Skip to main content

२१ जून - जागतिक योगा दिवस (International Yoga Day)

 योगासनांच्या नियमित सरावामुळे आपले आयुष्य निरोगी व सुखकर बनते. आपल्या पूर्वजांनी आपले शरीर, मन आणि प्राणाच्या शुद्धीसाठी योगाच्या आठ अंगांचा मार्ग सुचविला आहे यालाच 'अष्टांग योग' असे म्हणतात. यम, नियम, आसन, प्राणायाम , प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी हि योगा ची आठ अंगे आहेत. आसन हे अष्टांग योगाचे फक्त एक अंग आहे. शरीराच्या अंतर आणि बाह्य भागांना निरोगी ठेवण्याची क्रिया म्हणजेच योगासने. २१ जून हा जागतिक योगा दिवस(International Yoga Day) म्हणून साजरा केला जातो त्याबद्दल संपूर्ण माहिती आपण येथे निबंध स्वरूपात जाणून घेऊयात. 

 Image by AYMYogaSchool from Pixabay

 

आता आपण योगा दिवसाची सुरुवात कधी आणि कशी झाली याबद्दल थोडी माहिती जाणून घेऊयात. आपले आयुष्य निरोगी आणि सुखकर करण्याचा हा मंत्र संपूर्ण जगाला मिळावा, योगा अभ्यासाचा संपूर्ण जगात प्रचार आणि प्रसार व्हावा या साठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सप्टेंबर २०१४ मध्ये झालेल्या संयुक्त राष्ट्राच्या महासभेत २१ जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्याचा प्रस्ताव मांडला होता. संयुक्त राष्ट्राच्या १९३ देशांपैकी १७५ देशांच्या सहप्रतिनिधींनी या प्रस्तावाला आपला पाठिंबा दिला होता. सुरक्षा आयोगाचे स्थायी समिती सदस्य असलेले देश अमेरिका, इंग्लंड, चीन, फ्रांस, रशिया हे हि या प्रस्तावाचे सहप्रतिनिधी आहेत. या प्रस्तावावर सविस्तर चर्चा करून डिसेंबर २०१४ मध्ये या दिनाला मान्यता देण्यात आली आणि २१ जून २०१५ रोजी पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस जगभर साजरा करण्यात आला.  

योगा दिवस हा २१ जून लाच का साजरा केला जातो या बद्दल आपण थोडे जाणून घेउयात. २१ जून हा वर्षभरातील सर्वात मोठा दिवस असतो. या दिवशी उत्तरायण संपून दक्षिणायन सुरु होते व या दिवशी सूर्योदय लवकर होतो आणि सायंकाळी जास्त वेळेपर्यंत प्रकाश असतो. त्यामुळे या दिवसाला अधिक महत्व प्राप्त होते. म्हणून हा दिवस योगा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. 

योगासनांच्या सरावाने होणारे फायदे व त्याचे काही नियम या बद्दल आपण थोडक्यात काही माहिती बघुयात. 

योगासनाचे फायदे:

  • योगासनांच्या नियमित सरावामुळे मनुष्याच्या शरीरावर तसेच मनावर सकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे मन आणि इंद्रिये यांना काबूत ठेवणाऱ्या आंतरिक शक्तीचा विकास होतो. 
  • योगासनांच्या सरावामुळे शरीरातील आंतरिक व बाह्य अवयवांना पुरेश्या प्रमाणात व्यायाम मिळतो त्याचाच परिणाम म्हणून मनुष्य दीर्घकाळ स्वस्थ व निरोगी जीवन जगू शकतो. 
  • योगासनांमुळे शरीरातील मल तसेच इतर घाण व्यवस्थितपणे उत्सर्जित केल्या जाते त्याचाच चांगला परिणाम आपल्या शरीरावर होतो व आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते. 
  • योगासने व प्राणायामाच्या सरावामुळे आपले रक्तशुद्धीचे प्रमाण वाढते. 
  • योगासनांमुळे मानसिक शांती प्राप्त होते. 
  • योगासनांच्या सरावामुळे शरीर लवचिक बनते त्यामुळे शरीरात उत्साह निर्माण होतो. 

योगासनाचे नियम:

  • योगासने करण्यासाठी सकाळची वेळ हि खूप चांगली असते. 
  • योगासने करण्यापूर्वी आपले पोट रिकामे असणे खूप महत्वाचे आहे. 
  • योगासने करण्यापूर्वी अंघोळ करता अली तर खूप छान कारण त्यामुळे आपले शरीर हलके व प्रसन्न बनते. 
  • योगासनानंतर जर अंघोळ करायची असेल तर अंघोळीसाठी थंड पाणी न वापरता गरम पाणी वापरावे. 
  • योगासन करताना स्वतःचे चित्त श्वासोच्छश्वासावर तसेच शरीराच्या ज्या भागावर दाब पडत असेल त्या भागावर केंद्रित करावे यामुळे शारीरिक व मानसिक भरपूर लाभ प्राप्त होतो. 
  • योगासने हि शरीराला हिसके देऊन किंवा जोर लावून करू नये. 
  • योगासन करण्याच्या सुरुवातीला आणि शेवटी शवासनाचा सराव नक्की करावा त्यामुळे शरीरातील थकवा दूर होतो. 
  • योगासने करून झाल्यावर थकवा वाटला नाही, शरीर हलके झाले आणि काम करण्याचा उत्साह निर्माण झाला कि नक्की समजावं कि योगासने चांगल्या प्रकारे करण्यात येत आहेत. 

