हस्तमुद्रा म्हणजे काय? आता पर्यंत आपण विविध योगासनाबद्दल माहिती जाणून घेतली आहे. या ब्लॉग मध्ये आपण हस्तमुद्रा म्हणजे काय आणि त्याचे विविध प्रकार काय आहेत या बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊयात. असे मानल्या जाते कि आपले शरीर हे पंचतत्त्व म्हणजे पाच तत्त्वांपासून बनले आहे. हि पंचतत्त्व म्हणजेच अग्नी, वायू, जल, पृथी, आणि आकाश . आपल्या शरीरातील ह्या तत्वांचे प्रमाण बिघडल्यामुळे आपले आरोग्य बिघडू शकते. योग आणि हस्तमुद्रा हि ५००० वर्षे जुनी पद्धती आहे. ज्याच्या नियमित सरावामुळे आपण आपले आरोग्य निरोगी बनवू शकतो. योगासना सोबतच हस्तमुद्रांचा सराव केल्यास आपले शारीरिक व मानसिक आरोग्य सुधारते. हस्तमुद्रा या शब्दाची फोड केल्यास हस्त म्हणजे हात आणि मुद्रा म्हणजे एक विशिष्ट्य आकार असा होतो. योगासना मध्ये आपल्या हाताला एक अनन्य साधारण महत्व आहे जे आपल्या शरीरातील विविध नाड्याना जोडलेले असतात. आणि या नाड्यांमधुन आपल्या शरीरातील ऊर्जा वाहण्याचे कार्य चालू असते. हस्तमुद्रांच्या सरावामुळे आपण या ऊर्जावाहन्यांवर प्रभाव टाकू शकतो व आपले आरोग्य सुधारू शकतो. हस्तमुद्रांचा सराव आप...
भुजंगासन 'भुजंग' म्हणजे साप. या आसनामध्ये शरीराचा आकार नागाच्या उभारलेल्या फण्यासारखा दिसतो म्हणून या आसनास 'भुजंगासन' असे म्हणतात. येथे आपण भुजंगासन त्याची कृती व आपल्या शरीराला त्याचे होणारे फायदे या बद्दल संपूर्ण माहिती आपल्या मायबोली मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. (Bhujangasana information in Marathi) pic credit: https://pixahive.com/photo/purn-bhujangasana/ कृती: भुजंगासन हे पोट जमिनीला टेकवून करण्याच्या आसनपद्धती पैकी एक आसन आहे, त्यामुळे प्रथम जमीनीवर पालथे झोपा. हनुवटी छातीला टेकवा आणि कपाळ जमिनीला टेकवा. सर्व शरीर हलके करा. हाताचे पंजे छातीजवळ आना नंतर हातांच्या पंज्यावर शरीराचा भार देऊन बेंबीपासूनचा भाग हळू हळू वर उचला. कमरेखालचा भाग बिलकुल हलू देऊ नका. आकृतीत दाखवल्या प्रमाणे कृती करा. पायाची बोटे ताणून जमिनीवर टेकवा . असे केल्याने पाठ आणि खांद्याच्या मधील भागातील स्नायू व्यवस्तीत ताणले जातात. पोटातील सर्व स्नायूंवर सुद्धा व्यवस्तीत ताण पडतो. या आसनस्थितीत श्वास रोखून धरा. आठ ते दहा सेकंद हे असं क...