Skip to main content

जांभूळ खाण्याचे फायदे (Indian Blackberry)

जांभूळ 

आंब्याचा मौसम संपल्या नंतर मिळणारे आंबट, तुरट, गोड अशी समीश्र चव असलेले एक गावरान फळ म्हणजेच जांभूळ. या फळाला इंग्रजी मध्ये Java plum किंवा Indian blackberry असे म्हणतात. साधारण मे आणि जून या दोन महिन्यामध्ये हे फळ आपल्याला खाण्यासाठी उपलब्ध असते. मधुमेह या आजारासाठी गुणकारी औषध म्हणजेच जांभूळ. या रोग्यांना जांभळाच्या बियांचे चूर्ण औषध स्वरूपात दिले जाते. तसेच उच्च रक्तचाप, हृदयविकार, पोटाचे विकार या सारख्या अनेक दुर्धर रोगांवर जांभूळ लाभदायक आहे. वर्षातून फक्त दोनच महिने मिळणाऱ्या या फळाचे अनेक असे गुणकारी फायदे आहेत. पुढे आपण जांभूळ खाण्याचे सविस्तर फायदे जाणून घेउयात. ( Benefits of Indian Blackberry)

Indian blackberry
pic credit: Image by Bishnu Sarangi from Pixabay 

मधुमेह नियंत्रित होतो: जांभळामध्ये अँटी डायबेटिक गुणधर्म आहेत म्हणून ज्या लोकांना मधुमेह आहे त्यांनी जांभूळ नक्कीच खावे कारण त्यांच्यासाठी जांभूळ खाणे हे मधुमेहासाठी औषधी घेण्यासारखेच आहे. मधुमेहाच्या उपचारासाठी जांभळांच्या बियांची पाऊडर सुद्धा वापरली जाते. हि पॉवडर दिवसातून दोनवेळा दुधातून किंवा पाण्यातून घेतली जाते. त्यामुळे जांभळे खाल्यानंतर त्याच्या बिया फेकून न देता त्या सांभाळून ठेवा. 

रक्तशुद्धी होते: जांभळामध्ये लोह भरपूर प्रमाणात त्यामुळे त्याच्या सेवनामुळे आपले रक्त शुद्ध होते तसेच शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढण्यास मदत होते. तसेच रक्त दाबाचा त्रास देखील कमी होतो. 

शरीरातील हानिकारक पदार्थ बाहेर टाकण्यास मदत करते: जांभळाच्या सेवनामुळे शरीराचे डिटॉक्सिफिकेशन होऊन शरीरातील हानिकारक पदार्थ बाहेर टाकल्या जातात यामुळे आपली रोगप्रतिकारक(I mmunity ) शक्ती वाढते. 

पोटाचे विकार दूर होतात: जांभळाच्या सेवनाने आपल्या पचनसंस्थेचे कार्य सुधारते. जांभळाच्या बियांचा अर्क पोटातील अल्सर किंवा पोटात झालेले इन्फेक्शन दूर करण्यासाठी दिले जाते. 

गर्भावस्थेत बाळाची चांगली वाढ होण्यासाठी:  जांभळामध्ये कॅल्शियम, लोह तसेच जीवनसत्व ई आणि क भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे गर्भावस्थेत जांभळे खाल्याने बाळाची वाढ चांगली होते. 

मूळव्याधीचा त्रास कमी होतो:  मूळव्याधीच्या च्या रुग्णांनी जेवणानंतर एक वाटीभर जांभळे खावीत तसेच जांभळाचे शरबत सुद्धा प्यावे त्यामुळे मुळव्याधीतून होणार रक्तस्त्राव थांबतो तसेच पोट लवकर साफ होते. 

दात आणि हिरड्यांसाठी उपयोगी: जांभळाच्या बियांची पावडर दात आणि हिरड्यांसाठी फार उपयोगी आहे. जांभळाच्या बियांची बारीक पावडर करून त्याने दात आणि हिरड्या स्वछ केल्यास दात किडणे, हिरड्यातून रक्त येणे, दुर्गंधी येणे असे अनेक त्रास नाहीसे होतात. 

टीप: जांभळाच्या बियांचा किंवा पावडर चा औषधी म्हणून उपयोग करण्याआधी तज्ञ डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्यावा. 

