Skip to main content

Utkatasana Information in Marathi | उत्कटासन मराठी माहिती | Chair Pose

उत्कटासन 

या आसनाचा नियमित सराव केल्यास आपल्या मांड्यांचे व पोटऱ्यांचे स्नायू मजबूत बनतात. तसेच या आसनाचा नियमित सराव आपला उत्साह व जोम वाढविण्यास मदत करतो. हे आसन करताना आपल्या शरीराचा आकृतिबंध आपण एखाद्या खुर्चीमध्ये बसतो त्या प्रमाणे तयार होतो. त्यामुळे या आसनाला इंग्रजी मध्ये चेअर पोझ (Chair Pose) असे म्हणतात. या आसनाची कृती व फायदे या बद्दल सविस्तर मराठी माहिती आपण खाली जाणून घेऊयात. (Utkatasana Information in Marath)
utkatasana
Image source: https://pixahive.com/photo/utkatasana-chair-pose/

कृती:

  • सर्वप्रथम आपल्या योग करण्याच्या आसनावर, आपल्या दोन्ही पायांमध्ये काही अंतर ठेऊन सरळ उभे राहा.(साधारणतः ७ ते ९ इंच एवढे अंतर राहूद्या ) 
  • या नंतर आपले दोन्ही हात समोर लांबवून आपल्या खांद्याला समांतर राहतील असे राहू द्या. 
  • आपले तळहात जमिनीकडे असतील याची काळजी घ्या. वरील आकृतीत दाखविल्या प्रमाणे. 
  • आता आपण एखाद्या खुर्चीमध्ये बसताना जसे वाकतो तसे वाका. 
  • असे करताना आपले नितंब मागच्या बाजूला जाईल तसेच आपले गुडघे हे पायांच्या तळव्याच्या पुढे जाणार नाहीत याची काळजी घ्या. 
  • हि कृती करत असताना आपला श्वासोश्वास निमित्त चालू राहू द्या. 
  • हे आसन करताना आपल्या मांड्या आपल्या पोटऱ्यांना स्पर्श करणार नाहीत याची दक्षता घ्या. 
  • या स्थितीत १० ते १५ सेकंद राहिल्या नंतर परत आपल्या पूर्व स्थितीत या. 
  • या आसनाची किमान २ ते ३ वेळा पुनरावृत्ती करा. 

फायदे: 

  1. या आसनाच्या सरावामुळे आपल्या मांड्या, पोटऱ्या व घोटे मजबूत बनतात. 
  2. मांड्यांच्या व पोटर्यांच्या स्नायूंना भरपूर व्यायाम मिळून ते मजबूत आणि प्रमाणबद्ध बनतात. 
  3. पाठीच्या आणि कमरेच्या भागावर ताण पडून तेथील स्नायू सुद्धा मजबूत बनतात. 
  4. या आसनाच्या नियमित सरावामुळे पोट सुटत नाही. 
  5. हे आसन करताना शारीरिक तोल सांभाळावा लागतो म्हणून याला तोलासन असे सुद्धा म्हणतात, या आसनाच्या सरावामुळे मन शांत होते, स्थिरावते. 
  6. या आसनाच्या नियमित सरावामुळे शरीर हलके होते व आपला उत्साह वाढतो. 

महत्वाची सूचना:

 गुडघ्यांचा, कमरेचा किंवा घोट्यांचा काही त्रास असल्यास तसेच पायांना कोणतिही दुखापत असल्यास हे आसन करू नये. 
कंबरदुखीचा त्रास असल्यास हे आसन योग शिक्षकाच्या योग्य मार्गदर्शनाखालीच करावे. 

