Skip to main content

Posts

Showing posts with the label बद्धकोष्टता

कोमट पाणी पिण्याचे फायदे व नुकसान

 सकाळी झोपेतून उठल्यानंतर कोमट पाणी पिण्याचे फायदे : आपण या लेखामध्ये सकाळी झोपेतून उठल्यानंतर पाणी पिण्याचे फायदे जाणून घेणार आहोत. या क्रियेला आयुर्वेदामध्ये उषःपान असे म्हटले जाते.   ककचंडीश्वर_कल्पतंत्र" या आयुर्वेदिक ग्रंथात रात्रीच्या पूर्वार्धात पाणी पिणे विषारी असल्याचे सांगितले आहे. मध्यरात्री प्यालेले पाणी ‘दुधा’सारखे फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. आणि सकाळी (सुर्योदयापूर्वी) प्यायलेले पाणी आईच्या दुधाइतकेच फायदेशीर आहे असे म्हणतात . उषःपान या शब्दाची फोड केल्यास उषा म्हणजे सकाळ आणि पान म्हणजे पाणी असा होतो. सकाळी उपाशी पोटी पाणी पिल्याने आपल्या शरीराला अनेक आजारापासून वाचवता येते. तसेच आपल्या शरीरातील विषारी द्रवे बाहेर टाकण्यासाठी ह्या क्रियेचा आपल्याला भरपूर फायदा होतो. सध्या बहुतेक लोकांना एक प्रश्न पडतो तो म्हणजे वजन कमी कसे करावे? याचे सोपे उत्तर म्हणजे उषःपान. नियमित रोज सकाळी पाणी पिण्याच्या सवयीमुळे आपल्याला आपले वजन कमी करण्यासाठी खूप मदत होते. थोडक्यात सांगायचे झाल्यास उषःपान म्हणजे घरच्या घरी केलेली विनामूल्य वॉटर थेरेपी.  Image by: Photo...

सुप्त वज्रासन(Supta Vajrasana)- मधुमेह रोगीं करिता अत्यंत फायदेशीर

 सुप्त वज्रासन सुप्त वज्रासनाला अर्ध शवासन सुद्धा म्हणतात. वज्रासनापेक्षा अधिक फायदे व शक्ती सुप्तवज्रासनापासून मिळते.  मधुमेह झालेल्या रोग्यांसाठी हे आसन अत्यंत फायदेशीर आहे, कारण या आसनामुळे स्वादुपिंडातील (पॅनक्रियास) सर्व पेशी सक्रिय बनतात. परंतु वज्रासनाच्या भरपूर सरावानंतरच सुप्त वज्रासन करावे(Supta vajrasana). pic credit: https: //pixahive.com/photo/supta-vajrasana-reclined-thunderbolt-pose-2/ कृती: प्रथम वज्रासनात बसा.  नंतर हाताच्या कोपराच्या मदतीने जमिनीवर झोपा. जमिनीवर झोपल्यानंतर आपली पाठ हि जमिनीला टेकायला हवी.   छातीवर दोन्ही हातांची घडी करा व केवळ टाळू जमिनीला चिटकेल अश्या प्रकारे डोके आत ओढा, आठ ते दहा सेकंदापर्यंत या आसनावस्थेत राहा. हि क्रिया करताना दोन्ही हातांची घडी करून छाती वर ठेवा किंवा शरीराला सामंतर जमिनिवर ठेवा.  हे आसना करताना सुरुवातीला पाठीचा संपूर्ण भाग जमिनीला टेकणार नाही, पाठीला थोडा बाक राहील परंतु सरावानंतर हे आसन उत्तम प्रकारे करता येईल.  या आसनाचा सर्व दिवसातून ३ ते ४ वेळा केला तरी चालेल.  फा...

