उत्थित पद्मासन (Utthita Padmasana ) या आसनामध्ये दोन्ही हातांचे पंजे जमिनीवर टेकवून शरीर वर उचलण्यात येते. त्यामुळेच या आसनाला 'उत्थित पद्मासन' किंवा 'लोलासन' किंवा 'डोलासन ' असे म्हणतात. पद्मासनापेक्षा हे आसन करणे थोडे अवघड जाते. या आसनाच्या सरावाने अति झोप येण्याची तक्रार दूर होते. या आसनाच्या सरावामुळे मन प्रसन्न व शरीर सुदृढ बनते व तसेच हायपर टेन्शन, डायबेटिज , अनिद्रा या सारख्या समस्या सुद्धा दूर होतात. उत्थित पद्मासनामुळे आपल्या शरीराला मिळणारे सर्व फायदे खाली मराठी मध्ये दिलेले आहेत. (Utthit Padmasana Benefits in Marathi) कृती : सुरुवातीला पद्मासन अवस्थेत बसा नंतर दोन्ही बाजूला दोन्ही हातांचे पंजे जमिनीवर ठेवावे व हळूहळू शरीर वर उचला. हे आसन करताना शरीराला हिसका बसणार नाही व दोन्ही हात थरथर करणार नाही याची काळजी घ्यावी. शरीर जितक्या वेळ वर हवेत राहील तितक्या वेळ श्वास रोखून धरावा. नितंब जमिनीवर टेकल्यानंतरच श्वास सोडावा. हे आसन करताना सुरुवातीला अनेकांचे हात अशक्तपणामुळे थरथर कापतात परंतु ...
भुजंगासन 'भुजंग' म्हणजे साप. या आसनामध्ये शरीराचा आकार नागाच्या उभारलेल्या फण्यासारखा दिसतो म्हणून या आसनास 'भुजंगासन' असे म्हणतात. येथे आपण भुजंगासन त्याची कृती व आपल्या शरीराला त्याचे होणारे फायदे या बद्दल संपूर्ण माहिती आपल्या मायबोली मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. (Bhujangasana information in Marathi) pic credit: https://pixahive.com/photo/purn-bhujangasana/ कृती: भुजंगासन हे पोट जमिनीला टेकवून करण्याच्या आसनपद्धती पैकी एक आसन आहे, त्यामुळे प्रथम जमीनीवर पालथे झोपा. हनुवटी छातीला टेकवा आणि कपाळ जमिनीला टेकवा. सर्व शरीर हलके करा. हाताचे पंजे छातीजवळ आना नंतर हातांच्या पंज्यावर शरीराचा भार देऊन बेंबीपासूनचा भाग हळू हळू वर उचला. कमरेखालचा भाग बिलकुल हलू देऊ नका. आकृतीत दाखवल्या प्रमाणे कृती करा. पायाची बोटे ताणून जमिनीवर टेकवा . असे केल्याने पाठ आणि खांद्याच्या मधील भागातील स्नायू व्यवस्तीत ताणले जातात. पोटातील सर्व स्नायूंवर सुद्धा व्यवस्तीत ताण पडतो. या आसनस्थितीत श्वास रोखून धरा. आठ ते दहा सेकंद हे असं क...