'वृष' म्हणजे बैल. हे आसन करताना आपल्या शरीराचा आकार बैलाच्या तोंडासारखा बनत असल्यामुळे या आसनास 'वृषासन' असे म्हणतात. हे आसन शरीरात शक्ती व जोम निर्माण करणारे आहे. तारुण्यात शरीरात अकाली निर्माण झालेली दुर्बलता व शिथिलता हि वृद्धावस्थेची लक्षणे आहेत. या आसनाच्या नियमित सरावामुळे हि शिथिलता व दुर्बलता नष्ट करून शरीरात जोम व उत्साह निर्माण होतो.
कृती:
- उजवा पाय गुडघ्यात दुमडावा आणि टाच गुद्द्वाराच्या खाली येईल अश्या अवस्थेत बसा.
- डावा गुडघा उजव्या गुडघ्यावर अश्या प्रकारे ठेवा की, डाव्या पायाची टाच उजव्या मांडीला स्पर्श करेल.
- त्यानंतर शरीर ताठ करा आणि उजव्या हाताचा पंजा गुडघ्यावर ठेवा व त्यावरच डाव्या हाताचा पंजा ठेवा.
- श्वासोच्छवास चालू ठेवा व नजर नाभिस्थानाकडे ठेवा.
- मन एकाग्र करून काही वेळ ध्यानस्थ बसा.
फायदे:
- या आसनामुळे रक्ताभिसरण चांगल्या प्रकारे होते. त्यामुळे शरीर स्फूर्तिशाली राहते व मन प्रसन्न बनते.
- हे आसन श्वसनतंत्र सक्रिय सुव्यवस्थित बनवते.
- या आसनाच्या नियमित सरावाने धातुक्षय, गॅस, स्वप्नदोष, अजीर्ण होणे, कंबर दुखणे निद्रानाश, हृदयविकार, दमा, मुरडा इत्यादी रोग नाहीसे होतात.
- या आसनामुळे कुंडलिनी शक्ती जागृत होऊन सुषुम्ना नाडीच्या मुखात प्रवेश करते.
- या आसनाच्या नियमित सरावाने शरीरातील सर्व स्नायू सुदृढ बनतात.
Comments
Post a Comment
आपल्या सुचनांचे स्वागत आहे.
भेट दिल्या बद्दल धन्यवाद. 🙏