वज्रासन कसे करावे | Vajrasana benefits in marathi

वज्रासन  आता आपण गुडघ्यावर बसून करण्यात येणाऱ्या आसन प्रकाराबद्दल माहिती जाणून घेऊयात. 'वज्रासन' या आसन प्रकारात पायाची बैठक वज्राप्रमाणे पक्की व मजबूत असते म्हणूनच या आसनाला वज्रासन असे म्हणतात. हे आसन करण्यासाठी अत्यंत साधे आहे त्यामुळे आपण या आसनामध्ये बराच वेळ बसू शकतो. या आसनाचा उपयोग ध्यान धारणे साठी सुद्धा केला जाऊ शकतो. या आसनाच्या नियमित सरावामुळे रसग्रंथी, टॉन्सिल्स, अस्तिमज्जा वैगेरे ठिकाणी श्वेतकणांची संख्या वाढते आणि ते कार्यक्षम व सुदृढ बनतात. आता आपण वज्रासन कसे करावे? व त्याचे आपल्या आरोग्याला होणारे महत्वाचे फायदे या बद्दल मराठी मध्ये जाणून घेणार आहोत.(vajrasana steps and benefits information in Marathi)  pic credit:- https://commons.wikimedia.org/wiki/File:Sulagna_Sen_in_Vajrasana_-_Kolkata_2017-06-21_2397.JPG कृती: दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवून अश्याप्रकारे बसा  कि दोन्ही पायांचे तळवे नितंबाखाली येतील व पाय मांड्याखाली येतील.  घोट्यांपासून गुडघ्यापर्यंतचा भाग हा जमिनीला टेकलेला असावा. संपूर्ण शरीराचा भार गुडघ्यांवर व पायांच्या घोट्यावर...

विपरीत मत्स्यासन- नेहमी नेहमी होणाऱ्या सर्दीवर उपाय

जर आपल्याला नेहमी सर्दी होत असेल तर तुम्ही 'विपरीत मत्स्यासन' करायला हवे, या आसनाच्या नियमित सरावाने हा त्रास नक्कीच दूर होतो. त्याचबरोबर बद्धकोष्टता, गॅसविकार, अग्निमांद्य, अजीर्ण, सर्दी, वातविकार, क्षय, दमा, मुरडा व संग्रहणीसारखे रोग या आसनाच्या नित्य सरावाने नष्ट होतात.     हे आसन 'मत्स्यासनच्या' उलट स्तिथीत आहे. हे आसन पालथे झोपून मत्स्यासनाप्रमाणेच केले जाते. म्हणून या आसनाला  'विपरीत मत्स्यासन' असे म्हणतात.  कृती:  प्रथम डाव्या कुशीवर झोपा व दोन्ही पाय पद्मासनाच्या स्तिथीत आणा.   आता छाती व पोट जमिनीला स्पर्श करेल अश्या प्रकारे पालथे झोपा.  त्यानंतर हनुवटी जमिनीवर टेकवा. दोन्ही हातानी त्या त्या भागाचा पायाचा अंगठा पकडा. धीम्या गतीने श्वास घ्या. आठ ते दहा सेकंदा पर्यंत या स्तिथीत रहा. सुरुवातीला हे आसन फक्त आठ ते दहा सेकंदच करावे नंतर हळूहळू सरावानंतर हे आसन  आपण दहा मिनिटापर्यंत करू शकतो.  फायदे:  या आसनाच्या नियमित सरावामुळे फुफ्फुसे सुदृढ व मजबूत बनतात.   या आसनामुळे पाठीच्या कण्याला...

