Skip to main content

ड्रॅगन फ्रुट-आरोग्यवर्धक फळ खाण्याचे फायदे -Dragon Fruit

 ड्रॅगन फ्रुट(-Dragon Fruit) 

आज आपण ड्रॅगन फ्रुट बद्दल माहिती जाणून घेऊयात. मूळच सेंट्रल अमेरिकेमध्ये सापडणार हे फळ आता जगाच्या पाठीवर कुठेही अगदी सहज मिळते. हे फळ हायलोसिरीअस (Hylocereus)  नावाच्या कॅटकस प्रकारांमधील आहे.

या मध्ये सुद्धा अनेक प्रकार आहेत पण मुख्यतः त्यात दोन सामान्य प्रकार सगळीकडे मिळतात ते म्हणजे हायलोसेरियस अँडाट्स (Hylocereus Undatus) जे आतून पांढरे असते आणि हायलोसेरियस कोस्टारिसेंसीस जे आतमधून लाल किंवा गुलाबी असते.  ड्रॅगन फ्रुट हे नाव त्या फळाच्या बाह्य आकारावरून त्याला मिळाले आहे. 

हे फळ त्याच्या दिसण्यावरून प्रसिद्ध तर आहेच त्याच बरोबर ते त्याच्या विशिष्ट चव आणि त्यात असणाऱ्या विविध पौष्टिक जीवनसत्वाबद्दल सुद्धा प्रसिद्ध आहे. ड्रॅगन फ्रुट मध्ये असणाऱ्या विविध पोषक घटकांबद्दल आपण थोडी माहिती जाणून घेऊयात. 

  • जीवनसत्वे : जीवनसत्वे म्हणजेच व्हिटॅमिन्स, ड्रॅगन फ्रुट मध्ये क जीवनसत्व(व्हिटॅमिन सी ) विपुल प्रमाणात आहे, जे अँटिऑक्सिडन असल्यामुळे त्याच्या सेवनाने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. तसेच ड्रॅगन फ्रुट च्या सेवनाने आपली त्वचा सुद्धा तजेलदार दिसते. 
  • फायबर : या मध्ये डाएटरी फायबर(आहारातील फायबर) आहे जे पचन शक्ती सुधारते तसेच आपल्या रक्तातील साखर नियंत्रित ठेवते. 
  • अँटिऑक्सिडंट्स : ड्रॅगन फ्रुट मध्ये विविध प्रकारचे अँटिऑक्सिडेंट्स आहेत जसे कि बेलाटेन्स, जे कि मुक्त रॅडिकल्स मुळे होणाऱ्या नुकसानापासून पेशींचे संरक्षण करण्यास मदत करते. 
Dragon Fruit
pic credit : https://pixexid.com/image/exotic-dragon-fruit-vibrant-pink-and-white-patterns-offering-a-feast-for-the-ey-c1nvtwsq

  • कर्बोदके : कर्बोदके म्हणजेच कार्बोहैड्रेट्स, या मध्ये कॅलरीज चे प्रमाण कमी आहे. आपल्या आहारामध्ये जर कर्बोदकाचे प्रमाण वाढवायचे असेल तर ड्रॅगन फ्रुट हा एक उत्तम पर्याय असू शकतो. 
  • प्रथिने:  ड्रॅगन फ्रुट मध्ये प्रथिने (Protein ) अल्प प्रमाणात आढळतात. 
  • लोह: या मध्ये काही प्रमाणात लोह (Iron) सुद्धा असते.
  • कॅल्शियम: या मध्ये कॅल्शियम सुद्धा आहे ज्याच्या सेवनाने आपली हाडे बळकट होतात. 

  • फॉस्फर: या मधून मिळणार फॉस्फरस हा घटक आपल्या हाडाच्या आणि दातांच्या आरोग्यासाठी खूप महत्वाचा आहे. तसेच आपल्या शरीरातील ऊर्जा निर्मितीची प्रणाली सुद्धा सुधारते. 
  •  मॅग्नेशिअम: यात मॅग्नेशिअम आहे स्नायू आणि मज्जातंतूंच्या कार्यासह विविध शारीरिक क्रियेसाठी मोलाची भूमिका बजावते. 
  • हायड्रेशन: ड्रॅगन फ्रुट मध्ये  पाण्याचे भरपूर प्रमाण आहे जे कि तुमच्या शरीरातील पाण्याची पातळी संतुलित ठेवते. 

ड्रॅगन फ्रुट हे विविध प्रकारामध्ये उपलब्ध आहेत, आणि त्यामुळे त्यामधील पौष्टिक मूल्यांचे प्रमाण सुद्धा बदलू शकते. चवीला उत्तम आणि भरपूर प्रमाणात पौष्टिक मूल्ये उपलब्ध असल्यामुळे या फळाचा वापर आपल्या दैनंदिन आहारात नक्कीच करू शकतो. 

