मत्स्यासन आपण जेव्हा हि आसन मुद्रा धारण करतो तेंव्हा, आपल्या शरीराचा आकार पाण्यातील मास्याप्रमाने दिसायला लागतो म्हणून या आसनाला ' मत्स्यासन'(Fish Pose Yoga) असे म्हणतात. या आसनाच्या सरावामुळे फुफुसे, कान, स्वरयंत्र, पाठीचा कणा अश्या बऱ्याच अवयवांची कार्यक्षमता वाढते. सर्वांगासनाच्या सरावानंतर मत्स्यासन केल्याने सर्वांगासनाचा आपल्याला अधिक फायदा मिळतो तसेच सर्वांगासन केल्यानंर आपल्या मानेच्या स्नायूंमध्ये आलेली ताठरता या आसनामुळे कमी होते. मत्स्यासन केल्यानंतर शवासन करावे. चला तर मत्स्यासनाची कृती आणि फायद्या बद्दल संपूर्ण माहिती आपण मराठी मध्ये जाऊन घेऊयात. ( matsyasana information in marathi ) Photo by Elly Fairytale from Pexels-fish pose कृती:(Matsyasana Steps) आधी पद्मासनात बसा नंतर दोन्ही हातांचा आधार घेऊन जमिनीवर झोपा. त्यानंतर आकृतित दखवल्याप्रमाणे पाठीची कमान बनवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे शरीराचा भार डोक्यावर आणि मांडीवर पडेल. आता डाव्या हाताने डाव्या पायाचा पंजा पकडा आणि उजव्या हाताने उजव्या पायाचा पंजा पक...
भुजंगासन 'भुजंग' म्हणजे साप. या आसनामध्ये शरीराचा आकार नागाच्या उभारलेल्या फण्यासारखा दिसतो म्हणून या आसनास 'भुजंगासन' असे म्हणतात. येथे आपण भुजंगासन त्याची कृती व आपल्या शरीराला त्याचे होणारे फायदे या बद्दल संपूर्ण माहिती आपल्या मायबोली मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. (Bhujangasana information in Marathi) pic credit: https://pixahive.com/photo/purn-bhujangasana/ कृती: भुजंगासन हे पोट जमिनीला टेकवून करण्याच्या आसनपद्धती पैकी एक आसन आहे, त्यामुळे प्रथम जमीनीवर पालथे झोपा. हनुवटी छातीला टेकवा आणि कपाळ जमिनीला टेकवा. सर्व शरीर हलके करा. हाताचे पंजे छातीजवळ आना नंतर हातांच्या पंज्यावर शरीराचा भार देऊन बेंबीपासूनचा भाग हळू हळू वर उचला. कमरेखालचा भाग बिलकुल हलू देऊ नका. आकृतीत दाखवल्या प्रमाणे कृती करा. पायाची बोटे ताणून जमिनीवर टेकवा . असे केल्याने पाठ आणि खांद्याच्या मधील भागातील स्नायू व्यवस्तीत ताणले जातात. पोटातील सर्व स्नायूंवर सुद्धा व्यवस्तीत ताण पडतो. या आसनस्थितीत श्वास रोखून धरा. आठ ते दहा सेकंद हे असं क...