तोलांगुलासन
या आसनस्तिथीत शरीराचा आकार तराजू सारखा दिसतो म्हणून या आसनाला तोलांगुलासन(Tolangulasana) असे म्हणतात. हे आसन करण्यासाठी खूपच सोपे आहे. हे आसन करत असताना आपल्या शरीराचा संपूर्ण भार आपल्या दोन्ही हातांवर व नितंबावर पडतो त्यामुळे आपले खांदे, हात व पाठीचा मणका मजबूत बनतो. या आसनाच्या सरावामुळे कमरेवरची व पोटावरची चरबी कमी होण्यास मदत होते. या आसनाची कृती व फायदे या बद्दल संपूर्ण माहिती मराठी मध्ये बघुयात.
कृती:
- प्रथम आपल्या आसनावर पद्मासन घालून बसा.
- आता दोन्ही हाताचे पंजे निताम्बाखाली ठेऊन झोपा.
- जर पंजे नितंबाखाली ठेऊन झोपणे अवघड जात असेल तर हातांच्या कोपराच्या साह्याने पद्मासनाची संपूर्ण बैठक उचलून भार कमरेवर आणा.
- आता मान व डोके जास्तीत जास्त पुढे उचलून धरा.
- मान व डोके पुढे उचलून धरल्यानंतर जितक्या वेळ श्वास रोखून धरता येईल तितका वेळ रोखून धरा, नंतर हळू हळू श्वास बाहेर सोडा, डोळे उघडे ठेवा.
- आता शरीर ताणलेल्या अवस्थेत ठेवा आणि श्वासोश्वास चालू राहू द्या.
- हि कृती करताना आपल्या शरीरांच्या स्नायूंवर जास्त ताण येणार नाही याची काळजी घ्या.
- आपली नजर नाभीस्थानाकडे केंद्रित करा.
- सुरुवातीला हे आसन फक्त ३० सेकंद करा.
- सरावानंतर आपण वेळ आपल्याला सहन होईल तशी ३ मिनिटांपर्यंत वाढवू शकता.
- भरपूर सरावानंतर हे आसन पाच ते दहा वेळा करू शकता.
फायदे:
- या आसनाच्या सरावामुळे वायुविकार दुर होतात.
- या आसनाची कृती करताना पोटावर दाब पडतो त्यामुळे कोठा साफ होतो, व मलावरोध नाहीसा होतो.
- या आसनाच्या नियमित सरावामुळे छाती भरदार व सुडौल होते.
- या आसनामुळे पाठीच्या कण्यातील लवचिक पणा वाढतो आणि ज्ञानतंतू कार्यक्षम बनतात.
- या आसनाच्या सरावाने हातांचे आणि खाद्यांचे स्नायू मजबूत बनतात.
- या आसनाच्या नियमित सरावामुळे बद्धकोष्टता, मुरडा, दमा, क्षय, आणि मधुमेह यांसारखे रोग नाहीशे होतात.
- या आसनाच्या नियमित सरावामुळे डोळे तेजस्वी बनतात.
- या आसनाच्या सरावामुळे शरीरावरील अतिरिक्त चरबी कमी होते त्यामुळे आपले वजन कमी करण्यास याची मदत होते.
टीप: हे आसन करताना घाई करू नये. हे आसन करताना आपल्या मानेच्या स्नायूंवर ताण पडणार नाही याची काळजी घ्या. या आसनाचा सराव करून झाल्यावर विश्रांतीसाठी शवासन करावे.
Comments
Post a Comment
आपल्या सुचनांचे स्वागत आहे.
भेट दिल्या बद्दल धन्यवाद. 🙏