Skip to main content

मत्स्यासन | Fish Pose Yoga | (Matsyasana information in Marathi)

मत्स्यासन      

  आपण जेव्हा हि आसन मुद्रा धारण करतो तेंव्हा, आपल्या शरीराचा आकार पाण्यातील मास्याप्रमाने दिसायला लागतो म्हणून या आसनाला 'मत्स्यासन'(Fish Pose Yoga) असे म्हणतात. या आसनाच्या सरावामुळे फुफुसे, कान, स्वरयंत्र, पाठीचा कणा अश्या बऱ्याच अवयवांची कार्यक्षमता वाढते. सर्वांगासनाच्या सरावानंतर मत्स्यासन केल्याने सर्वांगासनाचा आपल्याला अधिक फायदा मिळतो तसेच सर्वांगासन केल्यानंर आपल्या मानेच्या स्नायूंमध्ये आलेली ताठरता या आसनामुळे कमी होते. मत्स्यासन केल्यानंतर शवासन करावे. चला तर मत्स्यासनाची कृती आणि फायद्या बद्दल संपूर्ण माहिती आपण  मराठी मध्ये जाऊन घेऊयात. (matsyasana information in marathi)

मत्स्यासन (Fish Pose)
Photo by Elly Fairytale from Pexels-fish pose

कृती:(Matsyasana Steps)

  • आधी पद्मासनात बसा नंतर दोन्ही हातांचा आधार घेऊन जमिनीवर झोपा. 
  •  त्यानंतर आकृतित दखवल्याप्रमाणे पाठीची  कमान बनवण्याचा प्रयत्न करा.
  • म्हणजे शरीराचा भार डोक्यावर आणि मांडीवर पडेल.
  • आता डाव्या हाताने डाव्या पायाचा पंजा पकडा आणि उजव्या हाताने उजव्या पायाचा पंजा पकडा .
  • कमरेचा भाग वरती उचलून शरीराचा आकार एखाद्या पुलासारखा बनेल असा प्रयत्न करा.  
  • काही लोकांना पद्मासन घालून जर जमत नसेल तर त्यांनी साधी मांडी लावून जरी हे आसन केले तरी चालेल, परंतु पद्मासनामध्येच हे आसन करण्याच प्रयत्न करावा. 
सुरुवातीला काही सेकंदच हे आसन करावे सरावानंतर हळूहळू या आसनाची वेळ वाढवावी. पूर्वस्तितीत येताना हाताच्या मदतीने प्रथम डोके सैलकरून पाठीवर झोपावे आणि मगच उठून बसावे 

फायदे: (Benefits of Matsyasana)

  1. या आसनामध्ये स्वरपेटी व श्वसन नळी मोकळी राहत असल्यामुळे खोल श्वासोश्वास करण्यास हे आसन फार उपयुक्त आहे. 
  2. थायरॉईड ग्रंथीला व्यायाम मिळतो त्यामुळे तिचे काम सुरळीत चालते. 
  3. या आसनाच्या नियमित सरावामुळे श्वसनयंत्राची कार्यक्षमता वाढते. 
  4. या आसनाच्या नियमित सरावाने फुफ्फुसामध्ये शुद्ध रक्ताचा पुरवठा होतो आणि पुरेसा पाचक रस निर्माण होण्यास मदत 
  5. दम्याच्या रुग्णांना हे आसन अत्यंत लाभदायक आहे. 
  6. या आसनामुळे पाठीच्या कण्याला भरपूर व्यायाम मिळतो 
  7. पाठीचे स्नायूसुद्धा  कार्यक्षम बनतात. 
  8. या आसनामुळे चेहऱ्याच्या स्नायूंना चांगला ताण बसतो त्यामुळे चेहरा तेजस्वी बनतो. 
  9. सर्वांगासनानंतर लगेच हे आसन करावे त्यामुळे सर्वांगासन केल्याने मानेला आलेला ताठरपणा आणि स्नायू खेचल्यामुळे स्नायूंना आलेली जडता दूर होण्यास मदत होते.   
टीप: पाठीच्या मणक्याचा, मानेचा त्रास ज्यांना आहे त्यांनी हे आसन करू नये तसेच उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींनी सुद्धा हे आसन करू नये. 
  

