सुप्तभद्रासन आज आपण सुप्तभद्रासनाचे फायदे( supta bhadrasana benefits ) आणि त्याची कृती या बद्दल मराठी मध्ये जाणून घेऊयात. सुप्तभद्रासनालाच 'सुप्तगोरक्षासन ' असे म्हणतात, तर इंग्रजी मध्ये याचे नाव Reclining Bound Angle Pose असे आहे. सुप्तभादर्शनाच्या दोन कृती आहेत, खाली दिलेली आसनांची कृती पूर्ण नीट लक्ष देऊन वाचा आणि मगच हे आसन कृतीत आणा. कृती: प्रकार १: pic credit: https://pixahive.com/photo/supta-baddha-konasana-recliner-bound-angle-pose/ सुरुवातीला जमिनीवर सरळ पाठीवर झोपा. आता उजवा पाय गुडघ्यामध्ये वाकवून त्या पायाची टाच जननेंनद्रिय व गुद्द्वाराच्या मध्ये असणाऱ्या भागात आना हीच कृती डाव्या पायाने करा. दोन्ही पायांच्या टाचा एकमेकाना चिटकायला हव्यात. आपला जानेंद्रियाचाव व गुद्द्वाराच्या भागा आणि जोडलेल्या पायांच्या टाचा यात थोडे अंतर असायला हवे. आता आपले दोन्ही हात आपल्या मांड्यावर किंवा जमिनीवर आकृतीत दाखवल्याप्रमाणे सरळ ठेवा. सुरुवातीला हे आसन तीस सेकंद करावे, नतंर काही दिवसांच्या सरावानंतर आपण ...
भुजंगासन (Bhujangasana) माहिती | फायदे, कृती, काळजी व उपयोग भुजंगासन म्हणजे काय? 'भुजंग' म्हणजे नाग किंवा साप. या आसनामध्ये शरीराचा आकार फणा काढलेल्या नागासारखा दिसतो म्हणून या आसनाला भुजंगासन (Bhujangasana) असे म्हणतात. इंग्रजीमध्ये याला Cobra Pose असे म्हणतात. हे पोटावर झोपून केले जाणारे एक प्रभावी योगासन असून पाठीचा कणा, खांदे, छाती आणि पोटाच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जण संगणकासमोर तासन्तास बसून काम करतात. त्यामुळे पाठदुखी, मानेचा त्रास आणि शरीराची लवचिकता कमी होणे या समस्या वाढताना दिसतात. अशा वेळी योग्य पद्धतीने आणि नियमितपणे केलेले भुजंगासन शरीराला मोठा फायदा देऊ शकते. माझा भुजंगासनाचा अनुभव (My Experience) मी व्यवसायाने IT क्षेत्रात Automation Test Engineer म्हणून काम करतो. माझ्या कामाचा बहुतांश वेळ संगणकासमोर बसून जातो. सुरुवातीला सलग ८–१० तास बसून काम केल्यामुळे मला वारंवार पाठदुखी, मानेचा ताण आणि खांद्यामध्ये जडपणा जाणवू लागला. काही दिवस तर सकाळी उठल्यावरही पाठीमध्ये ताठरपणा जाणवत असे. यानंतर मी नियमित य...