Skip to main content

पवनमुक्तासन | Pavanmuktasana | - पोटाचे सर्व विकार दूर करते.

     पोट खुश तर आपण खुश. आपले जर पोट निरोगी असेल तर त्याचा परिणाम आपल्याला लगेच जाणवतो, आपण कुठलेही काम उत्साहाने करतो. या आसनाच्या नियमित सरावाने पोटातील सर्व अवयवांना भरपूर व्यायाम मिळतो व त्यांची कार्यक्षमता वाढते. तसेच या आसनाच्या सरावामुळे पोटामध्ये साचलेला वायू बाहेर पडण्यास मदत होते त्यामुळे भविष्यात उध्दभवणारे पोट फुगणे, बैचेन होणे, डोके दुखणे या सारख्या आजारांपासून आपल्याला मुक्तता मिळते. म्हणूनच पोटाचे सर्व विकार दूर करण्यासाठी एक सर्वोत्तम आसन म्हणजे पवनमुक्तासन(Pavanmuktasana). पवन म्हणजे वायू या आसनामुळे आपल्या पोटातील सर्व वायू सहजरित्या बाहेर पडतो म्हणून या आसनाला पवनमुक्तासन असे म्हणतात. महिलांसाठी सुद्धा हे आसन फार उपयुक्त आहे कारण या आसनाच्या सरावामुळे गर्भाशयाशी संबंधित असलेले आजार दूर होतात. चला तर पवनमुक्तासनाची माहिती मराठी मध्ये जाणून घेऊयात.  

pavanmuktasana


कृती:

  • प्रथम सरळ पाठीवर झोपा. दोन्ही पाय सरळ लांब ठेवा.
  • पायाचे पंजे एकमेकाना जुळवून ठेवा.
  • आता एक खोल श्वास घ्या व तो रोखून धारा आता  उजवा गुडघा आकृतीत दाखवल्या प्रमाने पोटाकडे खेचा आणि त्याला दोन्ही हातांनी पोटावर दाबुन ठेवा.
  • आता डोके जमिनीपासून  हळूहळू  वर उचला आणि गुडघ्याला तोंड लावा.
  • डावा पाय पुढील बाजूस ताणलेला ठेवा. आता रोखलेला श्वास सोडून द्या, आता जो पर्यंत तुम्ही श्वास बाहेर रोकुन ठेवता तोपर्यंत पोट मांडीने दाबून धरा.
  • या आसन स्थितीला 'दक्षिण पवनमुक्तासन' असे म्हणतात.
  • आता हिच कृती डाव्या पायाने करा, या आसन स्थितीला 'वाम पवनमुक्तासन' असे म्हणतात. 
  • त्यानंतर हिच क्रिया आपण जेंव्हा दोन्ही पायांनी करतो, तेव्हा या आसनास 'पूर्ण पवनमुक्तासन' असे म्हणतात.

फायदे (Benefits of Pavanmuktasana):

  1. या आसनामुळे अधोवायु (Gases)सहजगत्या मुक्त होतो. 
  2. पचनशक्ती सुधारते. 
  3. पोटाची चरबी कमी करण्यासाठी या आसनाची मदत होते. 
  4. हृदयविकार व फुफ्फुसाच्या रोगांना प्रतिबंध करणारे हे आसन आहे. 
  5. पोटातील सर्वच अवयवांची कार्यक्षमता वाढते. 
  6. वायुविकार, मलावरोध, अपचन, गर्भाशयातील रोग, ओटीपोटात होणार रक्तसंचय, कुमिरोग, वातविकार,मूळव्याध,रक्तदोष, पोट फुगणे या सारखे अनेक रोग या आसनाने दूर होतात. 
  7. मूत्रविकारणासाठी सुद्धा हे आसन लाभदायी आहे. 
  8. गर्भाशयशी संबंधित असलेले आजार या आसनाच्या सरावाने दूर होतात. 
  9. या आसनाच्या सरावामुळे प्रजनन क्षमता सुधारते. 
टीप: ज्या लोकांना उच्च रक्तदाब, हर्निया, स्लिपडिस्क, पित्त, हृदयविकार, पाठीचा व मानेचा  त्रास आहे  त्यांनी तसेच गर्भधारणेनंतर स्त्रियांनी हे आसन करू नए.
 

