गोमुखासन (Cow face pose)
गोमुख म्हणजे गायीचे तोंड. या आसनामध्ये शरीराचा आकार गायीच्या मुखाप्रमाणे दिसतो म्हणून याला 'गोमुखासन' असे म्हणतात. आता गोमुखासनाच्या कृती आणि फायदे (Gomukhasana Steps and Benefits) बद्दल थोडे जाणून घेऊयात.
कृती:(Gomukhasana Steps)
- डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवून डाव्या टाचेला नितंबाच्या डाव्या बाजूखाली ठेवा,
- नंतर उजवा पाय अश्या प्रकारे वाकवा की, उजवा गुडघा डाव्या गुडघ्यावर येईल आणि उजव्या पायाचा तळवा डाव्या मांडी खाली येईल.
- सुरुवातीला उजव्या पायाची टाच डाव्या मांडीला लागणार नाही परंतु नियमित सराव केल्यानंतर हे सहज शक्य होईल.
- आता आकृतीत दाखवल्या प्रमाणे डावा हात कोपरामध्ये वाकवून मानेखाली खांद्यांच्या मध्ये टेकवा.
- आता उजवा हात कोपरामध्ये वाकवून मागील बाजूने वर न्या व वर आकृतीत दाखवल्याप्रमाने दोन्ही हातांची बोटे एकमेकांत गुंफण्याचा प्रयत्न करा.
- शरीराचा वरचा भाग व मस्तक सरळ एका रेषेत ठेवा.
- हळूहळू श्वास घेत राहा.
- स्थूल लोकांनां सुरुवातीला हे आसन काही दिवस अवघड जाईल परंतु काही दिवसांच्या सरावानंतर हे आसन सहज करता येईल.
टीप: ज्यांना गुडघ्याचा त्रास आहे, त्यांनी मांडी घालून हे आसन केल तरी चालेल.
गोमुखासनाचे फायदे:(Gomukhasana Benefits)
- हे आसन पद्मासन आणि सिद्धासनाच्या कक्षेतील असल्याने पद्मासन व सिद्धासनामुळे जे फायदे होतात ते सर्व फायदे या आसनामुळेही होतात.
- या आसनामुळे संधिवात बरा होतो व मुळव्याधीची तक्रारही दूर होते.
- या आसनामुळे बद्धकोष्टता, मंदाग्नी, अरुची, पाठीतील दुखणे व हातातील लचक बरी होते.
- या आसनामुळे छाती सुडौल होते. फुफ्फुसाची आणि हृदयाची शक्ती वाढते.
- हे आसन ब्रम्हचर्यव्रतासाठी आणि आरोग्यासाठी फायदेशीर आहे.
- या आसनामध्ये तीनही बंध (जालंदरबंध, उड्डीयानबंध , मूलबंध ) दृढतापूर्वक होत असल्याने सुषम्ना नाडीमध्ये प्राणवायूचा प्रवाह सुरु होतो त्यामुळे चित्तवृत्ती काबूत येण्यास मदत होते.

Comments
Post a Comment
आपल्या सुचनांचे स्वागत आहे.
भेट दिल्या बद्दल धन्यवाद. 🙏