उत्थित पद्मासन (Utthita Padmasana )
या आसनामध्ये दोन्ही हातांचे पंजे जमिनीवर टेकवून शरीर वर उचलण्यात येते. त्यामुळेच या आसनाला 'उत्थित पद्मासन' किंवा 'लोलासन' किंवा 'डोलासन' असे म्हणतात. पद्मासनापेक्षा हे आसन करणे थोडे अवघड जाते. या आसनाच्या सरावाने अति झोप येण्याची तक्रार दूर होते. या आसनाच्या सरावामुळे मन प्रसन्न व शरीर सुदृढ बनते व तसेच हायपर टेन्शन, डायबेटिज , अनिद्रा या सारख्या समस्या सुद्धा दूर होतात.
उत्थित पद्मासनामुळे आपल्या शरीराला मिळणारे सर्व फायदे खाली मराठी मध्ये दिलेले आहेत. (Utthit Padmasana Benefits in Marathi)

कृती :
- सुरुवातीला पद्मासन अवस्थेत बसा नंतर दोन्ही बाजूला दोन्ही हातांचे पंजे जमिनीवर ठेवावे व हळूहळू शरीर वर उचला.
- हे आसन करताना शरीराला हिसका बसणार नाही व दोन्ही हात थरथर करणार नाही याची काळजी घ्यावी.
- शरीर जितक्या वेळ वर हवेत राहील तितक्या वेळ श्वास रोखून धरावा.
- नितंब जमिनीवर टेकल्यानंतरच श्वास सोडावा.
- हे आसन करताना सुरुवातीला अनेकांचे हात अशक्तपणामुळे थरथर कापतात परंतु सरावानंतर हा थरथरपणा बंद होतो.
फायदे:(Benefits of Uthita Padmasana)
- या आसनाच्या नित्य सरावामुळे हातापायांचे सांधे मजबूत बनतात.
- या आसनाच्या नियमित सरावामुळे हातापायामध्ये निर्माण झालेली दुर्लबलता दूर होते.
- शरीरात चैतन्य आणि संतुलन विकसित करते.
- हायपर टेन्शन, डायबेटिज , अनिद्रा या सारख्या समस्या सुद्धा दूर होतात.
- या आसनाच्या नियमित सरावाने जठराग्नी प्रदीप्त होतो, मन प्रसन्न राहते आणि शरीर सुदृढ बनते.
- या आसनाच्या नियमित सरावामुळे बद्धकोष्टता, मुरडा येणे, अजीर्ण होणे या सारखे विकार दूर होतात.
- फार झोप येण्याची तक्रार सुद्धा दूर होते.
Comments
Post a Comment
आपल्या सुचनांचे स्वागत आहे.
भेट दिल्या बद्दल धन्यवाद. 🙏