उत्थित हस्त पादअंगुष्ठासन उत्थित हस्त पादअंगुष्ठासन हे आसन पायावर उभे राहून करण्याच्या प्रकारातील आसन आहे. येथे उत्थित म्हणजे वर उचलणे, हस्त म्हणजे हात, पाद किंवा पद म्हणजे पाय आणि अंगुष्ठ म्हणजे अंगठा. तसेच या आसनाला इंग्रजी मध्ये Extended Hand-To-Big-Toe-Pose असे म्हणतात. या आसनाचा सराव केल्याने शारीरिक व मानसिक संतुलन बनून राहते तसेच आपली एकाग्रता वाढते. उत्थित हस्त पादअंगुष्ठासन ची कृती आणि फायदे या बद्दल माहिती आपण खाली जाणून घेऊयात. (utthita hasta padangusthasana benefits and steps information in marathi) image source: https://pixahive.com/photo/utthita-hasta-padangustasana-extended-hand-to-big-toe-2/ कृती: सर्वप्रथम आपल्या योग करण्याच्या आसनावर आपल्या दोन्ही पायावर सरळ उभे राहा. आता एक खोल श्वास घेऊन आपला उजवा पाय गुडघ्यात वाकवून आपल्या पोटाजवळ आणा. आता आपल्या उजव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडा आणि आकृतीत दाखवल्या प्रमाणे हळू हळू पाय डोक्याकडे वर उचला. हि कृती करताना आपला तोल जाणार नाही याची दक्षता घ्या....
भुजंगासन (Bhujangasana) माहिती | फायदे, कृती, काळजी व उपयोग भुजंगासन म्हणजे काय? 'भुजंग' म्हणजे नाग किंवा साप. या आसनामध्ये शरीराचा आकार फणा काढलेल्या नागासारखा दिसतो म्हणून या आसनाला भुजंगासन (Bhujangasana) असे म्हणतात. इंग्रजीमध्ये याला Cobra Pose असे म्हणतात. हे पोटावर झोपून केले जाणारे एक प्रभावी योगासन असून पाठीचा कणा, खांदे, छाती आणि पोटाच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जण संगणकासमोर तासन्तास बसून काम करतात. त्यामुळे पाठदुखी, मानेचा त्रास आणि शरीराची लवचिकता कमी होणे या समस्या वाढताना दिसतात. अशा वेळी योग्य पद्धतीने आणि नियमितपणे केलेले भुजंगासन शरीराला मोठा फायदा देऊ शकते. माझा भुजंगासनाचा अनुभव (My Experience) मी व्यवसायाने IT क्षेत्रात Automation Test Engineer म्हणून काम करतो. माझ्या कामाचा बहुतांश वेळ संगणकासमोर बसून जातो. सुरुवातीला सलग ८–१० तास बसून काम केल्यामुळे मला वारंवार पाठदुखी, मानेचा ताण आणि खांद्यामध्ये जडपणा जाणवू लागला. काही दिवस तर सकाळी उठल्यावरही पाठीमध्ये ताठरपणा जाणवत असे. यानंतर मी नियमित य...