Comments

Popular posts from this blog

भुजंगासन (Bhujangasana) माहिती | फायदे, कृती, काळजी व उपयोग | ByYogesh

भुजंगासन (Bhujangasana) माहिती | फायदे, कृती, काळजी व उपयोग  भुजंगासन म्हणजे काय? 'भुजंग' म्हणजे नाग किंवा साप. या आसनामध्ये शरीराचा आकार फणा काढलेल्या नागासारखा दिसतो म्हणून या आसनाला भुजंगासन (Bhujangasana) असे म्हणतात. इंग्रजीमध्ये याला Cobra Pose असे म्हणतात. हे पोटावर झोपून केले जाणारे एक प्रभावी योगासन असून पाठीचा कणा, खांदे, छाती आणि पोटाच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जण संगणकासमोर तासन्तास बसून काम करतात. त्यामुळे पाठदुखी, मानेचा त्रास आणि शरीराची लवचिकता कमी होणे या समस्या वाढताना दिसतात. अशा वेळी योग्य पद्धतीने आणि नियमितपणे केलेले भुजंगासन शरीराला मोठा फायदा देऊ शकते. माझा भुजंगासनाचा अनुभव (My Experience) मी व्यवसायाने IT क्षेत्रात Automation Test Engineer म्हणून काम करतो. माझ्या कामाचा बहुतांश वेळ संगणकासमोर बसून जातो. सुरुवातीला सलग ८–१० तास बसून काम केल्यामुळे मला वारंवार पाठदुखी, मानेचा ताण आणि खांद्यामध्ये जडपणा जाणवू लागला. काही दिवस तर सकाळी उठल्यावरही पाठीमध्ये ताठरपणा जाणवत असे. यानंतर मी नियमित य...

धनुरासन (Dhanurasana) माहिती | कृती, फायदे, काळजी आणि योग्य पद्धत

धनुरासन म्हणजे काय? धनुरासन (Dhanurasana) हे पोटावर झोपून केले जाणारे योगासन आहे. या आसनामध्ये दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून हातांनी घोटे पकडले जातात आणि छाती व पाय वर उचलले जातात. त्यामुळे शरीराचा आकार धनुष्याप्रमाणे दिसतो. म्हणून या आसनाला धनुरासन असे नाव देण्यात आले आहे. धनुरासन हे पाठीचा कणा, छाती, खांदे, पोट आणि पायांच्या स्नायूंवर काम करणारे एक मागे वाकण्याचे आसन आहे. नियमित आणि योग्य पद्धतीने सराव केल्यास शरीराची लवचिकता आणि स्नायूंची ताकद सुधारण्यास मदत होऊ शकते. धनुरासन आणि भुजंगासनाचा संबंध धनुरासन करताना शरीराचा पुढील भाग वर उचलला जात असल्यामुळे त्यामध्ये भुजंगासनासारखा मागे वाकण्याचा भाग जाणवतो. तसेच पाय वर उचलल्यामुळे शरीराच्या मागील भागातील स्नायूंवरही ताण येतो. मात्र धनुरासन हे भुजंगासन आणि शलभासन यांचे केवळ साधे "एकत्रीकरण" आहे असे म्हणण्यापेक्षा, या दोन्ही आसनांमध्ये आढळणाऱ्या काही हालचालींसारखी शरीराची स्थिती धनुरासनात दिसते , असे सांगणे अधिक योग्य आहे. माझा योगाभ्यासाचा अनुभव मी IT क्षेत्रात काम करत असल्यामुळे माझ्या कामाचा बराच वेळ संगणकासमोर ब...

पद्मासन (Padmasana) माहिती मराठीत | कृती, फायदे आणि खबरदारी

पद्मासन (Padmasana) माहिती मराठीत | कृती, फायदे आणि खबरदारी पद्मासन (Padmasana) हे योगातील सर्वात प्रसिद्ध आणि पारंपरिक ध्यानासनांपैकी एक आहे. "पद्म" म्हणजे कमळ. या आसनामध्ये बसल्यावर शरीराचा आकार कमळासारखा दिसतो, म्हणून याला पद्मासन किंवा इंग्रजीमध्ये Lotus Pose असे म्हणतात. ध्यान, प्राणायाम आणि मानसिक शांततेसाठी हे आसन अत्यंत उपयुक्त मानले जाते. नियमित सराव केल्यास शरीराची लवचिकता वाढण्यास, मन शांत राहण्यास आणि एकाग्रता सुधारण्यास मदत होऊ शकते. महत्त्वाची सूचना: पद्मासन करताना शरीरावर जबरदस्ती करू नका. गुडघा किंवा घोट्याचा त्रास असल्यास योगतज्ज्ञांचा सल्ला घ्या. पद्मासन कसे करावे? (Padmasana Steps) स्वच्छ आणि सपाट जागेवर चटई अंथरून बसा. दोन्ही पाय समोर सरळ पसरवा. उजवा पाय अलगद उचलून डाव्या मांडीवर ठेवा. त्यानंतर डावा पाय उचलून उजव्या मांडीवर ठेवा. दोन्ही गुडघे जमिनीच्या दिशेने ठेवण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा आणि अंगठा व तर्जनी एकमेकांना स्पर्श करून ज्ञानमुद्रा धरा. पाठीचा कणा, मान आणि डोके सरळ ठेवा. डोळे बंद करून सामान्य श्वास घेत १ ते ५ मिनिटे ध्यान क...