तोलांगुलासन या आसनस्तिथीत शरीराचा आकार तराजू सारखा दिसतो म्हणून या आसनाला तोलांगुलासन(Tolangulasana) असे म्हणतात. हे आसन करण्यासाठी खूपच सोपे आहे. हे आसन करत असताना आपल्या शरीराचा संपूर्ण भार आपल्या दोन्ही हातांवर व नितंबावर पडतो त्यामुळे आपले खांदे, हात व पाठीचा मणका मजबूत बनतो. या आसनाच्या सरावामुळे कमरेवरची व पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होते. या आसनाची कृती व फायदे या बद्दल संपूर्ण माहिती मराठी मध्ये बघुयात. कृती: प्रथम आपल्या आसनावर पद्मासन घालून बसा. आता दोन्ही हाताचे पंजे निताम्बाखाली ठेऊन झोपा. जर पंजे नितंबाखाली ठेऊन झोपणे अवघड जात असेल तर हातांच्या कोपराच्या साह्याने पद्मासनाची संपूर्ण बैठक उचलून भार कमरेवर आणा. आता मान व डोके जास्तीत जास्त पुढे उचलून धरा. मान व डोके पुढे उचलून धरल्यानंतर जितक्या वेळ श्वास रोखून धरता येईल तितका वेळ रोखून धरा, नंतर हळू हळू श्वास बाहेर सोडा, डोळे उघडे ठेवा. आता शरीर ताणलेल्या अवस्थेत ठेवा आणि श्वासोश्वास चालू राहू द्या. हि कृती करताना आपल्या शरीरांच्या स्नायूंवर जास्त ताण येणार नाही याची काळजी घ...
भुजंगासन (Bhujangasana) माहिती | फायदे, कृती, काळजी व उपयोग भुजंगासन म्हणजे काय? 'भुजंग' म्हणजे नाग किंवा साप. या आसनामध्ये शरीराचा आकार फणा काढलेल्या नागासारखा दिसतो म्हणून या आसनाला भुजंगासन (Bhujangasana) असे म्हणतात. इंग्रजीमध्ये याला Cobra Pose असे म्हणतात. हे पोटावर झोपून केले जाणारे एक प्रभावी योगासन असून पाठीचा कणा, खांदे, छाती आणि पोटाच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जण संगणकासमोर तासन्तास बसून काम करतात. त्यामुळे पाठदुखी, मानेचा त्रास आणि शरीराची लवचिकता कमी होणे या समस्या वाढताना दिसतात. अशा वेळी योग्य पद्धतीने आणि नियमितपणे केलेले भुजंगासन शरीराला मोठा फायदा देऊ शकते. माझा भुजंगासनाचा अनुभव (My Experience) मी व्यवसायाने IT क्षेत्रात Automation Test Engineer म्हणून काम करतो. माझ्या कामाचा बहुतांश वेळ संगणकासमोर बसून जातो. सुरुवातीला सलग ८–१० तास बसून काम केल्यामुळे मला वारंवार पाठदुखी, मानेचा ताण आणि खांद्यामध्ये जडपणा जाणवू लागला. काही दिवस तर सकाळी उठल्यावरही पाठीमध्ये ताठरपणा जाणवत असे. यानंतर मी नियमित य...