Skip to main content

पोटाची चरबी कमी करण्यासाठी करा उत्तानपादासन!

आपण पोटाची चरबी कमी करण्यासाठी भरपूर व्यायाम करतो परंतु आपल्याला पाहिजे तेवढा परिणाम दिसत नाही परंतु जर मी इथे असे म्हटले कि कमी कष्ट करून सुद्धा तुम्ही तुमच्या पोटावरील चरबी कमी करू शकता तर आश्चर्य वाटू देऊ नका. कारण नियमित काही योगासने करून आपण हे सहज करू शकतो. शरीरातील चरबी करण्या बरोबर या आसनाचे इतरही भरपूर फायदे आपल्या शरीराला होतात, त्याबद्दल आपण खाली सविस्तर जाणून घेऊयात. 
    हे आसन एकपाद उत्तानासनाप्रमाणेच आहे फक्त या आसनामध्ये दोन्ही पाय वर उचलायचे आहेत. शरीरातील स्थूलपणा कमी करण्यासाठी हि दोन आसने फार उपयोगी आहेत. 

कृती: (Uttanpadasana Steps)

  • पाठीवर सरळ झोपा.
  • दोन्ही हात आपल्या शरीराला समांतर ठेवा.
  • दोन्ही पायांच्या टाचा जोडून पाय सरळ ठेवा. 
  • हळूहळू श्वास घेत राहा. 
  • आता पाय हळूहळू वर आकाशाकडे  उचला.
  • काही सेकंद ह्याच स्तिथीत राहा, या स्तिथीत श्वास रोखून धारा.
  • दोन्ही पाय हळूहळू खाली आना.
  • आता रोखलेला श्वास हळू हळू सोडा.

थोडा वेळ आराम करा आणि पुन्हा हीच क्रिया परत करा. सुरुवातीला हे आसन दिवसातून चार वेळा करावे, सरावानंतर पाच ते सहा वेळा करावे. 

फायदे:(Benefits of Uttanpadasana)

  • या आसनाच्या नियमित सरावामुळे पचनशक्ती सुधारते. 
  • या आसनामुळे स्वादुपिंड(pancreas) कार्यक्षम बनते, त्याचाच परिणाम म्हणून बद्धकोष्टता व अपचनासारख्या तक्रारी दूर होतात. 
  • या आसनामुळे पाठीचा मणका (spinal cord) सुदृढ बनतो. 
  • या आसनाच्या नियमित सरावामुळे स्नायू मजबूत बनतात. 
  • उचकी लागणे, जांघेत दुखणे, वारंवार ढेकर येणे, वारंवार शौचास येणे व अपानवायू (fart) चे विकार या आसनाच्या सरावाने दूर होतात.
  • मूळव्याधीची सुरुवात असेल तर या आसनाच्या सरावामुळे ती व्याधी दूर होण्यास मदत होते. 
  • या आसनामुळे शरीरातील चरबी कमी होते. 
पोटाची चरबी कमी करण्यासाठी घरगुती उपापोटाची 
 

Comments

Popular posts from this blog

भुजंगासन (Bhujangasana) माहिती | फायदे, कृती, काळजी व उपयोग | ByYogesh

भुजंगासन (Bhujangasana) माहिती | फायदे, कृती, काळजी व उपयोग  भुजंगासन म्हणजे काय? 'भुजंग' म्हणजे नाग किंवा साप. या आसनामध्ये शरीराचा आकार फणा काढलेल्या नागासारखा दिसतो म्हणून या आसनाला भुजंगासन (Bhujangasana) असे म्हणतात. इंग्रजीमध्ये याला Cobra Pose असे म्हणतात. हे पोटावर झोपून केले जाणारे एक प्रभावी योगासन असून पाठीचा कणा, खांदे, छाती आणि पोटाच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. आजच्या धावपळीच्या जीवनात अनेक जण संगणकासमोर तासन्तास बसून काम करतात. त्यामुळे पाठदुखी, मानेचा त्रास आणि शरीराची लवचिकता कमी होणे या समस्या वाढताना दिसतात. अशा वेळी योग्य पद्धतीने आणि नियमितपणे केलेले भुजंगासन शरीराला मोठा फायदा देऊ शकते. माझा भुजंगासनाचा अनुभव (My Experience) मी व्यवसायाने IT क्षेत्रात Automation Test Engineer म्हणून काम करतो. माझ्या कामाचा बहुतांश वेळ संगणकासमोर बसून जातो. सुरुवातीला सलग ८–१० तास बसून काम केल्यामुळे मला वारंवार पाठदुखी, मानेचा ताण आणि खांद्यामध्ये जडपणा जाणवू लागला. काही दिवस तर सकाळी उठल्यावरही पाठीमध्ये ताठरपणा जाणवत असे. यानंतर मी नियमित य...