Comments

Popular posts from this blog

भुजंगासन (Bhujangasana) माहिती | फायदे, कृती, काळजी व उपयोग | ByYogesh

भुजंगासन (Bhujangasana) माहिती | फायदे, कृती, काळजी व उपयोग  भुजंगासन म्हणजे काय? 'भुजंग' म्हणजे नाग किंवा साप. या आसनामध्ये शरीराचा आकार फणा काढलेल्या नागासारखा दिसतो म्हणून या आसनाला भुजंगासन (Bhujangasana) असे म्हणतात. इंग्रजीमध्ये याला Cobra Pose असे म्हणतात. हे पोटावर झोपून केले जाणारे एक प्रभावी योगासन असून पाठीचा कणा, खांदे, छाती आणि पोटाच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जण संगणकासमोर तासन्तास बसून काम करतात. त्यामुळे पाठदुखी, मानेचा त्रास आणि शरीराची लवचिकता कमी होणे या समस्या वाढताना दिसतात. अशा वेळी योग्य पद्धतीने आणि नियमितपणे केलेले भुजंगासन शरीराला मोठा फायदा देऊ शकते. माझा भुजंगासनाचा अनुभव (My Experience) मी व्यवसायाने IT क्षेत्रात Automation Test Engineer म्हणून काम करतो. माझ्या कामाचा बहुतांश वेळ संगणकासमोर बसून जातो. सुरुवातीला सलग ८–१० तास बसून काम केल्यामुळे मला वारंवार पाठदुखी, मानेचा ताण आणि खांद्यामध्ये जडपणा जाणवू लागला. काही दिवस तर सकाळी उठल्यावरही पाठीमध्ये ताठरपणा जाणवत असे. यानंतर मी नियमित य...

धनुरासन (Dhanurasana) माहिती | कृती, फायदे, काळजी आणि योग्य पद्धत

धनुरासन म्हणजे काय? धनुरासन (Dhanurasana) हे पोटावर झोपून केले जाणारे योगासन आहे. या आसनामध्ये दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून हातांनी घोटे पकडले जातात आणि छाती व पाय वर उचलले जातात. त्यामुळे शरीराचा आकार धनुष्याप्रमाणे दिसतो. म्हणून या आसनाला धनुरासन असे नाव देण्यात आले आहे. धनुरासन हे पाठीचा कणा, छाती, खांदे, पोट आणि पायांच्या स्नायूंवर काम करणारे एक मागे वाकण्याचे आसन आहे. नियमित आणि योग्य पद्धतीने सराव केल्यास शरीराची लवचिकता आणि स्नायूंची ताकद सुधारण्यास मदत होऊ शकते. धनुरासन आणि भुजंगासनाचा संबंध धनुरासन करताना शरीराचा पुढील भाग वर उचलला जात असल्यामुळे त्यामध्ये भुजंगासनासारखा मागे वाकण्याचा भाग जाणवतो. तसेच पाय वर उचलल्यामुळे शरीराच्या मागील भागातील स्नायूंवरही ताण येतो. मात्र धनुरासन हे भुजंगासन आणि शलभासन यांचे केवळ साधे "एकत्रीकरण" आहे असे म्हणण्यापेक्षा, या दोन्ही आसनांमध्ये आढळणाऱ्या काही हालचालींसारखी शरीराची स्थिती धनुरासनात दिसते , असे सांगणे अधिक योग्य आहे. माझा योगाभ्यासाचा अनुभव मी IT क्षेत्रात काम करत असल्यामुळे माझ्या कामाचा बराच वेळ संगणकासमोर ब...

पद्मासन (Padmasana) माहिती मराठीत | कृती, फायदे आणि खबरदारी

पद्मासन (Padmasana) माहिती मराठीत | कृती, फायदे आणि खबरदारी पद्मासन (Padmasana) हे योगातील सर्वात प्रसिद्ध आणि पारंपरिक ध्यानासनांपैकी एक आहे. "पद्म" म्हणजे कमळ. या आसनामध्ये बसल्यावर शरीराचा आकार कमळासारखा दिसतो, म्हणून याला पद्मासन किंवा इंग्रजीमध्ये Lotus Pose असे म्हणतात. ध्यान, प्राणायाम आणि मानसिक शांततेसाठी हे आसन अत्यंत उपयुक्त मानले जाते. नियमित सराव केल्यास शरीराची लवचिकता वाढण्यास, मन शांत राहण्यास आणि एकाग्रता सुधारण्यास मदत होऊ शकते. महत्त्वाची सूचना: पद्मासन करताना शरीरावर जबरदस्ती करू नका. गुडघा किंवा घोट्याचा त्रास असल्यास योगतज्ज्ञांचा सल्ला घ्या. पद्मासन कसे करावे? (Padmasana Steps) स्वच्छ आणि सपाट जागेवर चटई अंथरून बसा. दोन्ही पाय समोर सरळ पसरवा. उजवा पाय अलगद उचलून डाव्या मांडीवर ठेवा. त्यानंतर डावा पाय उचलून उजव्या मांडीवर ठेवा. दोन्ही गुडघे जमिनीच्या दिशेने ठेवण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा आणि अंगठा व तर्जनी एकमेकांना स्पर्श करून ज्ञानमुद्रा धरा. पाठीचा कणा, मान आणि डोके सरळ ठेवा. डोळे बंद करून सामान्य श्वास घेत १ ते ५ मिनिटे ध्यान क...