हलासनाचे फायदे | Benefits of Halasana

हे आसन करताना शरीराचा आकार हल म्हणजेच नांगराप्रमाणे दिसतो म्हणून या आसनाला ' हलासन' असे म्हणतात. येथे आपण हलासनाचे फायदे (Benefits of Halasana) आणि क्रिया(Halasana Steps) बघणार आहोत. हालासनामुळे शरीरात नवचैतन्य निर्माण होते, तसेच लैंगिक शक्ती सुद्धा वाढते. या सारखे भरपूर फायदे व त्यांची मराठी मध्ये माहिती (Halasana information in Marathi) आपण पुढे बघणार आहोत.                                             pic credit:  https://pixahive.com/photo/plow-pose-halasana/ कृती(Halasana Steps):  सुरुवातीला जमिनीवर पाठीवर झोपा. आपले दोन्ही हात शरीराला सामन्तर ठेवा व हाताचे तळवे जामिनाला लागून ठेवा.  दोन्ही पाय एकमेकांना लागून सरळ रेषेत ताठ ठेवा. आता श्वास घेत घेत हळू हळू दोन्ही पाय सोबत वर उचला. श्वास घेण्याची आणि पाय वर उचलण्याची क्रिया सोबतच झाली पाहिजे. हि क्रिया करत असताना गुढघ्यात पाय वाकणार नाहीत याची पूर्ण काळजी घ्या.  हि क्रिया करताना हात आणि ...

गोमुखासन - कृती आणि फायदे | Gomukhasana Steps and Benefits

गोमुखासन (Cow face pose) गोमुख म्हणजे गायीचे तोंड. या आसनामध्ये शरीराचा आकार गायीच्या मुखाप्रमाणे दिसतो म्हणून याला 'गोमुखासन'  असे म्हणतात. आता गोमुखासनाच्या कृती आणि फायदे ( Gomukhasana Steps and Benefits ) बद्दल थोडे जाणून घेऊयात.                                pic credit- https://commons.wikimedia.org/wiki/File:YOGASANA.jpg        कृती:(Gomukhasana Steps)  डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवून डाव्या टाचेला नितंबाच्या डाव्या बाजूखाली ठेवा,  नंतर उजवा पाय अश्या प्रकारे वाकवा की, उजवा गुडघा डाव्या गुडघ्यावर येईल आणि उजव्या पायाचा तळवा डाव्या मांडी खाली येईल. सुरुवातीला उजव्या पायाची टाच डाव्या मांडीला लागणार नाही परंतु नियमित सराव केल्यानंतर हे सहज शक्य होईल. आता आकृतीत दाखवल्या प्रमाणे डावा हात कोपरामध्ये वाकवून मानेखाली खांद्यांच्या मध्ये टेकवा. आता उजवा हात कोपरामध्ये वाकवून मागील बाजूने वर न्या व वर आकृतीत दाखवल्याप्रमाने दोन्ही हातांची बोटे एकमेकांत ग...

Popular posts from this blog

भुजंगासन (Bhujangasana) माहिती | फायदे, कृती, काळजी व उपयोग | ByYogesh

भुजंगासन (Bhujangasana) माहिती | फायदे, कृती, काळजी व उपयोग  भुजंगासन म्हणजे काय? 'भुजंग' म्हणजे नाग किंवा साप. या आसनामध्ये शरीराचा आकार फणा काढलेल्या नागासारखा दिसतो म्हणून या आसनाला भुजंगासन (Bhujangasana) असे म्हणतात. इंग्रजीमध्ये याला Cobra Pose असे म्हणतात. हे पोटावर झोपून केले जाणारे एक प्रभावी योगासन असून पाठीचा कणा, खांदे, छाती आणि पोटाच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जण संगणकासमोर तासन्तास बसून काम करतात. त्यामुळे पाठदुखी, मानेचा त्रास आणि शरीराची लवचिकता कमी होणे या समस्या वाढताना दिसतात. अशा वेळी योग्य पद्धतीने आणि नियमितपणे केलेले भुजंगासन शरीराला मोठा फायदा देऊ शकते. माझा भुजंगासनाचा अनुभव (My Experience) मी व्यवसायाने IT क्षेत्रात Automation Test Engineer म्हणून काम करतो. माझ्या कामाचा बहुतांश वेळ संगणकासमोर बसून जातो. सुरुवातीला सलग ८–१० तास बसून काम केल्यामुळे मला वारंवार पाठदुखी, मानेचा ताण आणि खांद्यामध्ये जडपणा जाणवू लागला. काही दिवस तर सकाळी उठल्यावरही पाठीमध्ये ताठरपणा जाणवत असे. यानंतर मी नियमित य...

