Skip to main content

Posts

Showing posts from June, 2021

भद्रासन मराठी माहिती | Bhadrasana information in marathi

भद्रासन (Bhadrasana) भद्रासनालाच बद्धकोनासन असे सुद्धा म्हणतात. भद्रासनाच्या सरावामुळे पायाच्या सांध्यांना भरपूर व्यायाम मिळतो त्यामुळे आपल्या पायांची आणि मांड्यांची लवचिकता वाढते. तसेच कंबरदुखी, डोकेदुखी, उलटी, दमा या सारख्या अनेक आजारांपासून आपल्याला मुक्तता मिळते. आपल्या चंचल मनावर ताबा मिळवण्यासाठी हे आसन फार उपयुक्त असून या आसनाच्या सरावामुळे आपली स्मरणशक्ती सुद्धा वाढते तसेच या आसनाच्या नियमित  सरावामुळे मनःशांती मिळते. भद्रासनच्या सरावामुळे मुलचक्र कार्यान्वित होते. हे आसन करण्यासाठी अत्यंत सोपे आणि आरामदायी असल्यामुळे आपण या आसनाचा सराव भरपूर वेळेपर्यंत करू शकतो. हठयोग प्रदीपिकेमध्ये भद्रासन हे ध्यानधारणे साठी उत्तम असे आसन आहे असे सांगितले आहे. खाली आपण भद्रासनाची कृती आणि फायदे या बद्दल मराठी मध्ये माहिती बघुयात.(Bhadrasana information in marathi)  pic credit:  https://upload.wikimedia.org/wikipedia/commons/6/64/Baddha_konasana.jpg कृती: सर्वप्रथम जमिनीवर पांघरलेल्या आसनावर पाय सरळ लांबवून बसावे.  आता दोन्ही पाय गुडघ्यातून वाकवून पा...

योगनिद्रा म्हणजे काय?

येथे  योगनिद्रा(Yog-nidra) म्हणजे काय? आणि त्याचे फायदे या बद्दल थोडक्यात माहिती दिली आहे.   योगनिद्रा चा सराव कसा करावा या बद्दल अधिक माहितीसाठी  yog-nidra  लिंकवर क्लिक करा  आणि व्हिडीओ शेयर करायला विसरू                               धन्यवाद !

योगनिद्रा म्हणजे काय? | Yog Nidra

 योगनिद्रा   योगनिद्रा(Yog Nidra) म्हणजे काय? हे साध्या भाषेत सांगायचे झाल्यास, योगनिद्रा म्हणजे झोपणे आणि जागी राहण्याच्या मधल्या अवस्थेला योगनिद्रा असे म्हणतात. योगनिद्रा करण्याची ठराविक वेळ म्हणजे योगासने करून झाल्यानंतर, कारण योगासने केल्यानंतर आपल्या शरीरात जी ऊर्जा निर्माण होते त्या उर्जेला जतन करण्याचे किंवा शरीरात साठवून ठेवण्याचे काम योगनिद्रेद्वारे केले जाते. तसेच योगनिद्रेच्या सरावामुळे निद्रानाश दूर होतो व आपल्याला शांत झोप लागते. हि एकप्रकारची ध्यानमुद्रा असून या ध्यानमुद्रेचा सराव आपण शवासनात करू शकतो. हि मुद्रा करताना आपण आपल्या आवडीचे संगीत किंवा आवडीची गाणी ऐकू शकतो. योगनिद्रेमधे ध्यान कसे लावायचे याबद्दल सविस्तर माहिती आपण मराठी मध्ये जाणून घेऊयात.(Yog Nidra information in marathi)   Photo by  Karolina Grabowska  from  Pexels कृती: प्रथम आपल्या आसनावर(Yoga Mat) शवासनात झोपावे.  आपले दोन्ही हात शरीराच्या अंतर शरीराला समांतर असे ठेवा.  डोळे बंद करून खोल श्वास घ्या आणि बाहेर सोडा.  योगनिद्रा करताना...

