मकर हा संस्कृत शब्द असून त्याचा अर्थ मगर असा होतो. हे आसन करत असताना शरीराचा आकार मगरी सारखा दिसतो म्हणून याला 'मकरासन' ( Makarasana - crocodile pose ) असे म्हणतात. शवासनाप्रमाणेच या आसनाच्या सरावामुळे शरीराला संपूर्ण आराम मिळतो. आळस घालविण्यासाठी हे एक सर्वोत्तम आसन असून या आसनाच्या नित्य सरावामुळे शरीरात एक नवचैतन्य निर्माण होते. लैंगिक समस्या असलेल्याना हे आसन भरपूर फायदेशीर आहे. अलिकडच्या काळात कोव्हीडमुळे श्वसनाचा त्रास असलेल्या रुग्णांना पोटावर झोपवलेले दिसत आहे, या पद्धतीला वैद्यकीय भाषेत प्रोनिंग( Proning ) असे म्हणतात. हि प्रोनिंग पद्धत योगासनात सांगितलेल्या मकरासनाप्रमाणेच आहे. आपल्या फुफ्फुसांचा जड भाग हा पाठीमागे आहे. पाठीवर झोपल्यामुळे शरीराचा सर्व भार त्यावर पडतो व फुफ्फुसांमध्ये पुरेश्या प्रमाणात हवा भरल्या जात नाही. मकरासन करताना आपण पोटावर झोपतो तेंव्हा फुफ्फुसाच्या मागच्या भागापर्यंत हवा भरल्या जाते व फुफ्फुसांना भरपूर मोठ्या प्रमाणात ऑक्सिजनचा पुरवठा होतो. या आसनाची खाली दिलेली कृती नीट वाचुनच या आसनाचा सराव करावा. pic credi...
भुजंगासन 'भुजंग' म्हणजे साप. या आसनामध्ये शरीराचा आकार नागाच्या उभारलेल्या फण्यासारखा दिसतो म्हणून या आसनास 'भुजंगासन' असे म्हणतात. येथे आपण भुजंगासन त्याची कृती व आपल्या शरीराला त्याचे होणारे फायदे या बद्दल संपूर्ण माहिती आपल्या मायबोली मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. (Bhujangasana information in Marathi) pic credit: https://pixahive.com/photo/purn-bhujangasana/ कृती: भुजंगासन हे पोट जमिनीला टेकवून करण्याच्या आसनपद्धती पैकी एक आसन आहे, त्यामुळे प्रथम जमीनीवर पालथे झोपा. हनुवटी छातीला टेकवा आणि कपाळ जमिनीला टेकवा. सर्व शरीर हलके करा. हाताचे पंजे छातीजवळ आना नंतर हातांच्या पंज्यावर शरीराचा भार देऊन बेंबीपासूनचा भाग हळू हळू वर उचला. कमरेखालचा भाग बिलकुल हलू देऊ नका. आकृतीत दाखवल्या प्रमाणे कृती करा. पायाची बोटे ताणून जमिनीवर टेकवा . असे केल्याने पाठ आणि खांद्याच्या मधील भागातील स्नायू व्यवस्तीत ताणले जातात. पोटातील सर्व स्नायूंवर सुद्धा व्यवस्तीत ताण पडतो. या आसनस्थितीत श्वास रोखून धरा. आठ ते दहा सेकंद हे असं क...