जर आपल्याला नेहमी सर्दी होत असेल तर तुम्ही 'विपरीत मत्स्यासन' करायला हवे, या आसनाच्या नियमित सरावाने हा त्रास नक्कीच दूर होतो. त्याचबरोबर बद्धकोष्टता, गॅसविकार, अग्निमांद्य, अजीर्ण, सर्दी, वातविकार, क्षय, दमा, मुरडा व संग्रहणीसारखे रोग या आसनाच्या नित्य सरावाने नष्ट होतात. हे आसन 'मत्स्यासनच्या' उलट स्तिथीत आहे. हे आसन पालथे झोपून मत्स्यासनाप्रमाणेच केले जाते. म्हणून या आसनाला 'विपरीत मत्स्यासन' असे म्हणतात. कृती: प्रथम डाव्या कुशीवर झोपा व दोन्ही पाय पद्मासनाच्या स्तिथीत आणा. आता छाती व पोट जमिनीला स्पर्श करेल अश्या प्रकारे पालथे झोपा. त्यानंतर हनुवटी जमिनीवर टेकवा. दोन्ही हातानी त्या त्या भागाचा पायाचा अंगठा पकडा. धीम्या गतीने श्वास घ्या. आठ ते दहा सेकंदा पर्यंत या स्तिथीत रहा. सुरुवातीला हे आसन फक्त आठ ते दहा सेकंदच करावे नंतर हळूहळू सरावानंतर हे आसन आपण दहा मिनिटापर्यंत करू शकतो. फायदे: या आसनाच्या नियमित सरावामुळे फुफ्फुसे सुदृढ व मजबूत बनतात. या आसनामुळे पाठीच्या कण्याला...
भुजंगासन 'भुजंग' म्हणजे साप. या आसनामध्ये शरीराचा आकार नागाच्या उभारलेल्या फण्यासारखा दिसतो म्हणून या आसनास 'भुजंगासन' असे म्हणतात. येथे आपण भुजंगासन त्याची कृती व आपल्या शरीराला त्याचे होणारे फायदे या बद्दल संपूर्ण माहिती आपल्या मायबोली मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. (Bhujangasana information in Marathi) pic credit: https://pixahive.com/photo/purn-bhujangasana/ कृती: भुजंगासन हे पोट जमिनीला टेकवून करण्याच्या आसनपद्धती पैकी एक आसन आहे, त्यामुळे प्रथम जमीनीवर पालथे झोपा. हनुवटी छातीला टेकवा आणि कपाळ जमिनीला टेकवा. सर्व शरीर हलके करा. हाताचे पंजे छातीजवळ आना नंतर हातांच्या पंज्यावर शरीराचा भार देऊन बेंबीपासूनचा भाग हळू हळू वर उचला. कमरेखालचा भाग बिलकुल हलू देऊ नका. आकृतीत दाखवल्या प्रमाणे कृती करा. पायाची बोटे ताणून जमिनीवर टेकवा . असे केल्याने पाठ आणि खांद्याच्या मधील भागातील स्नायू व्यवस्तीत ताणले जातात. पोटातील सर्व स्नायूंवर सुद्धा व्यवस्तीत ताण पडतो. या आसनस्थितीत श्वास रोखून धरा. आठ ते दहा सेकंद हे असं क...