गोमुखासन (Cow face pose) गोमुख म्हणजे गायीचे तोंड. या आसनामध्ये शरीराचा आकार गायीच्या मुखाप्रमाणे दिसतो म्हणून याला 'गोमुखासन' असे म्हणतात. आता गोमुखासनाच्या कृती आणि फायदे ( Gomukhasana Steps and Benefits ) बद्दल थोडे जाणून घेऊयात. pic credit- https://commons.wikimedia.org/wiki/File:YOGASANA.jpg कृती:(Gomukhasana Steps) डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवून डाव्या टाचेला नितंबाच्या डाव्या बाजूखाली ठेवा, नंतर उजवा पाय अश्या प्रकारे वाकवा की, उजवा गुडघा डाव्या गुडघ्यावर येईल आणि उजव्या पायाचा तळवा डाव्या मांडी खाली येईल. सुरुवातीला उजव्या पायाची टाच डाव्या मांडीला लागणार नाही परंतु नियमित सराव केल्यानंतर हे सहज शक्य होईल. आता आकृतीत दाखवल्या प्रमाणे डावा हात कोपरामध्ये वाकवून मानेखाली खांद्यांच्या मध्ये टेकवा. आता उजवा हात कोपरामध्ये वाकवून मागील बाजूने वर न्या व वर आकृतीत दाखवल्याप्रमाने दोन्ही हातांची बोटे एकमेकांत ग...
भुजंगासन (Bhujangasana) माहिती | फायदे, कृती, काळजी व उपयोग भुजंगासन म्हणजे काय? 'भुजंग' म्हणजे नाग किंवा साप. या आसनामध्ये शरीराचा आकार फणा काढलेल्या नागासारखा दिसतो म्हणून या आसनाला भुजंगासन (Bhujangasana) असे म्हणतात. इंग्रजीमध्ये याला Cobra Pose असे म्हणतात. हे पोटावर झोपून केले जाणारे एक प्रभावी योगासन असून पाठीचा कणा, खांदे, छाती आणि पोटाच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जण संगणकासमोर तासन्तास बसून काम करतात. त्यामुळे पाठदुखी, मानेचा त्रास आणि शरीराची लवचिकता कमी होणे या समस्या वाढताना दिसतात. अशा वेळी योग्य पद्धतीने आणि नियमितपणे केलेले भुजंगासन शरीराला मोठा फायदा देऊ शकते. माझा भुजंगासनाचा अनुभव (My Experience) मी व्यवसायाने IT क्षेत्रात Automation Test Engineer म्हणून काम करतो. माझ्या कामाचा बहुतांश वेळ संगणकासमोर बसून जातो. सुरुवातीला सलग ८–१० तास बसून काम केल्यामुळे मला वारंवार पाठदुखी, मानेचा ताण आणि खांद्यामध्ये जडपणा जाणवू लागला. काही दिवस तर सकाळी उठल्यावरही पाठीमध्ये ताठरपणा जाणवत असे. यानंतर मी नियमित य...