जांभूळ आंब्याचा मौसम संपल्या नंतर मिळणारे आंबट, तुरट, गोड अशी समीश्र चव असलेले एक गावरान फळ म्हणजेच जांभूळ. या फळाला इंग्रजी मध्ये Java plum किंवा Indian blackberry असे म्हणतात. साधारण मे आणि जून या दोन महिन्यामध्ये हे फळ आपल्याला खाण्यासाठी उपलब्ध असते. मधुमेह या आजारासाठी गुणकारी औषध म्हणजेच जांभूळ. या रोग्यांना जांभळाच्या बियांचे चूर्ण औषध स्वरूपात दिले जाते. तसेच उच्च रक्तचाप, हृदयविकार, पोटाचे विकार या सारख्या अनेक दुर्धर रोगांवर जांभूळ लाभदायक आहे. वर्षातून फक्त दोनच महिने मिळणाऱ्या या फळाचे अनेक असे गुणकारी फायदे आहेत. पुढे आपण जांभूळ खाण्याचे सविस्तर फायदे जाणून घेउयात. ( Benefits of Indian Blackberry) pic credit: Image by Bishnu Sarangi from Pixabay मधुमेह नियंत्रित होतो: जांभळामध्ये अँटी डायबेटिक गुणधर्म आहेत म्हणून ज्या लोकांना मधुमेह आहे त्यांनी जांभूळ नक्कीच खावे कारण त्यांच्यासाठी जांभूळ खाणे हे मधुमेहासाठी औषधी घेण्यासारखेच आहे. मधुमेहाच्या उपचारासाठी जांभळांच्या बियांची पाऊडर सुद्धा वापरली जाते. हि पॉवडर दिवसातून द...
भुजंगासन (Bhujangasana) माहिती | फायदे, कृती, काळजी व उपयोग भुजंगासन म्हणजे काय? 'भुजंग' म्हणजे नाग किंवा साप. या आसनामध्ये शरीराचा आकार फणा काढलेल्या नागासारखा दिसतो म्हणून या आसनाला भुजंगासन (Bhujangasana) असे म्हणतात. इंग्रजीमध्ये याला Cobra Pose असे म्हणतात. हे पोटावर झोपून केले जाणारे एक प्रभावी योगासन असून पाठीचा कणा, खांदे, छाती आणि पोटाच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जण संगणकासमोर तासन्तास बसून काम करतात. त्यामुळे पाठदुखी, मानेचा त्रास आणि शरीराची लवचिकता कमी होणे या समस्या वाढताना दिसतात. अशा वेळी योग्य पद्धतीने आणि नियमितपणे केलेले भुजंगासन शरीराला मोठा फायदा देऊ शकते. माझा भुजंगासनाचा अनुभव (My Experience) मी व्यवसायाने IT क्षेत्रात Automation Test Engineer म्हणून काम करतो. माझ्या कामाचा बहुतांश वेळ संगणकासमोर बसून जातो. सुरुवातीला सलग ८–१० तास बसून काम केल्यामुळे मला वारंवार पाठदुखी, मानेचा ताण आणि खांद्यामध्ये जडपणा जाणवू लागला. काही दिवस तर सकाळी उठल्यावरही पाठीमध्ये ताठरपणा जाणवत असे. यानंतर मी नियमित य...