पोट खुश तर आपण खुश. आपले जर पोट निरोगी असेल तर त्याचा परिणाम आपल्याला लगेच जाणवतो, आपण कुठलेही काम उत्साहाने करतो. या आसनाच्या नियमित सरावाने पोटातील सर्व अवयवांना भरपूर व्यायाम मिळतो व त्यांची कार्यक्षमता वाढते. तसेच या आसनाच्या सरावामुळे पोटामध्ये साचलेला वायू बाहेर पडण्यास मदत होते त्यामुळे भविष्यात उध्दभवणारे पोट फुगणे, बैचेन होणे, डोके दुखणे या सारख्या आजारांपासून आपल्याला मुक्तता मिळते. म्हणूनच पोटाचे सर्व विकार दूर करण्यासाठी एक सर्वोत्तम आसन म्हणजे पवनमुक्तासन(Pavanmuktasana). पवन म्हणजे वायू या आसनामुळे आपल्या पोटातील सर्व वायू सहजरित्या बाहेर पडतो म्हणून या आसनाला पवनमुक्तासन असे म्हणतात. महिलांसाठी सुद्धा हे आसन फार उपयुक्त आहे कारण या आसनाच्या सरावामुळे गर्भाशयाशी संबंधित असलेले आजार दूर होतात. चला तर पवनमुक्तासनाची माहिती मराठी मध्ये जाणून घेऊयात.
कृती:
- प्रथम सरळ पाठीवर झोपा. दोन्ही पाय सरळ लांब ठेवा.
- पायाचे पंजे एकमेकाना जुळवून ठेवा.
- आता एक खोल श्वास घ्या व तो रोखून धारा आता उजवा गुडघा आकृतीत दाखवल्या प्रमाने पोटाकडे खेचा आणि त्याला दोन्ही हातांनी पोटावर दाबुन ठेवा.
- आता डोके जमिनीपासून हळूहळू वर उचला आणि गुडघ्याला तोंड लावा.
- डावा पाय पुढील बाजूस ताणलेला ठेवा. आता रोखलेला श्वास सोडून द्या, आता जो पर्यंत तुम्ही श्वास बाहेर रोकुन ठेवता तोपर्यंत पोट मांडीने दाबून धरा.
- या आसन स्थितीला 'दक्षिण पवनमुक्तासन' असे म्हणतात.
- आता हिच कृती डाव्या पायाने करा, या आसन स्थितीला 'वाम पवनमुक्तासन' असे म्हणतात.
- त्यानंतर हिच क्रिया आपण जेंव्हा दोन्ही पायांनी करतो, तेव्हा या आसनास 'पूर्ण पवनमुक्तासन' असे म्हणतात.
फायदे (Benefits of Pavanmuktasana):
- या आसनामुळे अधोवायु (Gases)सहजगत्या मुक्त होतो.
- पचनशक्ती सुधारते.
- पोटाची चरबी कमी करण्यासाठी या आसनाची मदत होते.
- हृदयविकार व फुफ्फुसाच्या रोगांना प्रतिबंध करणारे हे आसन आहे.
- पोटातील सर्वच अवयवांची कार्यक्षमता वाढते.
- वायुविकार, मलावरोध, अपचन, गर्भाशयातील रोग, ओटीपोटात होणार रक्तसंचय, कुमिरोग, वातविकार,मूळव्याध,रक्तदोष, पोट फुगणे या सारखे अनेक रोग या आसनाने दूर होतात.
- मूत्रविकारणासाठी सुद्धा हे आसन लाभदायी आहे.
- गर्भाशयशी संबंधित असलेले आजार या आसनाच्या सरावाने दूर होतात.
- या आसनाच्या सरावामुळे प्रजनन क्षमता सुधारते.
टीप: ज्या लोकांना उच्च रक्तदाब, हर्निया, स्लिपडिस्क, पित्त, हृदयविकार, पाठीचा व मानेचा त्रास आहे त्यांनी तसेच गर्भधारणेनंतर स्त्रियांनी हे आसन करू नए.

Khupch upyogi ahe he asan
ReplyDeleteHo
DeleteVery Useful 👍🏻☺️ Thanks
ReplyDelete