उष्माघात म्हणजे काय? (What is Heat Stroke?) नमस्कार मी डॉक्टर विशाल राठोड, सर्वप्रथम Y oga Today ब्लॉग च्या वाचकांचे खूप खूप स्वागत. मी सुद्धा या ब्लॉग चा नियमित वाचक असून सदर ब्लॉग मध्ये योगासनाबद्दल दिलेली माहिती हि निरोगी जीवनशैली साठी फार उपयोगाची आहे. आता ऊन तापायला सुरुवात झाली आहे. या तापमानवाढी मुळे उष्माघाताचा बातम्या आपण वृत्तपत्रांमधून वाचतो. उष्माघात म्हणजे काय? उष्माघात कश्यामुळे होतो? त्यापासून बचावा करिता आपण घरघुती काय उपाययोजना करू शकतो. या बद्दल ची माहिती आपल्या वाचकांना उपलब्ध व्हावी, त्यासाठी ह्या ब्लॉग च्या निर्मात्याने मला उष्माघाताबद्दल माहिती देण्याची विनंती केली होती. त्या अनुषंगाने सदर ब्लॉग मध्ये मी उष्माघाताबद्दल सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न करीत आहे. उष्माघात म्हणजे काय? सुरुवातीला आपण उष्माघात म्हणजे काय? हे जाणून घेऊयात. उष्माघात म्हणजेच हिट स्ट्रोक ( heat stroke ) शरीराने गरजेपेक्षा जास्त उष्णता निर्माण केली किंवा शोषून घेतली तर अतिउच्च तापमानाचा आजार होतो त्यालाच हायपरथर्मिया (hyperthermia) असे म्हणतात. ...
भुजंगासन 'भुजंग' म्हणजे साप. या आसनामध्ये शरीराचा आकार नागाच्या उभारलेल्या फण्यासारखा दिसतो म्हणून या आसनास 'भुजंगासन' असे म्हणतात. येथे आपण भुजंगासन त्याची कृती व आपल्या शरीराला त्याचे होणारे फायदे या बद्दल संपूर्ण माहिती आपल्या मायबोली मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. (Bhujangasana information in Marathi) pic credit: https://pixahive.com/photo/purn-bhujangasana/ कृती: भुजंगासन हे पोट जमिनीला टेकवून करण्याच्या आसनपद्धती पैकी एक आसन आहे, त्यामुळे प्रथम जमीनीवर पालथे झोपा. हनुवटी छातीला टेकवा आणि कपाळ जमिनीला टेकवा. सर्व शरीर हलके करा. हाताचे पंजे छातीजवळ आना नंतर हातांच्या पंज्यावर शरीराचा भार देऊन बेंबीपासूनचा भाग हळू हळू वर उचला. कमरेखालचा भाग बिलकुल हलू देऊ नका. आकृतीत दाखवल्या प्रमाणे कृती करा. पायाची बोटे ताणून जमिनीवर टेकवा . असे केल्याने पाठ आणि खांद्याच्या मधील भागातील स्नायू व्यवस्तीत ताणले जातात. पोटातील सर्व स्नायूंवर सुद्धा व्यवस्तीत ताण पडतो. या आसनस्थितीत श्वास रोखून धरा. आठ ते दहा सेकंद हे असं क...