धनुरासन (Dhanurasana) माहिती | कृती, फायदे, काळजी आणि योग्य पद्धत

धनुरासन म्हणजे काय? धनुरासन (Dhanurasana) हे पोटावर झोपून केले जाणारे योगासन आहे. या आसनामध्ये दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून हातांनी घोटे पकडले जातात आणि छाती व पाय वर उचलले जातात. त्यामुळे शरीराचा आकार धनुष्याप्रमाणे दिसतो. म्हणून या आसनाला धनुरासन असे नाव देण्यात आले आहे. धनुरासन हे पाठीचा कणा, छाती, खांदे, पोट आणि पायांच्या स्नायूंवर काम करणारे एक मागे वाकण्याचे आसन आहे. नियमित आणि योग्य पद्धतीने सराव केल्यास शरीराची लवचिकता आणि स्नायूंची ताकद सुधारण्यास मदत होऊ शकते. धनुरासन आणि भुजंगासनाचा संबंध धनुरासन करताना शरीराचा पुढील भाग वर उचलला जात असल्यामुळे त्यामध्ये भुजंगासनासारखा मागे वाकण्याचा भाग जाणवतो. तसेच पाय वर उचलल्यामुळे शरीराच्या मागील भागातील स्नायूंवरही ताण येतो. मात्र धनुरासन हे भुजंगासन आणि शलभासन यांचे केवळ साधे "एकत्रीकरण" आहे असे म्हणण्यापेक्षा, या दोन्ही आसनांमध्ये आढळणाऱ्या काही हालचालींसारखी शरीराची स्थिती धनुरासनात दिसते , असे सांगणे अधिक योग्य आहे. माझा योगाभ्यासाचा अनुभव मी IT क्षेत्रात काम करत असल्यामुळे माझ्या कामाचा बराच वेळ संगणकासमोर ब...

पद्मासन (Padmasana) माहिती मराठीत | कृती, फायदे आणि खबरदारी

पद्मासन (Padmasana) माहिती मराठीत | कृती, फायदे आणि खबरदारी पद्मासन (Padmasana) हे योगातील सर्वात प्रसिद्ध आणि पारंपरिक ध्यानासनांपैकी एक आहे. "पद्म" म्हणजे कमळ. या आसनामध्ये बसल्यावर शरीराचा आकार कमळासारखा दिसतो, म्हणून याला पद्मासन किंवा इंग्रजीमध्ये Lotus Pose असे म्हणतात. ध्यान, प्राणायाम आणि मानसिक शांततेसाठी हे आसन अत्यंत उपयुक्त मानले जाते. नियमित सराव केल्यास शरीराची लवचिकता वाढण्यास, मन शांत राहण्यास आणि एकाग्रता सुधारण्यास मदत होऊ शकते. महत्त्वाची सूचना: पद्मासन करताना शरीरावर जबरदस्ती करू नका. गुडघा किंवा घोट्याचा त्रास असल्यास योगतज्ज्ञांचा सल्ला घ्या. पद्मासन कसे करावे? (Padmasana Steps) स्वच्छ आणि सपाट जागेवर चटई अंथरून बसा. दोन्ही पाय समोर सरळ पसरवा. उजवा पाय अलगद उचलून डाव्या मांडीवर ठेवा. त्यानंतर डावा पाय उचलून उजव्या मांडीवर ठेवा. दोन्ही गुडघे जमिनीच्या दिशेने ठेवण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा आणि अंगठा व तर्जनी एकमेकांना स्पर्श करून ज्ञानमुद्रा धरा. पाठीचा कणा, मान आणि डोके सरळ ठेवा. डोळे बंद करून सामान्य श्वास घेत १ ते ५ मिनिटे ध्यान क...