सिद्धासन (Sidhasana - A Meditation Posture)
या आसनाचे मुख्य कार्य सुषुप्त कुंडलिनी शक्ती जागृत करणे हे आहे. म्हणूनच या आसनाला 'सिद्धासन' असे म्हणतात. सिद्धासनाच्या सरावामुळे आपले चित्त स्थिर होऊन स्मरणशक्ती वाढण्यासाठी भरपूर मदत होते, तसेच या आसनाचा नियमित सराव यौनरोग दूर करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. पद्मासनाप्रमाणेच सिद्धासन हि सुद्धा एक ध्यानमुद्रा आहे. (Sidhasana A Meditation Posture) खाली आपण सिद्धासनाचे फायदेआणि कृतीबद्दल थोडक्यात जाणून घेउयात जाणून घेऊयात. ( Sidhasana information in marathi)
![]() |
| Photo by Oluremi Adebayo from Pexels |
कृती: (Sidhasana Steps)
- सुरुवातीला जमिनीवर बसा.
- आता गुदद्वार आणि शिश्न यांच्या मध्यभागी उजव्या पायाची टाच रेटून लावा.
- आता जननेंद्रियाच्या मूळ भागाच्या हाडावर डाव्या पायाची टाच लावा.
- दोन्ही हात ज्ञान मुद्रेच्या स्थितीत आणून गुडघ्यावर ठेवा.
- दोन्ही पायाचे गुडघे जमिनीला टेकायला हवे.
- पाठ,मान व मस्तक सरळ एका रेषेत ताठ ठेवावे.
- आता डोळे बंद करून ध्यान (Meditation ) लावा.
- आपले संपूर्ण लक्ष आपल्या श्वासोश्वासाकडे केंद्रित करा.
हे आसन केल्याने सुषुप्तावस्थेत असणारी कुंडलिनी शक्ती जागृत होते.त्यामुळे शक्तिचलन मुद्राद्वारे शरीरातील सर्व नाड्यांचे शुद्धीकरण होते.
सिद्धासनाचे फायदे :(Benefits of Sidhasana)
- अजीर्ण, मुरडा, जीर्णज्वर, हृदयरोग, क्षय, दमा, मधुमेह असे अनेक आजार दूर होतात.
- कमरेच्या दुखण्यापासून मुक्तता मिळते.
- मूळव्याध व यौनरोग करिता उपयुक्त आहे.
- या आसनाने आपली एकाग्रता वाढते व मनावर ताबा मिळवता येतो.
- या आसनाच्या नियमित सरावामुळे पचनक्रिया सुधारते.
- विशेष करून हे आसन विध्यार्थ्यांसाठी फार महत्वाचे आहे कारण या आसनाच्या सरावामुळे आपली स्मरणशक्ती दांडगी बनते.

Comments
Post a Comment
आपल्या सुचनांचे स्वागत आहे.
भेट दिल्या बद्दल धन्यवाद. 🙏