Skip to main content

कूर्मासन कृती आणि फायदे | Kurmasana steps and benefits

कूर्मासन

 कूर्म हा संस्कृत शब्द असून या शब्दाचा अर्थ कासव असा होतो. "कूर्मासन" हे आसन करताना आपल्या शरीराचा आकार कासवाप्रमाणे बनतो किंवा दिसतो म्हणून या आसनाला कुर्मासन असे म्हणतात. तसेच या आसनाला  इंग्रजी मध्ये "Tortoise Pose" असे म्हणतात. या आसनाच्या सरावामुळे मानसिक तणाव कमी होतो व मनाची एकाग्रता साधल्या जाते. कुर्मासन कसे करावे म्हणजे कुर्मासनाची कृती आणि त्यापासून आपल्या शरीराला होणारे फायदे या बद्दल सविस्तर मराठी मध्ये माहिती आपण खाली जाणून घेऊयात. (Kurmasana steps and benefits in marathi)

tortoisse pose
image source: https://commons.wikimedia.org/wiki/File:K%C5%ABrm%C4%81sana_-_Tortoise_Pose_with_Hands_Facing_Back.jpg

कृती: 

  • आपल्या योगासने करण्याच्या आसनावर आपले दोन्ही पाय पुढे सरळ लांब करून बसा. 
  • आपल्याला शक्य होईल तेव्हडे जास्तीत जास्त अंतर आपल्या दोन्ही पायामधे ठेवण्याचा प्रयत्न करा. 
  • दोन्ही पायांच्या टाचा जमिनीला घट्ट चिटकवून राहूद्या. 
  • आता कमरेतून हळू हळू  समोर वाका, कमरेतून समोर वाकल्यामुळे आपल्या पाठीला वाक येणार नाही. 
  • दोन्ही पाय गुडघ्यामध्ये थोडे वाकवून वरील चित्रात दाखवल्या प्रमाणे दोन्ही हात गुडघे आणि जमिनीच्या फटीमधून बाहेर काढा. 
  • शरीर पुढे नेने आणि आपले हात गुडघ्याच्या फटीतून बाहेर काढणे या दोन्ही क्रिया एकत्रच सुरु राहतील. 
  • आत आपले खांदे आणि हनुवटी जमिनीला लागेपर्यंत समोर वाकत राहा सोबतच आपले दोन्ही हात सरळ बाहेर लांबवत राहा. 
  • या आसनाच्या शेवटच्या स्तिथीत आपले खांदे आणि हनुवटी जमिनीला टेकलेली असते. 
  • आता आपले डोळे बंद करून आपल्या श्वासोश्वासावर लक्ष केंद्रित करा. 

फायदे: 

  1. या आसनाचा नियमित सराव आपल्याला आपली एकाग्रता वाढविण्यासाठी मदत करतो. 
  2. या आसनामुळे आपले मन स्थिरावून आपल्या मनाला एक अलौकिक शांतता मिळते. 
  3. हे आसन करताना आपल्या पाठीच्या मणक्यावर हलकासा ताण पडतो व तेथील रक्तसंचालन सुरळीत होते. 
  4. हे आसन करताना आपल्या पोटावर सुद्धा हलकासा ताण पडतो त्यामुळे पोटामधील सर्व इंद्रियांचा व्यायाम होतो व आपले पाचन तंत्र सुधारते.
  5. बद्धकोष्ठतेचा त्रास सुद्धा या आसनाच्या नियमित सरावामुळे कायमचा बंद होतो. 
  6. या आसनाच्या सरावामुळे पोटावरील चरबी सुद्धा कमी होते. 
  7. या आसनाचा नियमित सराव केल्यास हर्नियाचा त्रास कायमचा बंद होतो. 
  8. हे आसन केल्यामुळे आपल्या शरीरातील जवळपास प्रत्येक सांध्यांना भरपूर व्यायाम मिळतो आणि ते मजबूत बनतात. 
  9. या आसनाच्या सरावामुळे आपली श्वसन प्रणाली सुद्धा सुधारते. 
महत्वाची सूचना: आपल्याला जर गुडघे, कंबर, खांदे यांचा काही त्रास असल्यास हे आसन करू नये  तसेच गरोदर स्त्रियांनी हे आसन करू नये. 
हे आसन करण्यासाठी थोडे अवघड असल्यामुळे सुरुवातीला हे आसन योगा शिक्षकाच्या मार्गदर्शनाखाली करावे 
. 