Comments

Post a Comment

आपल्या सुचनांचे स्वागत आहे.
भेट दिल्या बद्दल धन्यवाद. 🙏

Popular posts from this blog

भुजंगासन मराठी माहिती | Bhujangasana

भुजंगासन 'भुजंग' म्हणजे साप. या आसनामध्ये शरीराचा आकार नागाच्या उभारलेल्या फण्यासारखा दिसतो म्हणून या आसनास 'भुजंगासन' असे म्हणतात. येथे आपण भुजंगासन त्याची कृती व आपल्या शरीराला त्याचे होणारे फायदे या बद्दल संपूर्ण माहिती आपल्या मायबोली मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. (Bhujangasana information in Marathi)    pic credit:  https://pixahive.com/photo/purn-bhujangasana/ कृती: भुजंगासन हे पोट जमिनीला टेकवून करण्याच्या आसनपद्धती पैकी एक आसन आहे, त्यामुळे  प्रथम जमीनीवर पालथे झोपा.  हनुवटी छातीला टेकवा आणि कपाळ जमिनीला टेकवा.  सर्व शरीर हलके करा. हाताचे पंजे छातीजवळ आना नंतर हातांच्या पंज्यावर शरीराचा भार देऊन बेंबीपासूनचा भाग हळू हळू वर उचला.  कमरेखालचा भाग बिलकुल हलू देऊ नका.  आकृतीत दाखवल्या प्रमाणे कृती करा. पायाची बोटे ताणून जमिनीवर टेकवा .  असे केल्याने पाठ आणि खांद्याच्या मधील भागातील स्नायू व्यवस्तीत ताणले जातात. पोटातील सर्व स्नायूंवर सुद्धा व्यवस्तीत ताण  पडतो. या आसनस्थितीत श्वास रोखून धरा. आठ ते दहा सेकंद हे असं क...

धनुरासन मराठी माहिती | Dhanurasana information in marathi

हे आसन पोटावर झोपून करण्याच्या आसन प्रकारातील एक आसन आहे. या आसनाच्या सरावाने शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते. हे आसन करताना मस्तकापासून ते गुडघ्या पर्यंत च्या भागाला बाण नसलेल्या धानुष्यासारखा आकार मिळतो म्हणून या आसनाला धनुरासन (Dhanurasana) असे नाव पडले आहे. हे आसन करताना आपल्या शरीराचा संपूर्ण भार हा नाभीवर पडतो त्यामुळे पोटासंबंधीच्या अनेक तक्रारी या आसनाच्या नित्य सरावाने दूर होतात.    भुजंगासन व शलभासन या दोन आसनांचे एकत्रीकरण करून हे आसन बनलेले आहे. येथे आपण धनुरासनाची कृती व फायदे मराठी मध्ये जाणून घेऊयात. (Dhanurasana information in marathi) image credit:  https://pixahive.com/photo/dhanurasana-bow-pose-3/ कृती: पोटावर पालथे झोपा.  दोन्ही हात आपल्या शरीराला लागून समांतर ठेवा.  कपाळ जमिनीवर टेकवून ठेवा.  आपल्या शरीराचे सर्व स्नायू सैल सोडा.  आता दोन्ही पाय गुडघ्यापासून मागे दुमडा.  चित्रात दाखविल्याप्रने दोन्ही हातांनी घोट्याजवळ दोन्ही  पाय धरा.  आता छाती आणि डोके वर उचला हे करताना हात आणि पाय ताठ ठेवा.  आता पाय वर...

पद्मासनाची कृती आणि फायदे | Padmasana information in Marathi

पद्मासन( Padmasana  ) कोरोना पासून वाचायचं असेल तर आपल्याला आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं खूप आवश्यक आहे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पोषक अन्ना बरोबर योगाभ्यास ( Yoga ) करणेही खूप गरजेचे आहे. त्यामूळे मी अशी काही निवडक योगसाने घेऊन येत आहे की जे तुमच्या हृदयाची अणि फुफुसाची कार्यक्षमता वाढवून तुमची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यास मदत करतील. खाली पद्मासनाच्या कृती आणि फायद्या बद्दल मराठी मध्ये माहिती दिली आहे. ( Padmasana steps and benefits information in Marathi) Photo by  Elina Fairytale  from  Pexels आज आपन 'पद्मासनाबद्दल' थोडं जाणून घेऊया.  पद्म म्हणजे कमळ,  जेव्हा आपण हे आसन करतो, तेव्हा आपल्या शरीराला कमळा सारखा आकार प्राप्त होत असल्याने या आसनाला 'पद्मासन' असे म्हणतात, तर इंग्रजी मध्ये या आसनाला ' Lotus Pose' असे म्हणतात.ध्यान करण्यासाठी प्रामुख्याने पद्मासनाचाच उपयोग केला जातो.  चला तर आता आपण बघुयात 'पद्मासन कसे करावे'? कृती :(Padmasana Steps)  जमिनीवर पाय लांब पसरवून  बसावे.  नंतर उजवा पाय डाव्या...