शवासन आज आपण जाणून घेउयात ' शवासन' कसे करावे? हे आसन सर्व आसनांच्या सुरुवातीला, मध्ये, आणि शेवटी करायलाच हवे. हे आसन सर्व स्नायू, नाड्या इत्यादींना पुष्कळ विश्रांती मिळवून देते. अत्यंत साधे वाटणारे हे आसन मात्र साध्य होण्यास फार कठीण आहे. सध्याच्या धावपळीच्या जीवनात शरीराला अत्यंत थोड्याच वेळात भरपूर आराम मिळवून देण्यासाठी या आसनाचा उपयोग केला जाऊ शकतो. या आसनाची कृती आणि फायदे या बद्दल संपूर्ण माहिती आपल्या मराठी मध्ये जाणून घेउयात. ( Shavasana Information in Marathi ) Photo by Elly Fairytale from Pexels कृती:(Shavasana steps and benefits) पाठीवर सरळ झोपा. हात शरीरापासून दूर ठेवा. हाताचा पंजा वरच्या बाजूला असावा आणि बोटे अर्धवट उघडी असावी. पाय सरळ पसरलेला अवस्थेत ठेवा. दोन्ही पायांच्या टाचा एकमेकांना स्पर्श करतील व चवडे बाहेरच्या बाजूस झुकतील अशी पायांची स्थिती असू द्या. डोळे मिटा श्वास अगदी हळूहळू घेत रहा. आता अशी कल्पना करा कि आपले संपूर्ण शरीर हलके होतेय आपल्या शरीरात कुठलाच त्राण नाही, आपल्याला कुठलीच वे...
भुजंगासन 'भुजंग' म्हणजे साप. या आसनामध्ये शरीराचा आकार नागाच्या उभारलेल्या फण्यासारखा दिसतो म्हणून या आसनास 'भुजंगासन' असे म्हणतात. येथे आपण भुजंगासन त्याची कृती व आपल्या शरीराला त्याचे होणारे फायदे या बद्दल संपूर्ण माहिती आपल्या मायबोली मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. (Bhujangasana information in Marathi) pic credit: https://pixahive.com/photo/purn-bhujangasana/ कृती: भुजंगासन हे पोट जमिनीला टेकवून करण्याच्या आसनपद्धती पैकी एक आसन आहे, त्यामुळे प्रथम जमीनीवर पालथे झोपा. हनुवटी छातीला टेकवा आणि कपाळ जमिनीला टेकवा. सर्व शरीर हलके करा. हाताचे पंजे छातीजवळ आना नंतर हातांच्या पंज्यावर शरीराचा भार देऊन बेंबीपासूनचा भाग हळू हळू वर उचला. कमरेखालचा भाग बिलकुल हलू देऊ नका. आकृतीत दाखवल्या प्रमाणे कृती करा. पायाची बोटे ताणून जमिनीवर टेकवा . असे केल्याने पाठ आणि खांद्याच्या मधील भागातील स्नायू व्यवस्तीत ताणले जातात. पोटातील सर्व स्नायूंवर सुद्धा व्यवस्तीत ताण पडतो. या आसनस्थितीत श्वास रोखून धरा. आठ ते दहा सेकंद हे असं क...