गर्भासन या आसनावस्थेत आपल्या शरीराचा आकार, मातेच्या गर्भात असलेल्या बाळा सारखा दिसतो, म्हणून या आसनास गर्भासन(Garbhasan) असे म्हणतात. पोटाच्या सर्व आजारांवर खात्रीशील उपाय म्हणजेच गर्भासन . या आसनाच्या नियमित सरावामुळे कफ, अपचन, आतड्यांवरची सूज, जीर्णज्वर व बद्धकोष्ठता यांसारखे विकार नाहीसे होतात. या आसनाची कृती आणि संपूर्ण फायदे (Garbhasana steps and benefits) या बद्दल आपण खाली मराठी मध्ये जाणून घेणार आहोत. कृती : (Garbhasana steps) आधी जमिनीवर पद्मासन अवस्थेत बसावे. आता दोन्ही हात कोपऱ्यापर्यंत पायाच्या पोटऱ्यात घालावेत . नंतर उजव्या हाताने उजव्या कानाची पाळी आणि डाव्या हाताने डाव्या कानाची पाळी पकडा. हे आसन करताना शरीराचा तोल सांभाळावा नाहीतर पाठीवर पडण्याची शक्यता असते. जर हे आसन करणे फारच कठीण जात असेल तर पद्मासन न घालताही हे आसन करता येते. सुरुवातीला ८ ते १० सेकंद आसनव्यवस्था राखावी नंतर हळूहळू सरावा नंतर वेळ वाढवत नेऊन आपण...
भुजंगासन 'भुजंग' म्हणजे साप. या आसनामध्ये शरीराचा आकार नागाच्या उभारलेल्या फण्यासारखा दिसतो म्हणून या आसनास 'भुजंगासन' असे म्हणतात. येथे आपण भुजंगासन त्याची कृती व आपल्या शरीराला त्याचे होणारे फायदे या बद्दल संपूर्ण माहिती आपल्या मायबोली मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. (Bhujangasana information in Marathi) pic credit: https://pixahive.com/photo/purn-bhujangasana/ कृती: भुजंगासन हे पोट जमिनीला टेकवून करण्याच्या आसनपद्धती पैकी एक आसन आहे, त्यामुळे प्रथम जमीनीवर पालथे झोपा. हनुवटी छातीला टेकवा आणि कपाळ जमिनीला टेकवा. सर्व शरीर हलके करा. हाताचे पंजे छातीजवळ आना नंतर हातांच्या पंज्यावर शरीराचा भार देऊन बेंबीपासूनचा भाग हळू हळू वर उचला. कमरेखालचा भाग बिलकुल हलू देऊ नका. आकृतीत दाखवल्या प्रमाणे कृती करा. पायाची बोटे ताणून जमिनीवर टेकवा . असे केल्याने पाठ आणि खांद्याच्या मधील भागातील स्नायू व्यवस्तीत ताणले जातात. पोटातील सर्व स्नायूंवर सुद्धा व्यवस्तीत ताण पडतो. या आसनस्थितीत श्वास रोखून धरा. आठ ते दहा सेकंद हे असं क...