पर्वतासन मराठी माहिती | Parvatasana Information in Marathi

पर्वतासन pic credit:  https://www.pxfuel.com/en/free-photo-enudt/download      हे आसन करताना आपल्या शरीराची आकृती पर्वताप्रमाणे बनते. अत्यंत साधे असणारे हे आसन आपल्या शरीराला अनेक फायदे देणारे आहे. या आसनाच्या नियमित सरावामुळे फुफ्फुसाचे आणि पोटाचे विकार नाहीसे होतात. पाठदुखी साठी एक चांगला उपाय म्हणून आपण हे आसन करू शकतो. या आसनामध्ये शरीराचा समतोल साधला जातो त्याचाच फायदा मन एकाग्र करण्यासाठी होतो. येथे आपण पर्वतासनाची कृती आणि त्याचे फायदे या बद्दल विस्तृत अशी मराठी मध्ये माहिती जाणून घेऊयात.(Parvatasana information in marathi)   कृती: प्रथम आपल्या आसनावर (Yoga Mat वरती) पद्मासनात बसावे.   दोन्ही हातांचा नमस्कार करून छातीजवळ ठेवा.  जोडलेले दोन्ही हात हळू हळू डोक्याच्या वर न्या.  आपल्या दोन्ही तळहातांची बोटे एकमेकांना चिपकलेली राहतील तसेच दोन्ही हात आपल्या कानांना चिटकतील आणी सरळ वरती ताठ राहतील कोपऱ्या मध्ये वाकणार नाहीत याची काळजी घ्या.  दोन्ही हात वर नेताना श्वास आत घ्या. हात वरती ताणल्या गेल्यावर काही वेळास...

जांभूळ खाण्याचे फायदे (Indian Blackberry)

जांभूळ  आंब्याचा मौसम संपल्या नंतर मिळणारे आंबट, तुरट, गोड अशी समीश्र चव असलेले  एक गावरान फळ म्हणजेच जांभूळ. या फळाला इंग्रजी मध्ये Java plum किंवा Indian blackberry असे म्हणतात. साधारण मे आणि जून या दोन महिन्यामध्ये हे फळ आपल्याला खाण्यासाठी उपलब्ध असते. मधुमेह या आजारासाठी गुणकारी औषध म्हणजेच जांभूळ. या रोग्यांना जांभळाच्या बियांचे चूर्ण औषध स्वरूपात दिले जाते. तसेच उच्च रक्तचाप, हृदयविकार, पोटाचे विकार या सारख्या अनेक दुर्धर रोगांवर जांभूळ लाभदायक आहे. वर्षातून फक्त दोनच महिने मिळणाऱ्या या फळाचे अनेक असे गुणकारी फायदे आहेत. पुढे आपण जांभूळ खाण्याचे सविस्तर फायदे जाणून घेउयात. (  Benefits of Indian Blackberry) pic credit: Image by  Bishnu Sarangi  from  Pixabay   मधुमेह नियंत्रित होतो: जांभळामध्ये अँटी डायबेटिक गुणधर्म आहेत म्हणून ज्या लोकांना मधुमेह आहे त्यांनी जांभूळ नक्कीच खावे कारण त्यांच्यासाठी जांभूळ खाणे हे मधुमेहासाठी औषधी घेण्यासारखेच आहे. मधुमेहाच्या उपचारासाठी जांभळांच्या बियांची पाऊडर सुद्धा वापरली जाते. हि पॉवडर दिवसातून द...

