ड्रॅगन फ्रुट(-Dragon Fruit)
आज आपण ड्रॅगन फ्रुट बद्दल माहिती जाणून घेऊयात. मूळच सेंट्रल अमेरिकेमध्ये सापडणार हे फळ आता जगाच्या पाठीवर कुठेही अगदी सहज मिळते. हे फळ हायलोसिरीअस (Hylocereus) नावाच्या कॅटकस प्रकारांमधील आहे.
या मध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत पण मुख्यतः त्यात दोन सामान्य प्रकार सगळीकडे मिळतात ते म्हणजे हायलोसेरियस अँडाट्स (Hylocereus Undatus) जे आतून पांढरे असते आणि हायलोसेरियस कोस्टारिसेंसीस जे आतमधून लाल किंवा गुलाबी असते. ड्रॅगन फ्रुट हे नाव त्या फळाच्या बाह्य आकारावरून त्याला मिळाले आहे.
हे फळ त्याच्या दिसण्यावरून प्रसिद्ध तर आहेच त्याच बरोबर ते त्याच्या विशिष्ट चव आणि त्यात असणाऱ्या विविध पौष्टिक जीवनसत्वाबद्दल सुद्धा प्रसिद्ध आहे. ड्रॅगन फ्रुट मध्ये असणाऱ्या विविध पोषक घटकांबद्दल आपण थोडी माहिती जाणून घेऊयात.
- जीवनसत्वे : जीवनसत्वे म्हणजेच व्हिटॅमिन्स, ड्रॅगन फ्रुट मध्ये क जीवनसत्व(व्हिटॅमिन सी ) विपुल प्रमाणात आहे, जे अँटिऑक्सिडन असल्यामुळे त्याच्या सेवनाने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच ड्रॅगन फ्रुट च्या सेवनाने आपली त्वचा सुद्धा तजेलदार दिसते.
- फायबर : या मध्ये डाएटरी फायबर(आहारातील फायबर) आहे जे पचन शक्ती सुधारते तसेच आपल्या रक्तातील साखर नियंत्रित ठेवते.
- अँटिऑक्सिडंट्स : ड्रॅगन फ्रुट मध्ये विविध प्रकारचे अँटिऑक्सिडेंट्स आहेत जसे कि बेलाटेन्स, जे कि मुक्त रॅडिकल्स मुळे होणाऱ्या नुकसानापासून पेशींचे संरक्षण करण्यास मदत करते.
![]() |
| pic credit : https://pixexid.com/image/exotic-dragon-fruit-vibrant-pink-and-white-patterns-offering-a-feast-for-the-ey-c1nvtwsq |
- कर्बोदके : कर्बोदके म्हणजेच कार्बोहैड्रेट्स, या मध्ये कॅलरीज चे प्रमाण कमी आहे. आपल्या आहारामध्ये जर कर्बोदकाचे प्रमाण वाढवायचे असेल तर ड्रॅगन फ्रुट हा एक उत्तम पर्याय असू शकतो.
- प्रथिने: ड्रॅगन फ्रुट मध्ये प्रथिने (Protein ) अल्प प्रमाणात आढळतात.
- लोह: या मध्ये काही प्रमाणात लोह (Iron) सुद्धा असते.
- कॅल्शियम: या मध्ये कॅल्शियम सुद्धा आहे ज्याच्या सेवनाने आपली हाडे बळकट होतात.
- फॉस्फर: या मधून मिळणार फॉस्फरस हा घटक आपल्या हाडाच्या आणि दातांच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचा आहे. तसेच आपल्या शरीरातील ऊर्जा निर्मितीची प्रणाली सुद्धा सुधारते.
- मॅग्नेशिअम: यात मॅग्नेशिअम आहे स्नायू आणि मज्जातंतूंच्या कार्यासह विविध शारीरिक क्रियेसाठी मोलाची भूमिका बजावते.
- हायड्रेशन: ड्रॅगन फ्रुट मध्ये पाण्याचे भरपूर प्रमाण आहे जे कि तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी संतुलित ठेवते.
ड्रॅगन फ्रुट हे विविध प्रकारामध्ये उपलब्ध आहेत, आणि त्यामुळे त्यामधील पौष्टिक मूल्यांचे प्रमाण सुद्धा बदलू शकते. चवीला उत्तम आणि भरपूर प्रमाणात पौष्टिक मूल्ये उपलब्ध असल्यामुळे या फळाचा वापर आपल्या दैनंदिन आहारात नक्कीच करू शकतो.

Very good information
ReplyDeleteI have eaten will I get benefits