धनुरासन (Dhanurasana) माहिती | कृती, फायदे, काळजी आणि योग्य पद्धत

धनुरासन म्हणजे काय? धनुरासन (Dhanurasana) हे पोटावर झोपून केले जाणारे योगासन आहे. या आसनामध्ये दोन्ही पाय गुडघ्यात वाकवून हातांनी घोटे पकडले जातात आणि छाती व पाय वर उचलले जातात. त्यामुळे शरीराचा आकार धनुष्याप्रमाणे दिसतो. म्हणून या आसनाला धनुरासन असे नाव देण्यात आले आहे. धनुरासन हे पाठीचा कणा, छाती, खांदे, पोट आणि पायांच्या स्नायूंवर काम करणारे एक मागे वाकण्याचे आसन आहे. नियमित आणि योग्य पद्धतीने सराव केल्यास शरीराची लवचिकता आणि स्नायूंची ताकद सुधारण्यास मदत होऊ शकते. धनुरासन आणि भुजंगासनाचा संबंध धनुरासन करताना शरीराचा पुढील भाग वर उचलला जात असल्यामुळे त्यामध्ये भुजंगासनासारखा मागे वाकण्याचा भाग जाणवतो. तसेच पाय वर उचलल्यामुळे शरीराच्या मागील भागातील स्नायूंवरही ताण येतो. मात्र धनुरासन हे भुजंगासन आणि शलभासन यांचे केवळ साधे "एकत्रीकरण" आहे असे म्हणण्यापेक्षा, या दोन्ही आसनांमध्ये आढळणाऱ्या काही हालचालींसारखी शरीराची स्थिती धनुरासनात दिसते , असे सांगणे अधिक योग्य आहे. माझा योगाभ्यासाचा अनुभव मी IT क्षेत्रात काम करत असल्यामुळे माझ्या कामाचा बराच वेळ संगणकासमोर ब...

पद्मासन (Padmasana) माहिती मराठीत | कृती, फायदे आणि खबरदारी

पद्मासन (Padmasana) माहिती मराठीत | कृती, फायदे आणि खबरदारी पद्मासन (Padmasana) हे योगातील सर्वात प्रसिद्ध आणि पारंपरिक ध्यानासनांपैकी एक आहे. "पद्म" म्हणजे कमळ. या आसनामध्ये बसल्यावर शरीराचा आकार कमळासारखा दिसतो, म्हणून याला पद्मासन किंवा इंग्रजीमध्ये Lotus Pose असे म्हणतात. ध्यान, प्राणायाम आणि मानसिक शांततेसाठी हे आसन अत्यंत उपयुक्त मानले जाते. नियमित सराव केल्यास शरीराची लवचिकता वाढण्यास, मन शांत राहण्यास आणि एकाग्रता सुधारण्यास मदत होऊ शकते. महत्त्वाची सूचना: पद्मासन करताना शरीरावर जबरदस्ती करू नका. गुडघा किंवा घोट्याचा त्रास असल्यास योगतज्ज्ञांचा सल्ला घ्या. पद्मासन कसे करावे? (Padmasana Steps) स्वच्छ आणि सपाट जागेवर चटई अंथरून बसा. दोन्ही पाय समोर सरळ पसरवा. उजवा पाय अलगद उचलून डाव्या मांडीवर ठेवा. त्यानंतर डावा पाय उचलून उजव्या मांडीवर ठेवा. दोन्ही गुडघे जमिनीच्या दिशेने ठेवण्याचा प्रयत्न करा. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा आणि अंगठा व तर्जनी एकमेकांना स्पर्श करून ज्ञानमुद्रा धरा. पाठीचा कणा, मान आणि डोके सरळ ठेवा. डोळे बंद करून सामान्य श्वास घेत १ ते ५ मिनिटे ध्यान क...