बालासन योग करण्याचे फायदे (Balasana Yoga Karanyache Fayde)

बालासन  सध्याच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात आपल्याला आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्याची खूप गरज आहे आणि त्यासाठी नियमित योगासने करणे खूप गरजेचे आहे. मानसिक आरोग्य उत्तम राखणासाठी आणि आपली स्मरण शक्ती वाढविण्यासाठी एक महत्वाचे आसन म्हणजे बालासन . हा एक असा योगप्रकर आहे ज्याच्या सरावामुळे आपल्याला अध्यात्मिक उत्तुंगता, शारीरिक आराम आणि मानसिक स्थिरता मिळते. या आसनाला इंग्रजी मध्ये चाईल्ड पोझ ( Child Pose ) असे सुद्धा म्हणतात, कारण हि आसनावस्था गर्भातील बालकाप्रमाणे भासते. ज्या प्रमाणे गर्भातील बालकाला जेव्हडा आराम गर्भामध्ये मिळतो तेव्हडाच आराम या आसनाच्या सरावानंतर आपल्यला मिळतो. हे आसन करताना आपली श्वसन प्रणाली उत्तमरीत्या कार्य करते. या आसनाच्या नियमित सरावामुळे आपल्या मज्जासंस्थेचे कार्य सुधारते व आपल्या मेंदूला भरपूर रक्तपुरवठा मिळून मेंदू विषयीच्या भरपूर तक्रारी दूर होतात. लहान मुलांना हे आसन करण्यासाठी नक्कीच प्रेरित करावे कारण हे आसन बालकांना करता येईल इतके सोपे असून या आसनाच्या सरावामुळे त्यांची स्मरण शक्ती वाढण्यास नक्कीच मदत होते....

२१ जून - जागतिक योगा दिवस (International Yoga Day)

 योगासनांच्या नियमित सरावामुळे आपले आयुष्य निरोगी व सुखकर बनते. आपल्या पूर्वजांनी आपले शरीर, मन आणि प्राणाच्या शुद्धीसाठी योगाच्या आठ अंगांचा मार्ग सुचविला आहे यालाच 'अष्टांग योग' असे म्हणतात. यम, नियम, आसन, प्राणायाम , प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी हि योगा ची आठ अंगे आहेत. आसन हे अष्टांग योगाचे फक्त एक अंग आहे. शरीराच्या अंतर आणि बाह्य भागांना निरोगी ठेवण्याची क्रिया म्हणजेच योगासने. २१ जून हा जागतिक योगा दिवस( International Yoga Day ) म्हणून साजरा केला जातो त्याबद्दल संपूर्ण माहिती आपण येथे निबंध स्वरूपात जाणून घेऊयात.   Image by  AYMYogaSchool  from  Pixabay   आता आपण योगा दिवसाची सुरुवात कधी आणि कशी झाली याबद्दल थोडी माहिती जाणून घेऊयात. आपले आयुष्य निरोगी आणि सुखकर करण्याचा हा मंत्र संपूर्ण जगाला मिळावा, योगा अभ्यासाचा संपूर्ण जगात प्रचार आणि प्रसार व्हावा या साठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्राच्या महासभेत २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्...

Popular posts from this blog

भुजंगासन (Bhujangasana) माहिती | फायदे, कृती, काळजी व उपयोग | ByYogesh

भुजंगासन (Bhujangasana) माहिती | फायदे, कृती, काळजी व उपयोग  भुजंगासन म्हणजे काय? 'भुजंग' म्हणजे नाग किंवा साप. या आसनामध्ये शरीराचा आकार फणा काढलेल्या नागासारखा दिसतो म्हणून या आसनाला भुजंगासन (Bhujangasana) असे म्हणतात. इंग्रजीमध्ये याला Cobra Pose असे म्हणतात. हे पोटावर झोपून केले जाणारे एक प्रभावी योगासन असून पाठीचा कणा, खांदे, छाती आणि पोटाच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जण संगणकासमोर तासन्तास बसून काम करतात. त्यामुळे पाठदुखी, मानेचा त्रास आणि शरीराची लवचिकता कमी होणे या समस्या वाढताना दिसतात. अशा वेळी योग्य पद्धतीने आणि नियमितपणे केलेले भुजंगासन शरीराला मोठा फायदा देऊ शकते. माझा भुजंगासनाचा अनुभव (My Experience) मी व्यवसायाने IT क्षेत्रात Automation Test Engineer म्हणून काम करतो. माझ्या कामाचा बहुतांश वेळ संगणकासमोर बसून जातो. सुरुवातीला सलग ८–१० तास बसून काम केल्यामुळे मला वारंवार पाठदुखी, मानेचा ताण आणि खांद्यामध्ये जडपणा जाणवू लागला. काही दिवस तर सकाळी उठल्यावरही पाठीमध्ये ताठरपणा जाणवत असे. यानंतर मी नियमित य...

