भू-नमन-वज्रासन भू-नमन-वज्रासन(Bhu-Naman-Vajrasana) हा एक वज्रासनाचा प्रकार असून हा सुप्त वज्रासनाच्या विरुद्ध आहे. या मध्ये आपल्याला समोर झुकून आपले नाक जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करायचा आहे. या आसनाचा नियमित सराव आपल्याला मधुमेह, उदररोग सर्दी, वातविकार, अग्निमांद्य, स्वप्नदोष, निद्रानाश, दमा, मुरडा या सारख्या आजारांपासून दूर ठेवतो. कृती आधी वज्रासनात आसनस्थ व्हा. नंतर हळू हळू पुढे वाका. पुढे वाकत असताना आपले दोन्ही हात पाठीमागे न्या व उजव्या हाताने डाव्या हाताच्या कोपऱ्या खाली पकडा आणि डाव्या हाताने उजव्या हाताच्या कोपऱ्या खाली पकडा. खाली वाकत असतांना श्वास रोखून धरा. आता रोखलेला श्वास हळूहळू सोडत मान लांब करून नाकाने जमिनीला स्पर्श करा. या ठिकाणी हे आसन पूर्ण होते. सुरुवातीला हे आसन अत्यंत थोडा वेळ करावे नंतर हळू हळू वेळ वाढवत नेऊन दहा सेकंदापर्यंत हे आसन करता येईल. महत्वाची सूचना: पाठदुखी, गुडघे दुखी किंवा उच्चरक्तदाब असलेल्या व्यक्तींनी हे आसन करू नये. फायदे: या आसनाच्या नित्य सरावामुळे जठर सुदृढ बनते, यकृतातील विकृती दूर होते आणि स्वादुपिंडातील शि...
भुजंगासन 'भुजंग' म्हणजे साप. या आसनामध्ये शरीराचा आकार नागाच्या उभारलेल्या फण्यासारखा दिसतो म्हणून या आसनास 'भुजंगासन' असे म्हणतात. येथे आपण भुजंगासन त्याची कृती व आपल्या शरीराला त्याचे होणारे फायदे या बद्दल संपूर्ण माहिती आपल्या मायबोली मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. (Bhujangasana information in Marathi) pic credit: https://pixahive.com/photo/purn-bhujangasana/ कृती: भुजंगासन हे पोट जमिनीला टेकवून करण्याच्या आसनपद्धती पैकी एक आसन आहे, त्यामुळे प्रथम जमीनीवर पालथे झोपा. हनुवटी छातीला टेकवा आणि कपाळ जमिनीला टेकवा. सर्व शरीर हलके करा. हाताचे पंजे छातीजवळ आना नंतर हातांच्या पंज्यावर शरीराचा भार देऊन बेंबीपासूनचा भाग हळू हळू वर उचला. कमरेखालचा भाग बिलकुल हलू देऊ नका. आकृतीत दाखवल्या प्रमाणे कृती करा. पायाची बोटे ताणून जमिनीवर टेकवा . असे केल्याने पाठ आणि खांद्याच्या मधील भागातील स्नायू व्यवस्तीत ताणले जातात. पोटातील सर्व स्नायूंवर सुद्धा व्यवस्तीत ताण पडतो. या आसनस्थितीत श्वास रोखून धरा. आठ ते दहा सेकंद हे असं क...