Comments

Popular posts from this blog

भुजंगासन (Bhujangasana) माहिती | फायदे, कृती, काळजी व उपयोग | ByYogesh

भुजंगासन (Bhujangasana) माहिती | फायदे, कृती, काळजी व उपयोग  भुजंगासन म्हणजे काय? 'भुजंग' म्हणजे नाग किंवा साप. या आसनामध्ये शरीराचा आकार फणा काढलेल्या नागासारखा दिसतो म्हणून या आसनाला भुजंगासन (Bhujangasana) असे म्हणतात. इंग्रजीमध्ये याला Cobra Pose असे म्हणतात. हे पोटावर झोपून केले जाणारे एक प्रभावी योगासन असून पाठीचा कणा, खांदे, छाती आणि पोटाच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जण संगणकासमोर तासन्तास बसून काम करतात. त्यामुळे पाठदुखी, मानेचा त्रास आणि शरीराची लवचिकता कमी होणे या समस्या वाढताना दिसतात. अशा वेळी योग्य पद्धतीने आणि नियमितपणे केलेले भुजंगासन शरीराला मोठा फायदा देऊ शकते. माझा भुजंगासनाचा अनुभव (My Experience) मी व्यवसायाने IT क्षेत्रात Automation Test Engineer म्हणून काम करतो. माझ्या कामाचा बहुतांश वेळ संगणकासमोर बसून जातो. सुरुवातीला सलग ८–१० तास बसून काम केल्यामुळे मला वारंवार पाठदुखी, मानेचा ताण आणि खांद्यामध्ये जडपणा जाणवू लागला. काही दिवस तर सकाळी उठल्यावरही पाठीमध्ये ताठरपणा जाणवत असे. यानंतर मी नियमित य...

धनुरासन (Dhanurasana) माहिती | कृती, फायदे, काळजी आणि योग्य पद्धत

धनुरासन म्हणजे काय? धनुरासन (Dhanurasana) हे पोटावर झोपून केले जाणारे योगासन आहे. या आसनामध्ये दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून हातांनी घोटे पकडले जातात आणि छाती व पाय वर उचलले जातात. त्यामुळे शरीराचा आकार धनुष्याप्रमाणे दिसतो. म्हणून या आसनाला धनुरासन असे नाव देण्यात आले आहे. धनुरासन हे पाठीचा कणा, छाती, खांदे, पोट आणि पायांच्या स्नायूंवर काम करणारे एक मागे वाकण्याचे आसन आहे. नियमित आणि योग्य पद्धतीने सराव केल्यास शरीराची लवचिकता आणि स्नायूंची ताकद सुधारण्यास मदत होऊ शकते. धनुरासन आणि भुजंगासनाचा संबंध धनुरासन करताना शरीराचा पुढील भाग वर उचलला जात असल्यामुळे त्यामध्ये भुजंगासनासारखा मागे वाकण्याचा भाग जाणवतो. तसेच पाय वर उचलल्यामुळे शरीराच्या मागील भागातील स्नायूंवरही ताण येतो. मात्र धनुरासन हे भुजंगासन आणि शलभासन यांचे केवळ साधे "एकत्रीकरण" आहे असे म्हणण्यापेक्षा, या दोन्ही आसनांमध्ये आढळणाऱ्या काही हालचालींसारखी शरीराची स्थिती धनुरासनात दिसते , असे सांगणे अधिक योग्य आहे. माझा योगाभ्यासाचा अनुभव मी IT क्षेत्रात काम करत असल्यामुळे माझ्या कामाचा बराच वेळ संगणकासमोर ब...

पद्मासन (Padmasana) माहिती मराठीत | कृती, फायदे आणि खबरदारी

पद्मासन (Padmasana) माहिती मराठीत | कृती, फायदे आणि खबरदारी पद्मासन (Padmasana) हे योगातील सर्वात प्रसिद्ध आणि पारंपरिक ध्यानासनांपैकी एक आहे. "पद्म" म्हणजे कमळ. या आसनामध्ये बसल्यावर शरीराचा आकार कमळासारखा दिसतो, म्हणून याला पद्मासन किंवा इंग्रजीमध्ये Lotus Pose असे म्हणतात. ध्यान, प्राणायाम आणि मानसिक शांततेसाठी हे आसन अत्यंत उपयुक्त मानले जाते. नियमित सराव केल्यास शरीराची लवचिकता वाढण्यास, मन शांत राहण्यास आणि एकाग्रता सुधारण्यास मदत होऊ शकते. महत्त्वाची सूचना: पद्मासन करताना शरीरावर जबरदस्ती करू नका. गुडघा किंवा घोट्याचा त्रास असल्यास योगतज्ज्ञांचा सल्ला घ्या. पद्मासन कसे करावे? (Padmasana Steps) स्वच्छ आणि सपाट जागेवर चटई अंथरून बसा. दोन्ही पाय समोर सरळ पसरवा. उजवा पाय अलगद उचलून डाव्या मांडीवर ठेवा. त्यानंतर डावा पाय उचलून उजव्या मांडीवर ठेवा. दोन्ही गुडघे जमिनीच्या दिशेने ठेवण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा आणि अंगठा व तर्जनी एकमेकांना स्पर्श करून ज्ञानमुद्रा धरा. पाठीचा कणा, मान आणि डोके सरळ ठेवा. डोळे बंद करून सामान्य श्वास घेत १ ते ५ मिनिटे ध्यान क...