आता आपण पायावरील आसनांचे प्रकार बघूयात. या आसनामध्ये शरीराचा आकार गरुडाप्रमाणे दिसतो म्हणून याला ' गरुडासन ' (Garudasana)असे म्हणतात. इंग्रजी मध्ये या आसनाला इगल पोझ (Eagle pose) असे म्हणतात. या आसनाच्या नियमित सरावामुळे हातापायांमधील संधिवाताचा त्रास दूर होतो तसेच एकाग्रता वाढविण्यासाठी सुद्धा या आसनाची भरपूर मदत होते. pic credit- https://pixahive.com/photo/garudasana-yoga/ कृती: प्रथम दोन्ही पायांवर सरळ उभे राहा. उजवा पाय सरळ ठेऊन डावा पाय आकृतीत दाखवल्याप्रमाणे उजव्या पायाच्या गुडघ्यावरून त्याला विळखा घाला. डाव्या पायाची मांडी उजव्या मांडीवर आना आणि डाव्या पायाच्या पंजाचे टोक जमिनीकडे आना. त्यानंतर पायांची जमिनीला घट्ट पकड ठेऊन स्थिर उभे राहण्याचा प्रयत्न करा. आता हातांचा विळखा घालून हातांचा नमस्कार करावा. आकृतीत दाखविल्या प्रमाणे या स्थितीत हाताचे कोपर जामिनाला काटकोनात येतील याचा प्रयत्न हात चेहऱ्याच्या समोर ठेवावे, या स्तिथीत आपले दोन्ही हात गरुडाच्या चोची प्रमाणे दिसतात. हि सर्व क्रिया चालू असताना श्वासोच्छवास चालू ठेवावा. या...
भुजंगासन 'भुजंग' म्हणजे साप. या आसनामध्ये शरीराचा आकार नागाच्या उभारलेल्या फण्यासारखा दिसतो म्हणून या आसनास 'भुजंगासन' असे म्हणतात. येथे आपण भुजंगासन त्याची कृती व आपल्या शरीराला त्याचे होणारे फायदे या बद्दल संपूर्ण माहिती आपल्या मायबोली मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. (Bhujangasana information in Marathi) pic credit: https://pixahive.com/photo/purn-bhujangasana/ कृती: भुजंगासन हे पोट जमिनीला टेकवून करण्याच्या आसनपद्धती पैकी एक आसन आहे, त्यामुळे प्रथम जमीनीवर पालथे झोपा. हनुवटी छातीला टेकवा आणि कपाळ जमिनीला टेकवा. सर्व शरीर हलके करा. हाताचे पंजे छातीजवळ आना नंतर हातांच्या पंज्यावर शरीराचा भार देऊन बेंबीपासूनचा भाग हळू हळू वर उचला. कमरेखालचा भाग बिलकुल हलू देऊ नका. आकृतीत दाखवल्या प्रमाणे कृती करा. पायाची बोटे ताणून जमिनीवर टेकवा . असे केल्याने पाठ आणि खांद्याच्या मधील भागातील स्नायू व्यवस्तीत ताणले जातात. पोटातील सर्व स्नायूंवर सुद्धा व्यवस्तीत ताण पडतो. या आसनस्थितीत श्वास रोखून धरा. आठ ते दहा सेकंद हे असं क...