गुळवेल या कोरोनाच्या काळात आपली रोगप्रतिकारक क्षमता टिकवून ठेवणे आणि ती वाढवणे खूप महत्वाचे आहे. मागील काही ब्लॉग मध्ये आपण पद्मासन , सिद्धासन , सर्वांगासन या सारखी अनेक अशी योगासने बघितली कि ज्यामुळे आपल्या अंतर आणि बाह्य शरीराला भरपूर व्यायाम मिळून आपल्या शरीराची कार्यक्षमता वाढते. आता आपण अश्या एका वनऔषधी बद्दल माहिती जाणून घेऊयात कि ज्यामुळे आपली प्रतिकार शक्ती वाढण्यास आणि ती बळकट होण्यास मदत होईल. गुळवेल, गुळवेल ला आयुर्वेदामध्ये अमृतवेल सुद्धा म्हणतात. गुळवेलाच्या सेवनामुळे आपली प्रतिकारक्षमता वाढवण्यास मदत होते. सर्दी, ताप खोकला यासारख्या आजारांशी लढण्याची ताकत आपल्याला मिळते. गुळवेल मध्ये असलेल्या इम्युनोमॉडेलरी गुणधर्मामुळे आपली कमकुवत झालेली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होण्यास मदत होते. गुळवेलीमध्ये फॉस्परस, कॅलशियम, प्रोटीन, झिंक, मॅग्नेशियम असे अनेक शरीर उपयोगी औषधीय घटक आहेत. या वनौषधीच्या सेवनामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण संतुलित राहते त्यामुळे मधुमेह या सारखे आजार होण्याचा धोका टळतो. येथे आपण गुळवेल कसा ओळखावा, गुळवेलचा काढा कसा बनवावा आणि त्याचे फायदे या बद्...
भुजंगासन 'भुजंग' म्हणजे साप. या आसनामध्ये शरीराचा आकार नागाच्या उभारलेल्या फण्यासारखा दिसतो म्हणून या आसनास 'भुजंगासन' असे म्हणतात. येथे आपण भुजंगासन त्याची कृती व आपल्या शरीराला त्याचे होणारे फायदे या बद्दल संपूर्ण माहिती आपल्या मायबोली मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. (Bhujangasana information in Marathi) pic credit: https://pixahive.com/photo/purn-bhujangasana/ कृती: भुजंगासन हे पोट जमिनीला टेकवून करण्याच्या आसनपद्धती पैकी एक आसन आहे, त्यामुळे प्रथम जमीनीवर पालथे झोपा. हनुवटी छातीला टेकवा आणि कपाळ जमिनीला टेकवा. सर्व शरीर हलके करा. हाताचे पंजे छातीजवळ आना नंतर हातांच्या पंज्यावर शरीराचा भार देऊन बेंबीपासूनचा भाग हळू हळू वर उचला. कमरेखालचा भाग बिलकुल हलू देऊ नका. आकृतीत दाखवल्या प्रमाणे कृती करा. पायाची बोटे ताणून जमिनीवर टेकवा . असे केल्याने पाठ आणि खांद्याच्या मधील भागातील स्नायू व्यवस्तीत ताणले जातात. पोटातील सर्व स्नायूंवर सुद्धा व्यवस्तीत ताण पडतो. या आसनस्थितीत श्वास रोखून धरा. आठ ते दहा सेकंद हे असं क...