या आसनामध्ये खाली डोके वर पाय अशी उलटी शरीर अवस्था केली जाते म्हणून या आसनाला ' विपरीतकरणी मुद्रा ' (Viprita Karni Mudra) असे म्हणतात. कृती: आधी जमिनीवर पाठीवर झोपा. नाकावाटे श्वास आत घेऊन तो रोखून धरा. आता दोन्ही पाय हळूहळू वर उचला. दोन्ही हातानी नितंबाना आधार द्या. हातांचे कोपरे जमिनीवर टेकवा आणि स्थिर व्हा. आता श्वासोश्वास घेत राहा. आपल्या पायांच्या अंगठ्यावर दृष्टी स्तिर करा आणि काही वेळ याच याच स्तिथीत स्थिर राहा. सुरुवातीला हि आसनमुद्रा एकच मिनिट करा नंतर हळू हळू सरावानंतर हि मुद्रा दहा मिनिटापर्यंत करता येते. टीप : ज्यांना उच्च रक्तदाबाचा (High BP) त्रास आहे त्यांनी हे आसन करू नये. रक्तदाब असलेल्या रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घेऊनच योजगासनांचा अभ्यास करावा. विपरीतकरणी मुद्राचे फायदे (Benefits of Viprita Karni Mudra): या आसनाच्या सरावाने जठराग्नी प्रदीप्त होतो. कमी रक्तदाबाच्या रुग्णांसाठी हे आसन फायदेशीर आहे. दृष्टी तेज बनते. पायावरील सूज कमी होते. या आसनाच्या सरावाने कंठ मधुर व सुरेल बनतो. या आसनाच्या सर...
भुजंगासन (Bhujangasana) माहिती | फायदे, कृती, काळजी व उपयोग भुजंगासन म्हणजे काय? 'भुजंग' म्हणजे नाग किंवा साप. या आसनामध्ये शरीराचा आकार फणा काढलेल्या नागासारखा दिसतो म्हणून या आसनाला भुजंगासन (Bhujangasana) असे म्हणतात. इंग्रजीमध्ये याला Cobra Pose असे म्हणतात. हे पोटावर झोपून केले जाणारे एक प्रभावी योगासन असून पाठीचा कणा, खांदे, छाती आणि पोटाच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जण संगणकासमोर तासन्तास बसून काम करतात. त्यामुळे पाठदुखी, मानेचा त्रास आणि शरीराची लवचिकता कमी होणे या समस्या वाढताना दिसतात. अशा वेळी योग्य पद्धतीने आणि नियमितपणे केलेले भुजंगासन शरीराला मोठा फायदा देऊ शकते. माझा भुजंगासनाचा अनुभव (My Experience) मी व्यवसायाने IT क्षेत्रात Automation Test Engineer म्हणून काम करतो. माझ्या कामाचा बहुतांश वेळ संगणकासमोर बसून जातो. सुरुवातीला सलग ८–१० तास बसून काम केल्यामुळे मला वारंवार पाठदुखी, मानेचा ताण आणि खांद्यामध्ये जडपणा जाणवू लागला. काही दिवस तर सकाळी उठल्यावरही पाठीमध्ये ताठरपणा जाणवत असे. यानंतर मी नियमित य...