'वृष' म्हणजे बैल. हे आसन करताना आपल्या शरीराचा आकार बैलाच्या तोंडासारखा बनत असल्यामुळे या आसनास 'वृषासन' असे म्हणतात. हे आसन शरीरात शक्ती व जोम निर्माण करणारे आहे. तारुण्यात शरीरात अकाली निर्माण झालेली दुर्बलता व शिथिलता हि वृद्धावस्थेची लक्षणे आहेत. या आसनाच्या नियमित सरावामुळे हि शिथिलता व दुर्बलता नष्ट करून शरीरात जोम व उत्साह निर्माण होतो. कृती: उजवा पाय गुडघ्यात दुमडावा आणि टाच गुद्द्वाराच्या खाली येईल अश्या अवस्थेत बसा. डावा गुडघा उजव्या गुडघ्यावर अश्या प्रकारे ठेवा की, डाव्या पायाची टाच उजव्या मांडीला स्पर्श करेल. त्यानंतर शरीर ताठ करा आणि उजव्या हाताचा पंजा गुडघ्यावर ठेवा व त्यावरच डाव्या हाताचा पंजा ठेवा. श्वासोच्छवास चालू ठेवा व नजर नाभिस्थानाकडे ठेवा. मन एकाग्र करून काही वेळ ध्यानस्थ बसा. फायदे: या आसनामुळे रक्ताभिसरण चांगल्या प्रकारे होते. त्यामुळे शरीर स्फूर्तिशाली राहते व मन प्रसन्न बनते. हे आसन श्वसनतंत्र सक्रिय सुव्यवस्थित बनवते. या आसनाच्या नियमित सरावाने धातुक्षय, गॅस, स्वप्नदोष, अजीर्ण होणे, कंबर दुखणे नि...
भुजंगासन (Bhujangasana) माहिती | फायदे, कृती, काळजी व उपयोग भुजंगासन म्हणजे काय? 'भुजंग' म्हणजे नाग किंवा साप. या आसनामध्ये शरीराचा आकार फणा काढलेल्या नागासारखा दिसतो म्हणून या आसनाला भुजंगासन (Bhujangasana) असे म्हणतात. इंग्रजीमध्ये याला Cobra Pose असे म्हणतात. हे पोटावर झोपून केले जाणारे एक प्रभावी योगासन असून पाठीचा कणा, खांदे, छाती आणि पोटाच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जण संगणकासमोर तासन्तास बसून काम करतात. त्यामुळे पाठदुखी, मानेचा त्रास आणि शरीराची लवचिकता कमी होणे या समस्या वाढताना दिसतात. अशा वेळी योग्य पद्धतीने आणि नियमितपणे केलेले भुजंगासन शरीराला मोठा फायदा देऊ शकते. माझा भुजंगासनाचा अनुभव (My Experience) मी व्यवसायाने IT क्षेत्रात Automation Test Engineer म्हणून काम करतो. माझ्या कामाचा बहुतांश वेळ संगणकासमोर बसून जातो. सुरुवातीला सलग ८–१० तास बसून काम केल्यामुळे मला वारंवार पाठदुखी, मानेचा ताण आणि खांद्यामध्ये जडपणा जाणवू लागला. काही दिवस तर सकाळी उठल्यावरही पाठीमध्ये ताठरपणा जाणवत असे. यानंतर मी नियमित य...