Skip to main content

बालासन योग करण्याचे फायदे (Balasana Yoga Karanyache Fayde)

बालासन 

सध्याच्या धावपळीच्या आणि धकाधकीच्या जीवनात आपल्याला आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे लक्ष देण्याची खूप गरज आहे आणि त्यासाठी नियमित योगासने करणे खूप गरजेचे आहे. मानसिक आरोग्य उत्तम राखणासाठी आणि आपली स्मरण शक्ती वाढविण्यासाठी एक महत्वाचे आसन म्हणजे बालासन. हा एक असा योगप्रकर आहे ज्याच्या सरावामुळे आपल्याला अध्यात्मिक उत्तुंगता, शारीरिक आराम आणि मानसिक स्थिरता मिळते. या आसनाला इंग्रजी मध्ये चाईल्ड पोझ (Child Pose) असे सुद्धा म्हणतात, कारण हि आसनावस्था गर्भातील बालकाप्रमाणे भासते. ज्या प्रमाणे गर्भातील बालकाला जेव्हडा आराम गर्भामध्ये मिळतो तेव्हडाच आराम या आसनाच्या सरावानंतर आपल्यला मिळतो. हे आसन करताना आपली श्वसन प्रणाली उत्तमरीत्या कार्य करते. या आसनाच्या नियमित सरावामुळे आपल्या मज्जासंस्थेचे कार्य सुधारते व आपल्या मेंदूला भरपूर रक्तपुरवठा मिळून मेंदू विषयीच्या भरपूर तक्रारी दूर होतात. लहान मुलांना हे आसन करण्यासाठी नक्कीच प्रेरित करावे कारण हे आसन बालकांना करता येईल इतके सोपे असून या आसनाच्या सरावामुळे त्यांची स्मरण शक्ती वाढण्यास नक्कीच मदत होते. बालासनाची कृती आणि त्यापासून मिळणारे फायदे या बद्दल सर्व माहिती आपण मराठी मध्ये बघुयात. (Balasana information in marathi)

कृती:

  • सर्व प्रथम आपल्या आसनावर वज्रासनात बसा. 
  • आता कमरेतून समोर झुका आणि आपले मस्तक जामिनाला टेकवा. 
  • आपले दोन्ही हात आपल्या खांद्याला समांतर ठेवून समोर लांबवा. 
  • आपल्या हाताचे दोन्ही तळवे आकृतीत दाखवल्या प्रमाणे जमिनीला टेकवा. 
  • आपल्या छातीने आपल्या मांड्यावर दाब द्या. 
  • हे  आसन करताना श्वासोश्वास चालू राहू द्या. 

फायदे : 

  1. या आसनाच्या नियमित सरावामुळे मेंदू आणि मन शांत राहतो. 
  2. या आसनाच्या सरावामुळे आपली स्मरणशक्ती वाढण्यासाठी खूप मदत होते. 
  3. या आसनाच्या सरावामुळे शरीरात नवचैतन्य निर्माण होते. 
  4. आपल्या पाठीच्या कण्याला भरपूर व्यायाम मिळून पाठ आणि कमरे संबधितच्या संपूर्ण तक्रारी दूर होतात. 
  5. या आसनाच्या सरावामुळे पाठ, कंबर, खांदे यांच्या स्नायूत आलेली जडता दूर होते. 
  6. या आसनाच्या सरावामुळे बद्धकोष्ठतेचा तक्रार दूर होते. 
  7. हे आसन तुमच्या श्वासाचे नियंत्रण करण्यास मदत करते आणि संतुलित श्वास घेण्यास मदत करते. 
  8. या आसनाच्या सरावामुळे शरीरातील थकवा दूर होतो.  
टीप: गरोदर महिलांनी हे आसन करू नये.

