सुप्त वज्रासन सुप्त वज्रासनाला अर्ध शवासन सुद्धा म्हणतात. वज्रासनापेक्षा अधिक फायदे व शक्ती सुप्तवज्रासनापासून मिळते. मधुमेह झालेल्या रोग्यांसाठी हे आसन अत्यंत फायदेशीर आहे, कारण या आसनामुळे स्वादुपिंडातील (पॅनक्रियास) सर्व पेशी सक्रिय बनतात. परंतु वज्रासनाच्या भरपूर सरावानंतरच सुप्त वज्रासन करावे(Supta vajrasana). pic credit: https: //pixahive.com/photo/supta-vajrasana-reclined-thunderbolt-pose-2/ कृती: प्रथम वज्रासनात बसा. नंतर हाताच्या कोपराच्या मदतीने जमिनीवर झोपा. जमिनीवर झोपल्यानंतर आपली पाठ हि जमिनीला टेकायला हवी. छातीवर दोन्ही हातांची घडी करा व केवळ टाळू जमिनीला चिटकेल अश्या प्रकारे डोके आत ओढा, आठ ते दहा सेकंदापर्यंत या आसनावस्थेत राहा. हि क्रिया करताना दोन्ही हातांची घडी करून छाती वर ठेवा किंवा शरीराला सामंतर जमिनिवर ठेवा. हे आसना करताना सुरुवातीला पाठीचा संपूर्ण भाग जमिनीला टेकणार नाही, पाठीला थोडा बाक राहील परंतु सरावानंतर हे आसन उत्तम प्रकारे करता येईल. या आसनाचा सर्व दिवसातून ३ ते ४ वेळा केला तरी चालेल. फा...
भुजंगासन 'भुजंग' म्हणजे साप. या आसनामध्ये शरीराचा आकार नागाच्या उभारलेल्या फण्यासारखा दिसतो म्हणून या आसनास 'भुजंगासन' असे म्हणतात. येथे आपण भुजंगासन त्याची कृती व आपल्या शरीराला त्याचे होणारे फायदे या बद्दल संपूर्ण माहिती आपल्या मायबोली मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. (Bhujangasana information in Marathi) pic credit: https://pixahive.com/photo/purn-bhujangasana/ कृती: भुजंगासन हे पोट जमिनीला टेकवून करण्याच्या आसनपद्धती पैकी एक आसन आहे, त्यामुळे प्रथम जमीनीवर पालथे झोपा. हनुवटी छातीला टेकवा आणि कपाळ जमिनीला टेकवा. सर्व शरीर हलके करा. हाताचे पंजे छातीजवळ आना नंतर हातांच्या पंज्यावर शरीराचा भार देऊन बेंबीपासूनचा भाग हळू हळू वर उचला. कमरेखालचा भाग बिलकुल हलू देऊ नका. आकृतीत दाखवल्या प्रमाणे कृती करा. पायाची बोटे ताणून जमिनीवर टेकवा . असे केल्याने पाठ आणि खांद्याच्या मधील भागातील स्नायू व्यवस्तीत ताणले जातात. पोटातील सर्व स्नायूंवर सुद्धा व्यवस्तीत ताण पडतो. या आसनस्थितीत श्वास रोखून धरा. आठ ते दहा सेकंद हे असं क...