Comments

Post a Comment

आपल्या सुचनांचे स्वागत आहे.
भेट दिल्या बद्दल धन्यवाद. 🙏

Popular posts from this blog

भुजंगासन मराठी माहिती | Bhujangasana

भुजंगासन 'भुजंग' म्हणजे साप. या आसनामध्ये शरीराचा आकार नागाच्या उभारलेल्या फण्यासारखा दिसतो म्हणून या आसनास 'भुजंगासन' असे म्हणतात. येथे आपण भुजंगासन त्याची कृती व आपल्या शरीराला त्याचे होणारे फायदे या बद्दल संपूर्ण माहिती आपल्या मायबोली मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. (Bhujangasana information in Marathi)    pic credit:  https://pixahive.com/photo/purn-bhujangasana/ कृती: भुजंगासन हे पोट जमिनीला टेकवून करण्याच्या आसनपद्धती पैकी एक आसन आहे, त्यामुळे  प्रथम जमीनीवर पालथे झोपा.  हनुवटी छातीला टेकवा आणि कपाळ जमिनीला टेकवा.  सर्व शरीर हलके करा. हाताचे पंजे छातीजवळ आना नंतर हातांच्या पंज्यावर शरीराचा भार देऊन बेंबीपासूनचा भाग हळू हळू वर उचला.  कमरेखालचा भाग बिलकुल हलू देऊ नका.  आकृतीत दाखवल्या प्रमाणे कृती करा. पायाची बोटे ताणून जमिनीवर टेकवा .  असे केल्याने पाठ आणि खांद्याच्या मधील भागातील स्नायू व्यवस्तीत ताणले जातात. पोटातील सर्व स्नायूंवर सुद्धा व्यवस्तीत ताण  पडतो. या आसनस्थितीत श्वास रोखून धरा. आठ ते दहा सेकंद हे असं क...

धनुरासन मराठी माहिती | Dhanurasana information in marathi

हे आसन पोटावर झोपून करण्याच्या आसन प्रकारातील एक आसन आहे. या आसनाच्या सरावाने शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते. हे आसन करताना मस्तकापासून ते गुडघ्या पर्यंत च्या भागाला बाण नसलेल्या धानुष्यासारखा आकार मिळतो म्हणून या आसनाला धनुरासन (Dhanurasana) असे नाव पडले आहे. हे आसन करताना आपल्या शरीराचा संपूर्ण भार हा नाभीवर पडतो त्यामुळे पोटासंबंधीच्या अनेक तक्रारी या आसनाच्या नित्य सरावाने दूर होतात.    भुजंगासन व शलभासन या दोन आसनांचे एकत्रीकरण करून हे आसन बनलेले आहे. येथे आपण धनुरासनाची कृती व फायदे मराठी मध्ये जाणून घेऊयात. (Dhanurasana information in marathi) image credit:  https://pixahive.com/photo/dhanurasana-bow-pose-3/ कृती: पोटावर पालथे झोपा.  दोन्ही हात आपल्या शरीराला लागून समांतर ठेवा.  कपाळ जमिनीवर टेकवून ठेवा.  आपल्या शरीराचे सर्व स्नायू सैल सोडा.  आता दोन्ही पाय गुडघ्यापासून मागे दुमडा.  चित्रात दाखविल्याप्रने दोन्ही हातांनी घोट्याजवळ दोन्ही  पाय धरा.  आता छाती आणि डोके वर उचला हे करताना हात आणि पाय ताठ ठेवा.  आता पाय वर...

पद्मासनाची कृती आणि फायदे | Padmasana information in Marathi

पद्मासन( Padmasana  ) कोरोना पासून वाचायचं असेल तर आपल्याला आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं खूप आवश्यक आहे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पोषक अन्ना बरोबर योगाभ्यास ( Yoga ) करणेही खूप गरजेचे आहे. त्यामूळे मी अशी काही निवडक योगसाने घेऊन येत आहे की जे तुमच्या हृदयाची अणि फुफुसाची कार्यक्षमता वाढवून तुमची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यास मदत करतील. खाली पद्मासनाच्या कृती आणि फायद्या बद्दल मराठी मध्ये माहिती दिली आहे. ( Padmasana steps and benefits information in Marathi) Photo by  Elina Fairytale  from  Pexels आज आपन 'पद्मासनाबद्दल' थोडं जाणून घेऊया.  पद्म म्हणजे कमळ,  जेव्हा आपण हे आसन करतो, तेव्हा आपल्या शरीराला कमळा सारखा आकार प्राप्त होत असल्याने या आसनाला 'पद्मासन' असे म्हणतात, तर इंग्रजी मध्ये या आसनाला ' Lotus Pose' असे म्हणतात.ध्यान करण्यासाठी प्रामुख्याने पद्मासनाचाच उपयोग केला जातो.  चला तर आता आपण बघुयात 'पद्मासन कसे करावे'? कृती :(Padmasana Steps)  जमिनीवर पाय लांब पसरवून  बसावे.  नंतर उजवा पाय डाव्या...