सुप्त वज्रासन
सुप्त वज्रासनाला अर्ध शवासन सुद्धा म्हणतात. वज्रासनापेक्षा अधिक फायदे व शक्ती सुप्तवज्रासनापासून मिळते. मधुमेह झालेल्या रोग्यांसाठी हे आसन अत्यंत फायदेशीर आहे, कारण या आसनामुळे स्वादुपिंडातील (पॅनक्रियास) सर्व पेशी सक्रिय बनतात. परंतु वज्रासनाच्या भरपूर सरावानंतरच सुप्त वज्रासन करावे(Supta vajrasana).
![]() |
| pic credit: https://pixahive.com/photo/supta-vajrasana-reclined-thunderbolt-pose-2/ |
कृती:
- प्रथम वज्रासनात बसा.
- नंतर हाताच्या कोपराच्या मदतीने जमिनीवर झोपा.
- जमिनीवर झोपल्यानंतर आपली पाठ हि जमिनीला टेकायला हवी.
- छातीवर दोन्ही हातांची घडी करा व केवळ टाळू जमिनीला चिटकेल अश्या प्रकारे डोके आत ओढा, आठ ते दहा सेकंदापर्यंत या आसनावस्थेत राहा. हि क्रिया करताना दोन्ही हातांची घडी करून छाती वर ठेवा किंवा शरीराला सामंतर जमिनिवर ठेवा.
- हे आसना करताना सुरुवातीला पाठीचा संपूर्ण भाग जमिनीला टेकणार नाही, पाठीला थोडा बाक राहील परंतु सरावानंतर हे आसन उत्तम प्रकारे करता येईल.
- या आसनाचा सर्व दिवसातून ३ ते ४ वेळा केला तरी चालेल.
फायदे:
- या आसनाच्या सरावामुळे छाती, पाठीचा कणा व मान या शरीराच्या भागांना चांगला व्यायाम मिळतो.
- या आसनाच्या सरावामुळे पाठीचा कणा ताणला जातो व त्यामुळे पाठीला कुबड असेल तर ते निघून जाते.
- हे आसन नियमितपणे केल्यास कुंडलिनी शक्ती सहजगत्या ऊर्ध्वगमन करू लागते.
- या आसनाच्या सरावाने पायाचे सांधे व स्नायू यांना भरपूर व्यायाम मिळतो व ते सशक्त व मजबूत बनतात.
- या आसनाच्या सरावामुळे सर्व अंतःस्रावी ग्रंथी सक्रिय बनतात. त्यामुळे शरीर निरोगी व स्फूर्तिशील राहते.
- या आसनामुळे ओटीपोटावर चांगला ताण पडत असल्याने पोट, आतडी, लिव्हर, किडनी, प्लिहा यातील दोष दूर होऊन ते सुदृढ बनतात.
- अजीर्ण, वायुविकार, बद्धकोष्टता आणि मुळव्याधीसाठी हे आसन म्हणजे रामबाण औषध आहे.
- मधुमेह झालेल्या रोग्यांसाठी हे आसन अत्यंत फायदेशीर आहे, कारण या आसनामुळे स्वादुपिंडातील (पॅनक्रियास) सर्व पेशी सक्रिय बनतात. व स्वादुपिंडाची कार्यक्षमता वाढते. तसेच रक्ताभिसरण चांगल्या प्रकारे होते.

Comments
Post a Comment
आपल्या सुचनांचे स्वागत आहे.
भेट दिल्या बद्दल धन्यवाद. 🙏