पूर्वोतानासन पूर्वोतानासन, हे आसन करताना आपल्या शरीराचा धडाच भाग वर उचल्या जातो. येथे पूर्व म्हणजेच पूर्व दिशा नसून आपल्या शरीराचा वरील भाग आणि उत्तानासन म्हणजेच वर उचलणे किंवा खेचून धरणे असा होतो. या आसनाच्या नियमित सरावामुळे आपल्याला जीवनातील दैनंदिन ताण तणावापासून मुक्ततता मिळते. तसेच थॉयरॉईड(Thyroid) ग्रंथीचे कार्य सुधारते व आपली शारीरिक कमजोरी दूर होऊन शरीरात नवचैतन्य निर्माण झाल्याची अनुभूती येते. या आसनालाच इंग्रजी मध्ये Upword Plank Pose किंवा East Streaching Pose असे सुद्धा म्हणतात. पूर्वोतानासन या आसनाची कृती आणि फायदे या बद्दल संपूर्ण माहिती पुढे आपण आपल्या मायबोली मराठी भाषेमध्ये जाणून घेऊयात. (Purvottanasan information in marathi) Image Source : https://pixahive.com/photo/east-streching-pose-purvottanasana/ कृती : आपल्या नियमित योग करण्याच्या आसनावर आपले दोन्ही पाय सरळ लांबवून बसा. बसलेले असताना आपल्या पाठीचा कणा सुद्धा ताठ ठेवा. आपले दोन्ही पाय एकमेकांना स्पर्श करतील असे चिपकवून राहू द्या. आत...
भुजंगासन (Bhujangasana) माहिती | फायदे, कृती, काळजी व उपयोग भुजंगासन म्हणजे काय? 'भुजंग' म्हणजे नाग किंवा साप. या आसनामध्ये शरीराचा आकार फणा काढलेल्या नागासारखा दिसतो म्हणून या आसनाला भुजंगासन (Bhujangasana) असे म्हणतात. इंग्रजीमध्ये याला Cobra Pose असे म्हणतात. हे पोटावर झोपून केले जाणारे एक प्रभावी योगासन असून पाठीचा कणा, खांदे, छाती आणि पोटाच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जण संगणकासमोर तासन्तास बसून काम करतात. त्यामुळे पाठदुखी, मानेचा त्रास आणि शरीराची लवचिकता कमी होणे या समस्या वाढताना दिसतात. अशा वेळी योग्य पद्धतीने आणि नियमितपणे केलेले भुजंगासन शरीराला मोठा फायदा देऊ शकते. माझा भुजंगासनाचा अनुभव (My Experience) मी व्यवसायाने IT क्षेत्रात Automation Test Engineer म्हणून काम करतो. माझ्या कामाचा बहुतांश वेळ संगणकासमोर बसून जातो. सुरुवातीला सलग ८–१० तास बसून काम केल्यामुळे मला वारंवार पाठदुखी, मानेचा ताण आणि खांद्यामध्ये जडपणा जाणवू लागला. काही दिवस तर सकाळी उठल्यावरही पाठीमध्ये ताठरपणा जाणवत असे. यानंतर मी नियमित य...