योगनिद्रा
योगनिद्रा(Yog Nidra) म्हणजे काय? हे साध्या भाषेत सांगायचे झाल्यास, योगनिद्रा म्हणजे झोपणे आणि जागी राहण्याच्या मधल्या अवस्थेला योगनिद्रा असे म्हणतात. योगनिद्रा करण्याची ठराविक वेळ म्हणजे योगासने करून झाल्यानंतर, कारण योगासने केल्यानंतर आपल्या शरीरात जी ऊर्जा निर्माण होते त्या उर्जेला जतन करण्याचे किंवा शरीरात साठवून ठेवण्याचे काम योगनिद्रेद्वारे केले जाते. तसेच योगनिद्रेच्या सरावामुळे निद्रानाश दूर होतो व आपल्याला शांत झोप लागते. हि एकप्रकारची ध्यानमुद्रा असून या ध्यानमुद्रेचा सराव आपण शवासनात करू शकतो. हि मुद्रा करताना आपण आपल्या आवडीचे संगीत किंवा आवडीची गाणी ऐकू शकतो. योगनिद्रेमधे ध्यान कसे लावायचे याबद्दल सविस्तर माहिती आपण मराठी मध्ये जाणून घेऊयात.(Yog Nidra information in marathi)
![]() |
| Photo by Karolina Grabowska from Pexels |
कृती:
- प्रथम आपल्या आसनावर(Yoga Mat) शवासनात झोपावे.
- आपले दोन्ही हात शरीराच्या अंतर शरीराला समांतर असे ठेवा.
- डोळे बंद करून खोल श्वास घ्या आणि बाहेर सोडा.
- योगनिद्रा करताना आपल्या श्वासोश्वासाकडे लक्ष असू द्या, श्वासोश्वास हा झपझप नसावा, आपला श्वास हा खोल आणि लयबद्ध असायला हवा.
- आता आपल्या शरीराच्या एका एका अवयवाकडे आपले लक्ष केंद्रित करा. उदाहरणार्थ सुरुवातीला आपल्या उजव्या तळपायाकडे लक्ष केंद्रित करा, त्या अवयवाला शिथिल करण्याचा प्रयत्न करा त्या ठिकाणी लक्ष केंद्रित करा.
- आता हळू हळू वर येऊन शरीराच्या बाकी एका एका अवयवांकडे सुद्धा लक्ष केंद्रित करून त्यांना शिथिल करा.
- असे करत असताना आपल्या शरीराच्या प्रत्येक अवयवांना जागृतपणे अनुभवा.
- आता शेवटी आपल्या शरीरातील संपूर्ण थकवा नष्ट होऊन एक नवीन उत्साह निर्माण झाल्याची अनुभूती करा.
- शेवटच्या टप्प्यात आपल्या आजूबाजूच्या परिसराशी एकरूप होऊन हळुवारपणे डाव्या अंगावर येऊन उठून बसा.
- आता खूप सावकाशपणे आपले डोळे उघडा.
फायदे:
- योगनिद्रेच्या सरावामुळे शरीरात उत्पन्न होणारे विषारी द्रव्य बाहेर फेकल्या जातात.
- या आसनाच्या सरावाने निद्रानाश दूर होते व आपल्याला शांत झोप लागते.
- दिवसभराच्या ताण तणावापासून आपल्याला मुक्तता मिळते.
- मनात होणाऱ्या असंख्य विचाराच्या उत्पत्तीला थोडा लगाम मिळतो आपले शरीर आपल्या अंतरात्म्यासोबत जोडले जाते.
- दैनंदिन तणावापासून मुक्तता मिळून मानसिक सुखाची अनुभूती येते.
महत्वाच्या सूचना:
हे आसन करताना सैल कपडे वापरावे. आपले आसन मोकळ्या जागेत आणि जागा सपाट असेल याची काळजी घ्यावी.
जमिनीवर झोपल्यानंर आपली आसनस्थिती आरामदायी असायला हवी.

Comments
Post a Comment
आपल्या सुचनांचे स्वागत आहे.
भेट दिल्या बद्दल धन्यवाद. 🙏