एकपाद उत्तानासन हे जामिनाला पाठ टेकून करण्याच्या आसन प्रकारातील एक आसन आहे. या आसनाच्या नियमित सरावामुळे फुफुसांना व पोटाच्या स्नायूंना भरपूर व्यायाम मिळतो, तसेच हे आसन स्त्रियांच्या मासिक पाळी संबंधीच्या तक्रारीवर एक उत्तम उपाय आहे. कृती: प्रथम जमिनीवर झोपा. दोन्ही पाय एकमेकांना चिटकून ठेवा. दोन्ही हात आपल्या शरीराला सरळ समांतर ठेवा. एक पाय सैल ठेवा व दुसऱ्या पायाच्या चवड्याला पुढील बाजूने ताण पडेल असा वर न्या. आता श्वास रोखून ठेवा, सहा ते आठ सेकंदापर्यंत ह्याच स्थितीत राहा. आता पाय हळूहळू खाली आणा. रोखलेला श्वास धीम्या गतीने सोडून द्या. आठ ते दहा सेकंद आराम करून हीच कृती दुसऱ्या पायाने करा. सुरुवातीला हि क्रिया काही दिवस दोन्ही पायांनी चार वेळा व सरावानंतर हि कृती सहा वेळा करावी. हे आसन करण्यास सोपे असल्याने प्रत्येकाने हे आसन नियमित करावे. फायदे: या आसनामुळे पोटातील स्नायूंना भरपूर व्यायाम मिळतो. पोटावरील चरबी कमी करण्यासाठी हे आसन अत्यंत उपयुक्त आहे, या आसनाच्या नियमित सरावामुळे स्रियांच्या ...
भुजंगासन (Bhujangasana) माहिती | फायदे, कृती, काळजी व उपयोग भुजंगासन म्हणजे काय? 'भुजंग' म्हणजे नाग किंवा साप. या आसनामध्ये शरीराचा आकार फणा काढलेल्या नागासारखा दिसतो म्हणून या आसनाला भुजंगासन (Bhujangasana) असे म्हणतात. इंग्रजीमध्ये याला Cobra Pose असे म्हणतात. हे पोटावर झोपून केले जाणारे एक प्रभावी योगासन असून पाठीचा कणा, खांदे, छाती आणि पोटाच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जण संगणकासमोर तासन्तास बसून काम करतात. त्यामुळे पाठदुखी, मानेचा त्रास आणि शरीराची लवचिकता कमी होणे या समस्या वाढताना दिसतात. अशा वेळी योग्य पद्धतीने आणि नियमितपणे केलेले भुजंगासन शरीराला मोठा फायदा देऊ शकते. माझा भुजंगासनाचा अनुभव (My Experience) मी व्यवसायाने IT क्षेत्रात Automation Test Engineer म्हणून काम करतो. माझ्या कामाचा बहुतांश वेळ संगणकासमोर बसून जातो. सुरुवातीला सलग ८–१० तास बसून काम केल्यामुळे मला वारंवार पाठदुखी, मानेचा ताण आणि खांद्यामध्ये जडपणा जाणवू लागला. काही दिवस तर सकाळी उठल्यावरही पाठीमध्ये ताठरपणा जाणवत असे. यानंतर मी नियमित य...