एकपाद उत्तानासन हे जामिनाला पाठ टेकून करण्याच्या आसन प्रकारातील एक आसन आहे. या आसनाच्या नियमित सरावामुळे फुफुसांना व पोटाच्या स्नायूंना भरपूर व्यायाम मिळतो, तसेच हे आसन स्त्रियांच्या मासिक पाळी संबंधीच्या तक्रारीवर एक उत्तम उपाय आहे.
कृती:
- प्रथम जमिनीवर झोपा.
- दोन्ही पाय एकमेकांना चिटकून ठेवा.
- दोन्ही हात आपल्या शरीराला सरळ समांतर ठेवा.
- एक पाय सैल ठेवा व दुसऱ्या पायाच्या चवड्याला पुढील बाजूने ताण पडेल असा वर न्या.
- आता श्वास रोखून ठेवा, सहा ते आठ सेकंदापर्यंत ह्याच स्थितीत राहा.
- आता पाय हळूहळू खाली आणा.
- रोखलेला श्वास धीम्या गतीने सोडून द्या.
- आठ ते दहा सेकंद आराम करून हीच कृती दुसऱ्या पायाने करा.
सुरुवातीला हि क्रिया काही दिवस दोन्ही पायांनी चार वेळा व सरावानंतर हि कृती सहा वेळा करावी. हे आसन करण्यास सोपे असल्याने प्रत्येकाने हे आसन नियमित करावे.
फायदे:
- या आसनामुळे पोटातील स्नायूंना भरपूर व्यायाम मिळतो.
- पोटावरील चरबी कमी करण्यासाठी हे आसन अत्यंत उपयुक्त आहे,
- या आसनाच्या नियमित सरावामुळे स्रियांच्या मासिक पाळीसंबंधीच्या तक्रारी दूर होतात.
- या आसनामुळे बद्धकोष्टता,अपचन, वातविकार(गॅस) तसेच आतड्यासंबंधी विविध व्याधी दूर होतात.
- पायातील रक्ताभिसरण चांगल्याप्रकारे होऊन गुडघा व गुडघ्याखालील पाय दुखण्याच्या तक्रारी या आसनाने दूर होतात.
- या आसनामुळे फुफ्फुसे सुदृढ बनतात.
Comments
Post a Comment
आपल्या सुचनांचे स्वागत आहे.
भेट दिल्या बद्दल धन्यवाद. 🙏