्धा केला जाऊ शकतो. या आसनाच्या नियमित सरावामुळे रसग्रंथी, टॉन्सिल्स, अस्तिमज्जा वैगेरे ठिकाणी श्वेतकणांची संख्या वाढते आणि ते कार्यक्षम व सुदृढ बनतात. आता आपण वज्रासन कसे करावे? व त्याचे आपल्या आरोग्याला होणारे महत्वाचे फायदे या बद्दल मराठी मध्ये जाणून घेणार आहोत.(vajrasana steps and benefits information in Marathi) pic credit:- https://commons.wikimedia.org/wiki/File:Sulagna_Sen_in_Vajrasana_-_Kolkata_2017-06-21_2397.JPG कृती: दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवून अश्याप्रकारे बसा कि दोन्ही पायांचे तळवे नितंबाखाली येतील व पाय मांड्याखाली येतील. घोट्यांपासून गुडघ्यापर्यंतचा भाग हा जमिनीला टेकलेला असावा. संपूर्ण शरीराचा भार गुडघ्यांवर व पायांच्या घोट्यावर...
भुजंगासन 'भुजंग' म्हणजे साप. या आसनामध्ये शरीराचा आकार नागाच्या उभारलेल्या फण्यासारखा दिसतो म्हणून या आसनास 'भुजंगासन' असे म्हणतात. येथे आपण भुजंगासन त्याची कृती व आपल्या शरीराला त्याचे होणारे फायदे या बद्दल संपूर्ण माहिती आपल्या मायबोली मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. (Bhujangasana information in Marathi) pic credit: https://pixahive.com/photo/purn-bhujangasana/ कृती: भुजंगासन हे पोट जमिनीला टेकवून करण्याच्या आसनपद्धती पैकी एक आसन आहे, त्यामुळे प्रथम जमीनीवर पालथे झोपा. हनुवटी छातीला टेकवा आणि कपाळ जमिनीला टेकवा. सर्व शरीर हलके करा. हाताचे पंजे छातीजवळ आना नंतर हातांच्या पंज्यावर शरीराचा भार देऊन बेंबीपासूनचा भाग हळू हळू वर उचला. कमरेखालचा भाग बिलकुल हलू देऊ नका. आकृतीत दाखवल्या प्रमाणे कृती करा. पायाची बोटे ताणून जमिनीवर टेकवा . असे केल्याने पाठ आणि खांद्याच्या मधील भागातील स्नायू व्यवस्तीत ताणले जातात. पोटातील सर्व स्नायूंवर सुद्धा व्यवस्तीत ताण पडतो. या आसनस्थितीत श्वास रोखून धरा. आठ ते दहा सेकंद हे असं क...