ड्रॅगन फ्रुट(-Dragon Fruit) आज आपण ड्रॅगन फ्रुट बद्दल माहिती जाणून घेऊयात. मूळच सेंट्रल अमेरिकेमध्ये सापडणार हे फळ आता जगाच्या पाठीवर कुठेही अगदी सहज मिळते. हे फळ हायलोसिरीअस (Hylocereus) नावाच्या कॅटकस प्रकारांमधील आहे. या मध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत पण मुख्यतः त्यात दोन सामान्य प्रकार सगळीकडे मिळतात ते म्हणजे हायलोसेरियस अँडाट्स (Hylocereus Undatus) जे आतून पांढरे असते आणि हायलोसेरियस कोस्टारिसेंसीस जे आतमधून लाल किंवा गुलाबी असते. ड्रॅगन फ्रुट हे नाव त्या फळाच्या बाह्य आकारावरून त्याला मिळाले आहे. हे फळ त्याच्या दिसण्यावरून प्रसिद्ध तर आहेच त्याच बरोबर ते त्याच्या विशिष्ट चव आणि त्यात असणाऱ्या विविध पौष्टिक जीवनसत्वाबद्दल सुद्धा प्रसिद्ध आहे. ड्रॅगन फ्रुट मध्ये असणाऱ्या विविध पोषक घटकांबद्दल आपण थोडी माहिती जाणून घेऊयात. जीवनसत्वे : जीवनसत्वे म्हणजेच व्हिटॅमिन्स, ड्रॅगन फ्रुट मध्ये क जीवनसत्व(व्हिटॅमिन सी ) विपुल प्रमाणात आहे, जे अँटिऑक्सिडन असल्यामुळे त्याच्या सेवनाने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच ड्रॅगन फ्रुट च्या सेवनाने आपली त्वचा सुद्...
भुजंगासन (Bhujangasana) माहिती | फायदे, कृती, काळजी व उपयोग भुजंगासन म्हणजे काय? 'भुजंग' म्हणजे नाग किंवा साप. या आसनामध्ये शरीराचा आकार फणा काढलेल्या नागासारखा दिसतो म्हणून या आसनाला भुजंगासन (Bhujangasana) असे म्हणतात. इंग्रजीमध्ये याला Cobra Pose असे म्हणतात. हे पोटावर झोपून केले जाणारे एक प्रभावी योगासन असून पाठीचा कणा, खांदे, छाती आणि पोटाच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जण संगणकासमोर तासन्तास बसून काम करतात. त्यामुळे पाठदुखी, मानेचा त्रास आणि शरीराची लवचिकता कमी होणे या समस्या वाढताना दिसतात. अशा वेळी योग्य पद्धतीने आणि नियमितपणे केलेले भुजंगासन शरीराला मोठा फायदा देऊ शकते. माझा भुजंगासनाचा अनुभव (My Experience) मी व्यवसायाने IT क्षेत्रात Automation Test Engineer म्हणून काम करतो. माझ्या कामाचा बहुतांश वेळ संगणकासमोर बसून जातो. सुरुवातीला सलग ८–१० तास बसून काम केल्यामुळे मला वारंवार पाठदुखी, मानेचा ताण आणि खांद्यामध्ये जडपणा जाणवू लागला. काही दिवस तर सकाळी उठल्यावरही पाठीमध्ये ताठरपणा जाणवत असे. यानंतर मी नियमित य...