चतुरंग दंडासन "चतुरंग दंडासन" या आसनाच्या नावाची फोड केली तर आपल्याला या नावाचा अर्थ समजेल. चतुरंग = चतुर + अंग आणि दंडासन = दंड + आसन. चतुर म्हणजेच चार, अंग म्हणजे आपल्या शरीर, दंड म्हणजे मजबूत काठी आणि आसन म्हणजेच मुद्रा. हे आसन करताना आपल्या शरीराचे चार भाग एका मजबूत आणि सरळ काठी प्रमाणे बनतात म्हणून या आसनाला "चतुरंग दंडासन" असे म्हणातात. हे आसन सुरुवातीला करण्यासाठी थोडे अवघड असले तरी या आसनामुळे आपल्याला बरेच फायदे मिळतात. ज्या लोकांनी नवीनच योगासने करण्यासाठी सुरवात केली आहे त्यांच्या साठी हेआसन खूप फायदेशीर आहे कारण या आसनामुळे त्यांचे शरीर मजबूत आणि स्थिर बनेल तसेच पुढचे काही कठीण आसने करण्यास कार्यक्षम बनेल. हे आसन केल्यामुळे आपल्या शरीराला मजबुती मिळते तसेच आपले पोट सुटत नाही किंवा सुटलेले असल्यास ते कमी होते. या आसनाची कृती आणि फायदे या बद्दल सर्व माहिती मराठी मध्ये खाली बघणार आहोत. (Chaturanga Dandasana information in Marathi) pic credit: https://ccnull.de/foto/yoga-low-plank/1008076 कृती: आपल्या योगा करण्याच्या आसनावर (Yoga Mat ) पोटाव...
भुजंगासन (Bhujangasana) माहिती | फायदे, कृती, काळजी व उपयोग भुजंगासन म्हणजे काय? 'भुजंग' म्हणजे नाग किंवा साप. या आसनामध्ये शरीराचा आकार फणा काढलेल्या नागासारखा दिसतो म्हणून या आसनाला भुजंगासन (Bhujangasana) असे म्हणतात. इंग्रजीमध्ये याला Cobra Pose असे म्हणतात. हे पोटावर झोपून केले जाणारे एक प्रभावी योगासन असून पाठीचा कणा, खांदे, छाती आणि पोटाच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जण संगणकासमोर तासन्तास बसून काम करतात. त्यामुळे पाठदुखी, मानेचा त्रास आणि शरीराची लवचिकता कमी होणे या समस्या वाढताना दिसतात. अशा वेळी योग्य पद्धतीने आणि नियमितपणे केलेले भुजंगासन शरीराला मोठा फायदा देऊ शकते. माझा भुजंगासनाचा अनुभव (My Experience) मी व्यवसायाने IT क्षेत्रात Automation Test Engineer म्हणून काम करतो. माझ्या कामाचा बहुतांश वेळ संगणकासमोर बसून जातो. सुरुवातीला सलग ८–१० तास बसून काम केल्यामुळे मला वारंवार पाठदुखी, मानेचा ताण आणि खांद्यामध्ये जडपणा जाणवू लागला. काही दिवस तर सकाळी उठल्यावरही पाठीमध्ये ताठरपणा जाणवत असे. यानंतर मी नियमित य...