Comments

Popular posts from this blog

भुजंगासन मराठी माहिती | Bhujangasana

भुजंगासन 'भुजंग' म्हणजे साप. या आसनामध्ये शरीराचा आकार नागाच्या उभारलेल्या फण्यासारखा दिसतो म्हणून या आसनास 'भुजंगासन' असे म्हणतात. येथे आपण भुजंगासन त्याची कृती व आपल्या शरीराला त्याचे होणारे फायदे या बद्दल संपूर्ण माहिती आपल्या मायबोली मराठी भाषेत जाणून घेणार आहोत. (Bhujangasana information in Marathi)    pic credit:  https://pixahive.com/photo/purn-bhujangasana/ कृती: भुजंगासन हे पोट जमिनीला टेकवून करण्याच्या आसनपद्धती पैकी एक आसन आहे, त्यामुळे  प्रथम जमीनीवर पालथे झोपा.  हनुवटी छातीला टेकवा आणि कपाळ जमिनीला टेकवा.  सर्व शरीर हलके करा. हाताचे पंजे छातीजवळ आना नंतर हातांच्या पंज्यावर शरीराचा भार देऊन बेंबीपासूनचा भाग हळू हळू वर उचला.  कमरेखालचा भाग बिलकुल हलू देऊ नका.  आकृतीत दाखवल्या प्रमाणे कृती करा. पायाची बोटे ताणून जमिनीवर टेकवा .  असे केल्याने पाठ आणि खांद्याच्या मधील भागातील स्नायू व्यवस्तीत ताणले जातात. पोटातील सर्व स्नायूंवर सुद्धा व्यवस्तीत ताण  पडतो. या आसनस्थितीत श्वास रोखून धरा. आठ ते दहा सेकंद हे असं क...

धनुरासन मराठी माहिती | Dhanurasana information in marathi

हे आसन पोटावर झोपून करण्याच्या आसन प्रकारातील एक आसन आहे. या आसनाच्या सरावाने शरीरातील चरबी कमी होण्यास मदत होते. हे आसन करताना मस्तकापासून ते गुडघ्या पर्यंत च्या भागाला बाण नसलेल्या धानुष्यासारखा आकार मिळतो म्हणून या आसनाला धनुरासन (Dhanurasana) असे नाव पडले आहे. हे आसन करताना आपल्या शरीराचा संपूर्ण भार हा नाभीवर पडतो त्यामुळे पोटासंबंधीच्या अनेक तक्रारी या आसनाच्या नित्य सरावाने दूर होतात.    भुजंगासन व शलभासन या दोन आसनांचे एकत्रीकरण करून हे आसन बनलेले आहे. येथे आपण धनुरासनाची कृती व फायदे मराठी मध्ये जाणून घेऊयात. (Dhanurasana information in marathi) image credit:  https://pixahive.com/photo/dhanurasana-bow-pose-3/ कृती: पोटावर पालथे झोपा.  दोन्ही हात आपल्या शरीराला लागून समांतर ठेवा.  कपाळ जमिनीवर टेकवून ठेवा.  आपल्या शरीराचे सर्व स्नायू सैल सोडा.  आता दोन्ही पाय गुडघ्यापासून मागे दुमडा.  चित्रात दाखविल्याप्रने दोन्ही हातांनी घोट्याजवळ दोन्ही  पाय धरा.  आता छाती आणि डोके वर उचला हे करताना हात आणि पाय ताठ ठेवा.  आता पाय वर...

पद्मासनाची कृती आणि फायदे | Padmasana information in Marathi

पद्मासन( Padmasana  ) कोरोना पासून वाचायचं असेल तर आपल्याला आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवणं खूप आवश्यक आहे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी पोषक अन्ना बरोबर योगाभ्यास ( Yoga ) करणेही खूप गरजेचे आहे. त्यामूळे मी अशी काही निवडक योगसाने घेऊन येत आहे की जे तुमच्या हृदयाची अणि फुफुसाची कार्यक्षमता वाढवून तुमची रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यास मदत करतील. खाली पद्मासनाच्या कृती आणि फायद्या बद्दल मराठी मध्ये माहिती दिली आहे. ( Padmasana steps and benefits information in Marathi) Photo by  Elina Fairytale  from  Pexels आज आपन 'पद्मासनाबद्दल' थोडं जाणून घेऊया.  पद्म म्हणजे कमळ,  जेव्हा आपण हे आसन करतो, तेव्हा आपल्या शरीराला कमळा सारखा आकार प्राप्त होत असल्याने या आसनाला 'पद्मासन' असे म्हणतात, तर इंग्रजी मध्ये या आसनाला ' Lotus Pose' असे म्हणतात.ध्यान करण्यासाठी प्रामुख्याने पद्मासनाचाच उपयोग केला जातो.  चला तर आता आपण बघुयात 'पद्मासन कसे करावे'? कृती :(Padmasana Steps)  जमिनीवर पाय लांब पसरवून  बसावे.  नंतर उजवा पाय डाव्या...