हे आसन करताना शरीराचा आकार हल म्हणजेच नांगराप्रमाणे दिसतो म्हणून या आसनाला ' हलासन' असे म्हणतात. येथे आपण हलासनाचे फायदे (Benefits of Halasana) आणि क्रिया(Halasana Steps) बघणार आहोत. हालासनामुळे शरीरात नवचैतन्य निर्माण होते, तसेच लैंगिक शक्ती सुद्धा वाढते. या सारखे भरपूर फायदे व त्यांची मराठी मध्ये माहिती (Halasana information in Marathi) आपण पुढे बघणार आहोत. pic credit: https://pixahive.com/photo/plow-pose-halasana/ कृती(Halasana Steps): सुरुवातीला जमिनीवर पाठीवर झोपा. आपले दोन्ही हात शरीराला सामन्तर ठेवा व हाताचे तळवे जामिनाला लागून ठेवा. दोन्ही पाय एकमेकांना लागून सरळ रेषेत ताठ ठेवा. आता श्वास घेत घेत हळू हळू दोन्ही पाय सोबत वर उचला. श्वास घेण्याची आणि पाय वर उचलण्याची क्रिया सोबतच झाली पाहिजे. हि क्रिया करत असताना गुढघ्यात पाय वाकणार नाहीत याची पूर्ण काळजी घ्या. हि क्रिया करताना हात आणि ...
भुजंगासन (Bhujangasana) माहिती | फायदे, कृती, काळजी व उपयोग भुजंगासन म्हणजे काय? 'भुजंग' म्हणजे नाग किंवा साप. या आसनामध्ये शरीराचा आकार फणा काढलेल्या नागासारखा दिसतो म्हणून या आसनाला भुजंगासन (Bhujangasana) असे म्हणतात. इंग्रजीमध्ये याला Cobra Pose असे म्हणतात. हे पोटावर झोपून केले जाणारे एक प्रभावी योगासन असून पाठीचा कणा, खांदे, छाती आणि पोटाच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जण संगणकासमोर तासन्तास बसून काम करतात. त्यामुळे पाठदुखी, मानेचा त्रास आणि शरीराची लवचिकता कमी होणे या समस्या वाढताना दिसतात. अशा वेळी योग्य पद्धतीने आणि नियमितपणे केलेले भुजंगासन शरीराला मोठा फायदा देऊ शकते. माझा भुजंगासनाचा अनुभव (My Experience) मी व्यवसायाने IT क्षेत्रात Automation Test Engineer म्हणून काम करतो. माझ्या कामाचा बहुतांश वेळ संगणकासमोर बसून जातो. सुरुवातीला सलग ८–१० तास बसून काम केल्यामुळे मला वारंवार पाठदुखी, मानेचा ताण आणि खांद्यामध्ये जडपणा जाणवू लागला. काही दिवस तर सकाळी उठल्यावरही पाठीमध्ये ताठरपणा जाणवत असे. यानंतर मी नियमित य...