Comments

Popular posts from this blog

भुजंगासन (Bhujangasana) माहिती | फायदे, कृती, काळजी व उपयोग | ByYogesh

भुजंगासन (Bhujangasana) माहिती | फायदे, कृती, काळजी व उपयोग  भुजंगासन म्हणजे काय? 'भुजंग' म्हणजे नाग किंवा साप. या आसनामध्ये शरीराचा आकार फणा काढलेल्या नागासारखा दिसतो म्हणून या आसनाला भुजंगासन (Bhujangasana) असे म्हणतात. इंग्रजीमध्ये याला Cobra Pose असे म्हणतात. हे पोटावर झोपून केले जाणारे एक प्रभावी योगासन असून पाठीचा कणा, खांदे, छाती आणि पोटाच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जण संगणकासमोर तासन्तास बसून काम करतात. त्यामुळे पाठदुखी, मानेचा त्रास आणि शरीराची लवचिकता कमी होणे या समस्या वाढताना दिसतात. अशा वेळी योग्य पद्धतीने आणि नियमितपणे केलेले भुजंगासन शरीराला मोठा फायदा देऊ शकते. माझा भुजंगासनाचा अनुभव (My Experience) मी व्यवसायाने IT क्षेत्रात Automation Test Engineer म्हणून काम करतो. माझ्या कामाचा बहुतांश वेळ संगणकासमोर बसून जातो. सुरुवातीला सलग ८–१० तास बसून काम केल्यामुळे मला वारंवार पाठदुखी, मानेचा ताण आणि खांद्यामध्ये जडपणा जाणवू लागला. काही दिवस तर सकाळी उठल्यावरही पाठीमध्ये ताठरपणा जाणवत असे. यानंतर मी नियमित य...

धनुरासन (Dhanurasana) माहिती | कृती, फायदे, काळजी आणि योग्य पद्धत

धनुरासन म्हणजे काय? धनुरासन (Dhanurasana) हे पोटावर झोपून केले जाणारे योगासन आहे. या आसनामध्ये दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून हातांनी घोटे पकडले जातात आणि छाती व पाय वर उचलले जातात. त्यामुळे शरीराचा आकार धनुष्याप्रमाणे दिसतो. म्हणून या आसनाला धनुरासन असे नाव देण्यात आले आहे. धनुरासन हे पाठीचा कणा, छाती, खांदे, पोट आणि पायांच्या स्नायूंवर काम करणारे एक मागे वाकण्याचे आसन आहे. नियमित आणि योग्य पद्धतीने सराव केल्यास शरीराची लवचिकता आणि स्नायूंची ताकद सुधारण्यास मदत होऊ शकते. धनुरासन आणि भुजंगासनाचा संबंध धनुरासन करताना शरीराचा पुढील भाग वर उचलला जात असल्यामुळे त्यामध्ये भुजंगासनासारखा मागे वाकण्याचा भाग जाणवतो. तसेच पाय वर उचलल्यामुळे शरीराच्या मागील भागातील स्नायूंवरही ताण येतो. मात्र धनुरासन हे भुजंगासन आणि शलभासन यांचे केवळ साधे "एकत्रीकरण" आहे असे म्हणण्यापेक्षा, या दोन्ही आसनांमध्ये आढळणाऱ्या काही हालचालींसारखी शरीराची स्थिती धनुरासनात दिसते , असे सांगणे अधिक योग्य आहे. माझा योगाभ्यासाचा अनुभव मी IT क्षेत्रात काम करत असल्यामुळे माझ्या कामाचा बराच वेळ संगणकासमोर ब...

पद्मासन (Padmasana) माहिती मराठीत | कृती, फायदे आणि खबरदारी

पद्मासन (Padmasana) माहिती मराठीत | कृती, फायदे आणि खबरदारी पद्मासन (Padmasana) हे योगातील सर्वात प्रसिद्ध आणि पारंपरिक ध्यानासनांपैकी एक आहे. "पद्म" म्हणजे कमळ. या आसनामध्ये बसल्यावर शरीराचा आकार कमळासारखा दिसतो, म्हणून याला पद्मासन किंवा इंग्रजीमध्ये Lotus Pose असे म्हणतात. ध्यान, प्राणायाम आणि मानसिक शांततेसाठी हे आसन अत्यंत उपयुक्त मानले जाते. नियमित सराव केल्यास शरीराची लवचिकता वाढण्यास, मन शांत राहण्यास आणि एकाग्रता सुधारण्यास मदत होऊ शकते. महत्त्वाची सूचना: पद्मासन करताना शरीरावर जबरदस्ती करू नका. गुडघा किंवा घोट्याचा त्रास असल्यास योगतज्ज्ञांचा सल्ला घ्या. पद्मासन कसे करावे? (Padmasana Steps) स्वच्छ आणि सपाट जागेवर चटई अंथरून बसा. दोन्ही पाय समोर सरळ पसरवा. उजवा पाय अलगद उचलून डाव्या मांडीवर ठेवा. त्यानंतर डावा पाय उचलून उजव्या मांडीवर ठेवा. दोन्ही गुडघे जमिनीच्या दिशेने ठेवण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा आणि अंगठा व तर्जनी एकमेकांना स्पर्श करून ज्ञानमुद्रा धरा. पाठीचा कणा, मान आणि डोके सरळ ठेवा. डोळे बंद करून सामान्य श्वास घेत १ ते ५ मिनिटे ध्यान क...