सिंहासन चौऱ्याऐंशी आसनांपैकी हे एक आसन असून सिंहासनालाच ( sinhasana ) 'भैरावासन' असेही म्हणतात. हे आसन करताना आपली जीभ बाहेर ताणल्या जाते त्यामुळे आपल्या घश्यातील सर्व यंत्रणेचा व्यायाम होतो. आपल्या घश्यातील रक्ताभिसरण सुरळीत होते त्यामुळे आपल्या लाळ ग्रंथींचे कार्य सुधारते. खाली आपण सिंहासनाची कृती व फायदे या बद्दल सर्व माहिती मराठी मध्ये जाणून घेऊयात. Image Source: https://pixahive.com/photo/simha-vajrasana-lion-pose-2/ कृती: वरील आकृतीत दाखवल्या प्रमाणे दोन्ही पाय पाठीमागे नेऊन टाचांवर बसावे. टाचा नितंबाच्या दोन्ही बाजूला टेकवा. दोन्ही गुडघ्यात थोडे अंतर ठेवावे.. आता उजव्या हाताचा पंजा उजव्या गुडघ्यावर व डाव्या हाताचा पंज्या डाव्या गुडघ्यावर ठेवा. नंतर दोन्ही नाकपुड्यांतून व तोंडातून श्वास बाहेर सोडत असतानाच जीभ जास्तीत जास्त बाहेर काढावी. जीभ बाहेर काढत असतानाच आतील संपूर्ण श्वास बाहेर सोडावा. आता संपूर्ण श्वास बाहेर सोडून झाल्यावर परत श्वास घेऊ नका काही वेळासाठी श्वास बाहेरच रोखून धरा. आता ताठ बसून राहा चेहऱ्यावर...
भुजंगासन 'भुजंग' म्हणजे साप. या आसनामध्ये शरीराचा आकार नागाच्या उभारलेल्या फण्यासारखा दिसतो म्हणून या आसनास 'भुजंगासन' असे म्हणतात. येथे आपण भुजंगासन त्याची कृती व आपल्या शरीराला त्याचे होणारे फायदे या बद्दल संपूर्ण माहिती आपल्या मायबोली मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. (Bhujangasana information in Marathi) pic credit: https://pixahive.com/photo/purn-bhujangasana/ कृती: भुजंगासन हे पोट जमिनीला टेकवून करण्याच्या आसनपद्धती पैकी एक आसन आहे, त्यामुळे प्रथम जमीनीवर पालथे झोपा. हनुवटी छातीला टेकवा आणि कपाळ जमिनीला टेकवा. सर्व शरीर हलके करा. हाताचे पंजे छातीजवळ आना नंतर हातांच्या पंज्यावर शरीराचा भार देऊन बेंबीपासूनचा भाग हळू हळू वर उचला. कमरेखालचा भाग बिलकुल हलू देऊ नका. आकृतीत दाखवल्या प्रमाणे कृती करा. पायाची बोटे ताणून जमिनीवर टेकवा . असे केल्याने पाठ आणि खांद्याच्या मधील भागातील स्नायू व्यवस्तीत ताणले जातात. पोटातील सर्व स्नायूंवर सुद्धा व्यवस्तीत ताण पडतो. या आसनस्थितीत श्वास रोखून धरा. आठ ते दहा सेकंद हे असं क...