आपण पोटाची चरबी कमी करण्यासाठी भरपूर व्यायाम करतो परंतु आपल्याला पाहिजे तेवढा परिणाम दिसत नाही परंतु जर मी इथे असे म्हटले कि कमी कष्ट करून सुद्धा तुम्ही तुमच्या पोटावरील चरबी कमी करू शकता तर आश्चर्य वाटू देऊ नका. कारण नियमित काही योगासने करून आपण हे सहज करू शकतो. शरीरातील चरबी करण्या बरोबर या आसनाचे इतरही भरपूर फायदे आपल्या शरीराला होतात, त्याबद्दल आपण खाली सविस्तर जाणून घेऊयात. हे आसन एकपाद उत्तानासनाप्रमाणेच आहे फक्त या आसनामध्ये दोन्ही पाय वर उचलायचे आहेत. शरीरातील स्थूलपणा कमी करण्यासाठी हि दोन आसने फार उपयोगी आहेत. कृती: (Uttanpadasana Steps) पाठीवर सरळ झोपा. दोन्ही हात आपल्या शरीराला समांतर ठेवा. दोन्ही पायांच्या टाचा जोडून पाय सरळ ठेवा. हळूहळू श्वास घेत राहा. आता पाय हळूहळू वर आकाशाकडे उचला. काही सेकंद ह्याच स्तिथीत राहा, या स्तिथीत श्वास रोखून धारा. दोन्ही पाय हळूहळू खाली आना. आता रोखलेला श्वास हळू हळू सोडा. थोडा वेळ आराम करा आणि पुन्हा हीच क्रिया परत करा. सुरुवातीला हे आसन दिवसातून चार वेळा कर...
भुजंगासन (Bhujangasana) माहिती | फायदे, कृती, काळजी व उपयोग भुजंगासन म्हणजे काय? 'भुजंग' म्हणजे नाग किंवा साप. या आसनामध्ये शरीराचा आकार फणा काढलेल्या नागासारखा दिसतो म्हणून या आसनाला भुजंगासन (Bhujangasana) असे म्हणतात. इंग्रजीमध्ये याला Cobra Pose असे म्हणतात. हे पोटावर झोपून केले जाणारे एक प्रभावी योगासन असून पाठीचा कणा, खांदे, छाती आणि पोटाच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जण संगणकासमोर तासन्तास बसून काम करतात. त्यामुळे पाठदुखी, मानेचा त्रास आणि शरीराची लवचिकता कमी होणे या समस्या वाढताना दिसतात. अशा वेळी योग्य पद्धतीने आणि नियमितपणे केलेले भुजंगासन शरीराला मोठा फायदा देऊ शकते. माझा भुजंगासनाचा अनुभव (My Experience) मी व्यवसायाने IT क्षेत्रात Automation Test Engineer म्हणून काम करतो. माझ्या कामाचा बहुतांश वेळ संगणकासमोर बसून जातो. सुरुवातीला सलग ८–१० तास बसून काम केल्यामुळे मला वारंवार पाठदुखी, मानेचा ताण आणि खांद्यामध्ये जडपणा जाणवू लागला. काही दिवस तर सकाळी उठल्यावरही पाठीमध्ये ताठरपणा जाणवत असे. यानंतर मी नियमित य...