Comments

Popular posts from this blog

भुजंगासन (Bhujangasana) माहिती | फायदे, कृती, काळजी व उपयोग | ByYogesh

भुजंगासन (Bhujangasana) माहिती | फायदे, कृती, काळजी व उपयोग  भुजंगासन म्हणजे काय? 'भुजंग' म्हणजे नाग किंवा साप. या आसनामध्ये शरीराचा आकार फणा काढलेल्या नागासारखा दिसतो म्हणून या आसनाला भुजंगासन (Bhujangasana) असे म्हणतात. इंग्रजीमध्ये याला Cobra Pose असे म्हणतात. हे पोटावर झोपून केले जाणारे एक प्रभावी योगासन असून पाठीचा कणा, खांदे, छाती आणि पोटाच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जण संगणकासमोर तासन्तास बसून काम करतात. त्यामुळे पाठदुखी, मानेचा त्रास आणि शरीराची लवचिकता कमी होणे या समस्या वाढताना दिसतात. अशा वेळी योग्य पद्धतीने आणि नियमितपणे केलेले भुजंगासन शरीराला मोठा फायदा देऊ शकते. माझा भुजंगासनाचा अनुभव (My Experience) मी व्यवसायाने IT क्षेत्रात Automation Test Engineer म्हणून काम करतो. माझ्या कामाचा बहुतांश वेळ संगणकासमोर बसून जातो. सुरुवातीला सलग ८–१० तास बसून काम केल्यामुळे मला वारंवार पाठदुखी, मानेचा ताण आणि खांद्यामध्ये जडपणा जाणवू लागला. काही दिवस तर सकाळी उठल्यावरही पाठीमध्ये ताठरपणा जाणवत असे. यानंतर मी नियमित य...

धनुरासन (Dhanurasana) माहिती | कृती, फायदे, काळजी आणि योग्य पद्धत

धनुरासन म्हणजे काय? धनुरासन (Dhanurasana) हे पोटावर झोपून केले जाणारे योगासन आहे. या आसनामध्ये दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून हातांनी घोटे पकडले जातात आणि छाती व पाय वर उचलले जातात. त्यामुळे शरीराचा आकार धनुष्याप्रमाणे दिसतो. म्हणून या आसनाला धनुरासन असे नाव देण्यात आले आहे. धनुरासन हे पाठीचा कणा, छाती, खांदे, पोट आणि पायांच्या स्नायूंवर काम करणारे एक मागे वाकण्याचे आसन आहे. नियमित आणि योग्य पद्धतीने सराव केल्यास शरीराची लवचिकता आणि स्नायूंची ताकद सुधारण्यास मदत होऊ शकते. धनुरासन आणि भुजंगासनाचा संबंध धनुरासन करताना शरीराचा पुढील भाग वर उचलला जात असल्यामुळे त्यामध्ये भुजंगासनासारखा मागे वाकण्याचा भाग जाणवतो. तसेच पाय वर उचलल्यामुळे शरीराच्या मागील भागातील स्नायूंवरही ताण येतो. मात्र धनुरासन हे भुजंगासन आणि शलभासन यांचे केवळ साधे "एकत्रीकरण" आहे असे म्हणण्यापेक्षा, या दोन्ही आसनांमध्ये आढळणाऱ्या काही हालचालींसारखी शरीराची स्थिती धनुरासनात दिसते , असे सांगणे अधिक योग्य आहे. माझा योगाभ्यासाचा अनुभव मी IT क्षेत्रात काम करत असल्यामुळे माझ्या कामाचा बराच वेळ संगणकासमोर ब...

पद्मासन (Padmasana) माहिती मराठीत | कृती, फायदे आणि खबरदारी

पद्मासन (Padmasana) माहिती मराठीत | कृती, फायदे आणि खबरदारी पद्मासन (Padmasana) हे योगातील सर्वात प्रसिद्ध आणि पारंपरिक ध्यानासनांपैकी एक आहे. "पद्म" म्हणजे कमळ. या आसनामध्ये बसल्यावर शरीराचा आकार कमळासारखा दिसतो, म्हणून याला पद्मासन किंवा इंग्रजीमध्ये Lotus Pose असे म्हणतात. ध्यान, प्राणायाम आणि मानसिक शांततेसाठी हे आसन अत्यंत उपयुक्त मानले जाते. नियमित सराव केल्यास शरीराची लवचिकता वाढण्यास, मन शांत राहण्यास आणि एकाग्रता सुधारण्यास मदत होऊ शकते. महत्त्वाची सूचना: पद्मासन करताना शरीरावर जबरदस्ती करू नका. गुडघा किंवा घोट्याचा त्रास असल्यास योगतज्ज्ञांचा सल्ला घ्या. पद्मासन कसे करावे? (Padmasana Steps) स्वच्छ आणि सपाट जागेवर चटई अंथरून बसा. दोन्ही पाय समोर सरळ पसरवा. उजवा पाय अलगद उचलून डाव्या मांडीवर ठेवा. त्यानंतर डावा पाय उचलून उजव्या मांडीवर ठेवा. दोन्ही गुडघे जमिनीच्या दिशेने ठेवण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा आणि अंगठा व तर्जनी एकमेकांना स्पर्श करून ज्ञानमुद्रा धरा. पाठीचा कणा, मान आणि डोके सरळ ठेवा. डोळे बंद करून सामान्य श्वास घेत १ ते ५ मिनिटे ध्यान क...