धनुरासन (Dhanurasana) माहिती | कृती, फायदे, काळजी आणि योग्य पद्धत

धनुरासन म्हणजे काय? धनुरासन (Dhanurasana) हे पोटावर झोपून केले जाणारे योगासन आहे. या आसनामध्ये दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून हातांनी घोटे पकडले जातात आणि छाती व पाय वर उचलले जातात. त्यामुळे शरीराचा आकार धनुष्याप्रमाणे दिसतो. म्हणून या आसनाला धनुरासन असे नाव देण्यात आले आहे. धनुरासन हे पाठीचा कणा, छाती, खांदे, पोट आणि पायांच्या स्नायूंवर काम करणारे एक मागे वाकण्याचे आसन आहे. नियमित आणि योग्य पद्धतीने सराव केल्यास शरीराची लवचिकता आणि स्नायूंची ताकद सुधारण्यास मदत होऊ शकते. धनुरासन आणि भुजंगासनाचा संबंध धनुरासन करताना शरीराचा पुढील भाग वर उचलला जात असल्यामुळे त्यामध्ये भुजंगासनासारखा मागे वाकण्याचा भाग जाणवतो. तसेच पाय वर उचलल्यामुळे शरीराच्या मागील भागातील स्नायूंवरही ताण येतो. मात्र धनुरासन हे भुजंगासन आणि शलभासन यांचे केवळ साधे "एकत्रीकरण" आहे असे म्हणण्यापेक्षा, या दोन्ही आसनांमध्ये आढळणाऱ्या काही हालचालींसारखी शरीराची स्थिती धनुरासनात दिसते , असे सांगणे अधिक योग्य आहे. माझा योगाभ्यासाचा अनुभव मी IT क्षेत्रात काम करत असल्यामुळे माझ्या कामाचा बराच वेळ संगणकासमोर ब...

पद्मासन (Padmasana) माहिती मराठीत | कृती, फायदे आणि खबरदारी

पद्मासन (Padmasana) माहिती मराठीत | कृती, फायदे आणि खबरदारी पद्मासन (Padmasana) हे योगातील सर्वात प्रसिद्ध आणि पारंपरिक ध्यानासनांपैकी एक आहे. "पद्म" म्हणजे कमळ. या आसनामध्ये बसल्यावर शरीराचा आकार कमळासारखा दिसतो, म्हणून याला पद्मासन किंवा इंग्रजीमध्ये Lotus Pose असे म्हणतात. ध्यान, प्राणायाम आणि मानसिक शांततेसाठी हे आसन अत्यंत उपयुक्त मानले जाते. नियमित सराव केल्यास शरीराची लवचिकता वाढण्यास, मन शांत राहण्यास आणि एकाग्रता सुधारण्यास मदत होऊ शकते. महत्त्वाची सूचना: पद्मासन करताना शरीरावर जबरदस्ती करू नका. गुडघा किंवा घोट्याचा त्रास असल्यास योगतज्ज्ञांचा सल्ला घ्या. पद्मासन कसे करावे? (Padmasana Steps) स्वच्छ आणि सपाट जागेवर चटई अंथरून बसा. दोन्ही पाय समोर सरळ पसरवा. उजवा पाय अलगद उचलून डाव्या मांडीवर ठेवा. त्यानंतर डावा पाय उचलून उजव्या मांडीवर ठेवा. दोन्ही गुडघे जमिनीच्या दिशेने ठेवण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा आणि अंगठा व तर्जनी एकमेकांना स्पर्श करून ज्ञानमुद्रा धरा. पाठीचा कणा, मान आणि डोके सरळ ठेवा. डोळे बंद करून सामान्य श्वास घेत १ ते ५ मिनिटे ध्यान क...