पश्चिमोत्तानासन जमिनीवर बसून करण्यात येणाऱ्या आसन प्रकारातील हे आसन असून, हे आसन करण्यासाठी थोडे अवघड आहे. या आसनाला उग्रासन असे सुद्धा म्हणतात. पश्चिमोत्तासनच्या नियमित सरावामुळे पोटातील चरबी कमी होण्यास मदत होते. स्त्रियांच्या मासिक पाळी संबंधी असणाऱ्या तक्रारी या आसनाच्या सरावाने कमी होतात. तसेच मनाची चंचलता या आसनाच्या सरावाने कमी होते. या आसनाची कृती आणि फायदे या बद्दल आपण संपूर्ण माहिती मराठी मध्ये जाणून घेऊयात.(Information and benefits of Paschimottanasana in marathi) pic credit- https://pixahive.com/photo/back-bend-yoga-paschimottanasana/ कृती: आपल्या योगा करण्याच्या आसनावर आपले पाय लांब पसरवून बसा. आता कमरेमध्ये हळू हळू समोर वाकून आपल्या दोन्ही पायाचे अंगठे पकडा. हि कृती करताना आपले दोन्ही पाय ताठ राहतील याची दक्षता घ्या. सुरुवातीला अंगठे पकडता नाही आले तर आपल्या दोन्ही पायांचे घोटे पकडले तरी चालतील. आता श्वास बाहेर सोडून आपले मस्तक आपल्या दोन्ही पायांच्या गुडघ्यांना टेकवण्याचा प्रयत्न करा. या स्थितीत आल्या नंतर आप...
भुजंगासन (Bhujangasana) माहिती | फायदे, कृती, काळजी व उपयोग भुजंगासन म्हणजे काय? 'भुजंग' म्हणजे नाग किंवा साप. या आसनामध्ये शरीराचा आकार फणा काढलेल्या नागासारखा दिसतो म्हणून या आसनाला भुजंगासन (Bhujangasana) असे म्हणतात. इंग्रजीमध्ये याला Cobra Pose असे म्हणतात. हे पोटावर झोपून केले जाणारे एक प्रभावी योगासन असून पाठीचा कणा, खांदे, छाती आणि पोटाच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जण संगणकासमोर तासन्तास बसून काम करतात. त्यामुळे पाठदुखी, मानेचा त्रास आणि शरीराची लवचिकता कमी होणे या समस्या वाढताना दिसतात. अशा वेळी योग्य पद्धतीने आणि नियमितपणे केलेले भुजंगासन शरीराला मोठा फायदा देऊ शकते. माझा भुजंगासनाचा अनुभव (My Experience) मी व्यवसायाने IT क्षेत्रात Automation Test Engineer म्हणून काम करतो. माझ्या कामाचा बहुतांश वेळ संगणकासमोर बसून जातो. सुरुवातीला सलग ८–१० तास बसून काम केल्यामुळे मला वारंवार पाठदुखी, मानेचा ताण आणि खांद्यामध्ये जडपणा जाणवू लागला. काही दिवस तर सकाळी उठल्यावरही पाठीमध्ये ताठरपणा जाणवत असे. यानंतर मी नियमित य...